सत्तेचा घोडेबाजार

                                                                    


नेता मोठा कि पक्ष मोठा ? नेता मोठा कि पक्षाचा सिद्धांत मोठा ? पक्ष मोठा कि नेता मोठा ? पक्ष मोठा कि नेत्याचा सिद्धांत मोठा ? एखादा पक्ष मोठा कि देश मोठा ? पक्षाने नेत्याला बनवले कि नेत्याने पक्षाला बनवले ? पक्षातील नेत्यांसाठी काम करायचे कि पक्षाच्या सिद्धांतांसाठी काम करायचे ? नीतिमूल्ये जपणाऱ्या नेत्याला आपला मानायचे कि सगळी नीतिमूल्ये चुलीत घालून फक्त सत्तेसाठी लाचार होणाऱ्या नेत्याला आपला नेता मानायचे ? राजकारणात सर्व काही क्षम्य असते का ? एकाने केली तर गद्दारी आणि दुसऱ्याने केली तर मुत्सद्देगिरी, संधीचे राजकारण करणाऱ्यांना डोक्यावर बसवायचे कि पायतानाने हाणायचे ? राजकारण राजकारण ह्या नावावर किती खपवून घ्यायचे ? 

आज देशामधील राजकारणाची परिस्थिती बघता असे अनेक प्रश्न वारंवार मनात येतात, अरे कुठे न्हेऊन ठेवलंय राजकारणाला. आज राजकारणातील नीतिमत्ता मरून जात आहे आणि उरत आहे फक्त संधीसाधूगीरी. आपली सत्ता येण्यासाठी घोडेबाजार मांडला जातो आणि ह्या बाजारात अनेक नस्लीचे घोडे स्वतःला विकायला चढाओढीने तयार दिसतात, कोणाला कॅबिनेटमध्ये मिनिस्टरचे पद पाहिजे तर कोणाला एखादे माल कमवून देणारे महामंडळ. 




काही राजकारणी उरले आहेत ज्यांनी आपली मूल्ये जपून ठेवून जनतेचा विश्वास शाबूत ठेवला आहे. अश्या राजकारण्यांच्या जीवावरच आपली लोकशाहीची निव टिकून आहे आणि दिवसेंदिवस मजबूत होत आहे, लोकशाहीला अजून मजबूत करण्यासाठी अश्या नेकदिल राजकारण्यांना जास्तीत जास्त निवडून देणे गरजेचे आहे 

सामान्य जनता राजकारण्यांना निवडून देते ते त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा ठेऊन पण एकदा निवडून आल्यावर घोडेबाजार करणाऱ्यांचे अजंडे बाहेर येतात आणि त्यानुसार त्यांच्या योजना सुरु होतात आणि मग सुरु होतो सत्तेचा घोडेबाजार. जनतेने वेळीच अश्या घोडेबाजारात स्वतःला विकणाऱ्या घोड्यांना ओळखून त्यांची नाळ चांगलीच ठोकली पाहिजे ज्याने त्त्यांची अवस्था न घरका ना घाटका होऊन जाईल. 

अशे राजकारणी सध्याच्या राजकारणाला लागलेली कीड आहे आणि हि कीड हळू हळू सगळ्या सिस्टिम ला पोखरून काढत आहे ,हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते थांबवायची ताकत मायबाप जनता जनार्दनाच्या हातात आहे, जनतेने फक्त आपल्या अधिकारांचा सद्सदविवेक बुद्धीने वापर करून योग्यत्या राजकारण्याला निवडून देऊन घोडेबाजार करणाऱ्यांची नांगी ठेचली पाहिजे.

© जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Post a Comment

Polular Posts

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात