जागतिक महिला दिन 2024
जागतिक महिला दिनाच्या सर्व नारीशक्तीला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संस्कृती मध्ये नारीला उच्च स्थान आहे . आपल्या देवी देवतां मध्ये विद्येची देवता सरस्वती, शक्तीची देवता पार्वती आणि धनाची देवता लक्ष्मी आहे , ' यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता ' अर्थात जिथे स्त्रियांचा आदर केला जातो तिथे देवता वसतात. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाबाई एक आदर्श नारी होती, तिने दिलेल्या संस्कारांमुळेच स्वराज्याची मुहूर्तमेढ होऊन स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले, ताराराणी ने अखंड झुंज देऊन स्वराज्य टिकवले आणि शेवटी औरंगजेबाला महाराष्ट्रातच गाडले , झाशीची राणी लक्ष्मीबाईने स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपली आहुती दिली ,अश्या अनेक रणरागिणींनी आपला इतिहास भरलेला आहे. ख्रिस्तपूर्व काळात गार्गी नावाची महान तत्वज्ञानी , वेदशास्त्रात पारंगत विद्वान स्त्री होऊन गेली जिच्या हुशारीची चर्चा अजून हि होते. आपल्या भारत वर्षांमध्ये अनेक विद्वान , कर्तृत्ववान स्त्रियांनीं जन्म घेतला आणि आपापल्या काळात त्यांनी इतिहास घडवला. स्त्री हि समाजात समान अधिकाराला पात्र होती आणि अनेक राजघराण्यांमध्ये राजमातांचा शब्...