Posts

Showing posts from October, 2023

बवाल

Image
                                                                                  नूकताच  बवाल सिनेमा बघितला, खूप दिवसांनी बॉलीवूड वाल्यांनी एक सुंदर निर्मिती केली आहे. एक असा सिनेमा जो पुऱ्या परिवारासोबत बसून बघू शकतो, आजच्या पिढीला आरसा दाखवणारा आणि समाजातले एक वास्तव दाखवणारा सिनेमा.  आज बरेचजण आपली एक खोटी इमेज बनवून आहेत आणि त्या इमेजला तडा जाऊ नये म्हणून एक खोट्याची दुनिया बनवतात आणि ती जपण्यासाठी अनेक उलटे सुलटे मार्ग वापरतात, त्यांना आपल्या इमेज पेक्षा बाकी सर्व गौण असतें आणि त्यासाठी आपली नाती गोती, मानवी मूल्ये या सगळ्यांना पायदळी तुडवण्यात त्यांना काहीही चुकीचे वाटत नाही. खूपच आत्माकेंद्रित आणि स्वार्थी लोकं असतात ती. आपण आयुष्यात खूप मागे पडलो अशी खंत मनात सलत असते आणि जगाला दाखवण्यासाठी ते मग आपलें वेगळे विश्व उभारतात आणि तेच लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात.  अनेक वेळा लोकं रीझल्ट विसरतात पण त्या माणसाने दाखवलेला दिखाऊपणा लक्षात ठेवतात आणि ह्याच गोष्टींचा अशी लोकं फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात.  सिनेमा मधील शिक्षक वर्ल्ड वार शिकवण्यासाठी युरोप टूर ला जातो आणि हळू

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण

Image
  आजच्या धावपळीच्या दुनियेत खरंतर मनाचे पण आरोग्य असतें हे आपण समजूनच घेत नाही, आपण  शरीराला   वेळ देत नाही तर मनाची तर बातच दूर. लहानपणी शाळेत मनाचे श्लोक पाठ केले होते पण त्यांचा अर्थ उमलून घेऊन तो जीवनात उतरवणे किती जणांना जमले असेल. समर्थांनी 205 श्लोक मनाला उद्देशून लिहिले आहेत, प्रत्येक श्लोक म्हणजे जीवन जगण्याचा, मनाला स्थिर ठेवण्याचा मंत्र आहे पण समर्थांच्या श्लोका पेक्षा कुठल्यातरी अमेरिकन किंवा यूरोपयन मनसोपाचार तज्ञाच्या लेख आपल्याला जास्त जवळचा वाटतो.  संत तुकाराम सांगतात 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण '. पण ते मन नेमके काय असतें ते आपण समजूनच घेत नाही. संत रविदास म्हणतात 'मन चंगा तो कठोती में गंगा ' पण चंगा म्हणजे काय? आपल्याला कुठे वेळ आहे त्याला चंगा वैगेरे ठेवायला. तुकाराम महाराज म्हणतात 'नाही निर्मळ मन तर काय करील साबण ' किती जण मनाच्या निर्मळ पणासाठी प्रयत्न करतात.  श्यामची आई श्यामला तळव्यासारखे मनाला पण मळ लागू नये म्हणून जपायला सांगते पण आपण ते विसरून गेलो आहे. बहिणा बाईंना मन खऱ्या अर्थाने समजले होते 'मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढ

वेडात मराठे वीर दौडले सात

Image
  24 फेब्रुवारी 1674,  जगाच्या इतिहासात अजरामर असा रणसंग्राम घडला होता. स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजरांच्या नेतृत्वाखाली सहा स्वामीनिष्ठ पराक्रमी मराठे बहलोल खानाच्या बारा हजाराच्या वरच्या सैन्यावर चालून गेले होते. हा इतिहास आहे अजोड स्वामीनिष्ठेचा, अतुलनीय पराक्रमाचा, आपल्या देवासमान राजाच्या शब्दाखातर प्राणाची आहुती देणाऱ्या मर्द मराठ्यांचा. बहलोलखान ज्या वेळी स्वराज्यावर चालून आला त्यावेळी त्याला कायमचा ठेचून काढण्यासाठी राजांनी प्रतापराव गुजरांना धाडले. प्रतापरावांनी बहलोलखानाचे पाणी तोडण्यासाठी उमराणीच्या जलाशयावर कब्जा करून त्याला कैचीत पकडले. खानाचे सैन्य, त्याचे हत्ती पाण्याबिगर हैराण झाले. त्याच्या एका हत्तीने बेफाम होऊन खानाच्याच सैन्याला पायाखाली चिरडले. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत खानावर आक्रमण करून प्रतापरावांनी त्याला आपल्या पायाशी लोळवले. खान शरण आला आणि आपल्या जीवाची भीक मागू लागला. शरणागताला मारणे ही माणुसकी नाही असे समजून प्रतापरावांनी खानाला माफी दिली. पण खान सुधरण्यातला न्हवता त्याने पुन्हा स्वराज्यावर हल्ला करून मिरज, कोल्हापूर सारखी शहरे लुटली. ज्या वेळी शिवाजी

पानिपत : मराठ्यांची शौर्य गाथा

Image
                                                                          14 जानेवारी 1761, पानिपत चा रणसंग्राम म्हणजे मराठ्यांच्या शौर्याची, स्वामीनिष्ठेची, देशभक्तीची, अचाट पराक्रमाची अजरामर गाथा. मराठ्यांनी केलेली पराक्रमाची शर्त, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या कर्तव्यासाठी, देश सरंक्षणासाठी स्वतःला झोकून द्यायची वृत्ती ह्यातून दिसून येते. नाना पाटेकरचा प्रसिद्ध डायलॉग 'मराठा मारता है या मरता है ' कदाचित याच रणसंग्रामा वरून आला असेल. ह्या युद्धाची जर पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर 1758 नंतर पूर्ण उत्तरेत मराठा साम्राज्य एक जबरजस्त ताकत म्हणून उदयास आले होते. मराठ्यांनी लाहोर पर्यंत दौंड मारून अहमदशहा अब्दाली च्या मुलाला हुसकावून लावले होते. दिल्ली चा बादशहा नावापुरता राहिला होता आणि मुघल साम्राज्याचा बिमोड करून मराठ्यांचा डंका पूर्ण उत्तरेवर गाजत होता. रोहील खंडाचा नजीब खान रोहिला आणि अवधचा नवाब सुजाउदोल्ला मराठ्यांना घाबरून होते आणि मराठ्यांची घोडदौड रोखण्यासाठी त्यांनी काबूल वरून अहमदशहा अब्दालीला पाचारण केले. अब्दालीला पण आपल्या मुलग्याच्या पराभवाचा बदला घ्यायचा ह

बचेंगे तो और भी लडेंगे

Image
                         इ तिहासात अनेक योद्धे होऊन गेले. आपल्या अतुलनीय शौर्य,अदभुत पराक्रम ,प्रगल्भ बुद्धिचातुर्य,  बाणेदारपणा आणि अप्रतिम साहसाने त्यांनी इतिहासात नाव कोरले. यातील अनेक योद्धे आता इतिहासाच्या पटलावरून पुसून जात आहेत, त्यांचा पराक्रम, त्यांचा आदर्श आपण विसरून जात आहोत कारण आपण त्यांचा इतिहास कधी नीट शिकतच नाही आणि त्याच्या पासून शिकवण घेऊन आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत  नाही. प्रत्येकाचा कार्यकाळ  एक तप आहे आणि त्यांनी केलेले महान कार्य आपल्याला आयुष्यात प्रचंड प्रेरणादायि आहे . यांच्याच पंक्तितला एक महान योद्धा ज्याने आपल्या बाणेदारपणामुळे आणि अतुलनीय पराक्रमाने इतिहासात नाव कोरले - "दत्ताजी शिंदे ". " बचेँगे तो और भी लडेंगे " ह्या त्यांच्या बाणेदार उत्तराने इतिहास घडवला. योद्धा कधी हार मानत नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देतो हे दत्तजिने पुऱ्या जगाला शिकवले. 10 जानेवारी 1760 रोजी दत्ताजी शिंदे नजिब खान रोहीला बरोबर लढताना धारातीर्थी पडले. भीषण रणतान्डवात दंडाला गोळी लागून दत्ताजी शिंदे जखमी जाले आणि घोड्यावरून खाली पडले , तशाच जखमी अवस्थ

लास्ट सीन...

Image
  आज   कालच्या   धावपळीच्या   जीवनात   आपल्याला   भेटलेली   व्यक्ती   पुन्हा   भेटेल   आणि   भेटली   तरी   पुन्हा   आधी   होती   तशीच   आपल्याशी   मिळेल   ह्याची   खात्री   नाही .  कदाचित   त्या   व्यक्तीची   भेट   आपली   लास्ट   सीन   असू   शकते . आपण   आपल्या   नातेवाईकांना ,  मित्रांना ,  जुन्या   कलीगना   कधी   लास्ट   बघितले   होते   तेही   आठवत   नाही   आणि   मग   आचानक   बातमी   येते   की   ती   व्यक्ती   आता   जगातून   निघून   गेली   आहे   आणि   आपल्यासाठी   ती   खरंच   आता   लास्ट   सीनच   आहे .  मग   सुरु   होतो   आठवणींचा   खेळ ,  आपण   त्याला   किंवा   तिला   कधी   लास्ट   बघितले   होते ,  बघितले   होते   फक्त   की   भेटणे   पण   झाले   होते ,  भेटलो   होतो   तर   काही   बोलणे   झाले   होते   का   असंच   हाय   हॅलो   झाले   होते ,  भांडण   तर   झाले   न्हवते   ना ?  त्याला   किंवा   तिला   आपण   मनमोकळे   पणे   भेटलो   होतो   की   जूने   हेवेदावे   उगाळून   फटकून   वागलो   होतो ? असे   बोलतात   की   आपल्या   आयुष्यात   आलेली   प्रत्येक   व्यक्ती   ही   विधात्याच्या   पूर्वन