थोडा है , थोडे कि जरुरत है

''थोडा है , थोडे कि जरुरत है '', प्रत्येक जणांच्या आयुष्यातील हि सत्य परिस्थिती. अगदी बिलिअनर पण कदाचित हाच विचार करत असतील. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात काही ना काही इच्छा धरून असतो त्यातील सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही आणि पूर्ण झाल्या तरी तो पर्यंत नवीन इच्छांची भर पडलेली असते आणि मग परत परिस्थिती पुन्हा येऊन पोचते ''थोडा है थोडे कि जरुरत है'' वर. सगळ्यांना आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींची कमीच भासते , बाईक वाला कार इच्छितो , साधी कार वाला लक्झरी कार , लक्झरी कार वाला चार्टर प्लॅन अशी इच्छांची रांग वाढतच जाते , प्रत्येक जण 'थोडा और थोडा और' च्या चक्रात अडकलेला असतो. 

ह्या थोडा और च्या मागे सर्वात मोठे कारण असते तुलना करण्याची वृत्ती , प्रत्येक जण आपली तुलना दुसऱ्या बरोबर करत असतो. सकृत दर्शनी समोरचा त्याला जास्त सुखी दिसतो आणि त्याच्या कडे असणारी प्रत्येक गोष्ट आपणाकडे पण आली कि आपण पण तेवढेच सुखी होऊ असे ज्याला त्याला वाटते , समोरच्या कडे असणाऱ्या भौतिक गोष्टींवरून त्याच्या सुखाची व्याख्या केली जाते.  ज्याच्या कडे जास्त भॊतिक गोष्टी , लक्झरी गोष्टी असतात तो दुसऱ्यांना जास्त  सुखी वाटतो आणि सर्व जण त्याची  बरोबरी करायचा प्रयत्न करतात.

ह्या तूलना करण्यामध्ये नातेवाईक, मित्र मैत्रिणी , ऑफिस मधले कलीग , शेजार पाजारी अशे सर्व जण असतात. आजकालच्या टेकनॉलॉगींच्या युगात जग क्षणाक्षणाला बदलत आहे आणि त्याच्या मागोमाग नवीन नवीन गॅझेट नि जीवन भरून गेले आहे, हि गॅझेट जीवन बदलवून टाकत आहेत आणि त्यांना घेण्यासाठी एक प्रकारची चढा ओढ चालू असते.  एखाद्याकडे असणाऱ्या मोबाईल फोनच्या  मॉडेल पेक्षा सरस मॉडेल आपल्याकडे असायला पाहिजे ह्याच्या वर भर दिला जातो, आय फोन ची कित्येक मॉडेल आली आणि प्रत्येक मॉडेल बरोबर ग्राहकांमध्ये कंपेटिशन पण वाढत गेली , एकाने नवीन व्हर्जन घेतले कि दुसरा लगेच ते घेण्यासाठी कमर कसतो.

थोड्यामध्ये खुश होणे निश्चितच चांगले नाही आणि प्रत्येकाने अधिक गोष्टींची इच्छा राखण्यामध्ये पण काही चूक नाही. जो पर्यंत प्रत्येक जण स्वतःला स्ट्रेच करत नाही स्वतःच्या कंफर्ट झोन मधून बाहेर पडून स्वतःच्या पोटेन्शिअल ला चॅलेंज  करून त्याचा पूर्ण वापर करत नाही तो पर्यंत त्याचा विकास होत नाही  आणि यश त्याच्या चरणी येत नाही. म्हणून यशाच्या मागे लागणे , जास्तीत जास्त पैसे , पद , प्रतिष्ठा कमावणे  हे प्रत्येकाचा आयुष्यातील लक्ष्य असायला हरकत नाही  आणि त्याने थोड्यावर न थांबता जास्तीची अपेक्षा करायला हरकत नाही . पण प्रश्न येतो 'और थोडे 'कि खरंच जरुरत है का याचा. हि जी 'और थोडे कि जरुरत है ह्याचा विचार करताना आणि त्याच्या मागे लागण्यामध्ये आपण काय काय गमावतो आहे ह्याचा पण विचार करायला पाहिजे, कारण ह्या 'और थोडे च्या मागे लागण्यामध्ये आपण आपलं शारीरिक आणि मानसिक संतुलन तर बिघडवत नाहीना, आपले वैवाहिक जीवन , मित्र आप्तेष्ट ह्यांच्या पासून आपण दूर तर जात नाहीना. यशाच्या मागे लागणे आणि लालचेच्या मागे लागणे ह्या दोघानामध्ये एक अस्पष्ट रेषा आहे ती कुठे क्रॉस तर होत नाहीना हे पण बघायला पाहिजे. 

सनातन धर्माच्या शैलीत डिटॅचमेंट ला खूप महत्व दिले आहे, वैराग्य घेऊन जीवन जगणे , सगळ्या गोष्टींमध्ये असून पण सगळ्या पासून अलिप्त होणे. माणूस ज्यावेळी उद्दात्त ध्येय घेऊन अलिप्तपणे कार्य करून यशाची शिखरे चढतो त्यावेळी  त्याची थोडे कि जरुरत संपून जाते कारण त्याला स्वतःसाठी काही पाहिजेच नसते, तो जे काही करत असतो ते आपली जबाबदारी आणि कर्ता धर्म पूर्ण करण्यासाठी करत असतो.जीवनाच्या अश्या उंचीपर्यंत पोचणे सगळ्यांना जमत नाही, खूप थोडी माणसे तिथपर्यंत पोचतात. सर्व काही सोडून देऊन स्वतःला अलिप्त केले जाते तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कर्मयोग्याचे जीवन सफल संपूर्ण  होते. हे जो पर्यंत प्रेत्येकाला जमत नाही तो पर्यंत प्रत्येक जण असाच धावत राहणार आणि  और थोडे कि जरुरत केव्हाही नाही संपणार.

© जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Post a Comment

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात