अभिमन्यू चक्रव्यूह मे फस गया है तू I

 


महाभारतातील अभिमन्यू सगळ्यांनाच परिचित आहे. युद्ध काळात रचलेल्या सर्वात कठीण अश्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचा त्याने प्रयत्न केला होता पण अर्धवट ज्ञानाने तो ते पार करू शकला न्हवता आणि वीरगतीला प्राप्त झाला होता. आपल्या मातेच्या उदरात असताना भगवान श्रीकृष्णांनी हे ज्ञान त्याची माता सुभद्रेला संगितले होते पण ते ऐकता ऐकता ती झोपी गेली आणि अर्धवटच ज्ञान अभिमन्यू पर्यंत पोचू शकले.

आजच्या कलियुगात पण एक सर्वसाधारण माणूस अश्याच अनेक चक्रव्यूहात सापडलेला दिसतो आणि जीवन जगण्याची कला पूर्ण पणे आत्मसात न केल्याने तो ह्या चक्रव्यूहातुन बाहेर पडू शकत नाही आणि पूर्ण आयुष्य ह्या चक्रात फसून  गेलेला असतो. 

सर्वात पहिले चक्रव्यूह आहे ते प्रदूषणाचे, हे प्रदूषण आपण स्वतःहुन ओढून घेतले आहे. माणूस जसा जसा प्रगत होत जात आहे तसा तसा तो पर्यावरणाचा नाश करायला उठला आहे. कारखान्यांच्या धुरांड्यांमधून ओकणारा धूर, गाड्यां मधून निघणारा धूर, अनेक उपकरणांच्या वापराने होणारे ग्रीन हौसे गॅसेसचे उत्सर्जन, प्रचंड प्रमाणात होणारी जंगलतोड, शेतीसाठी वापरात येणारी अनेक प्रकारची केमिकल आणि त्यामुळे उतरलेली मातीची प्रत, ओझोन लेयर कमी होऊन वाढणारे तापमान आणि त्यामुळे बर्फ पिघळून वाढणारी समुद्राची पातळी, ह्या सर्व गोष्टी खूप धोकादायक आहेत आणि पर्यावरणाचे  संतुलन बिघडल्यामुळे वारंवार येणाऱ्या आपदा आपल्याला संकेत देत आहेत कि आतातरी सुधारून जा नाहीतर एखाद्या दिवशी असत्याचे न्हवते व्हायला वेळ लागणार नाही. 


आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी खूप योजना आखल्या जात आहेत, अनेक नियम बनवले जात आहेत पण जो पर्यंत ते नियम काटेकोरपणे पाळून निसर्ग हा आपला देव आहे आणि त्याची पूजा करून त्याचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे हि भावना जो पर्यंत वाढत नाही तो पर्यंत प्रदूषणाचा राक्षस असाच आपल्या भोवती विळखा मारत राहील आणि कधी एक सुनामी येऊन सर्व संपेल ह्याची खात्री नाही.

दुसरे चक्रव्यूह आहे ते सामाजिक अधोगतीचे, सांस्कृतिक अधपतनाचे. आज आपण आपली संस्कृती, आपली नैसर्गिक जीवनशैली विसरत जातं आहोत, आपल्या परंपरा, आपली  खाद्यसंस्कृती, आपली सामाजिक सरंचना सगळ्या गोष्टी पूर्णपणे बदलून जाऊन आपण अश्या गोष्टींना अंगिकारले आहे ज्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक पातळी वर फार मोठं नुकसान होत आहे. दैनंदिन जीवनात लागणारे मानसिक आणि शारीरिक संतुलन पूर्णपणे बिघडून जाऊन आपण हळू हळू नैराश्येच्या खाईमध्ये उतरत जात आहोत. सामाजिक संतुलन बिघडून गुन्हेगारी, अनैतिकता जोरावर येऊन समाज अधोगतीला जातं आहे, ह्यातून बाहेर पाडण्यासाठी आपली पाळंमुळं समजून घेऊन आपल्या संस्कृतीला आपल्या परंपरांना पुन्हा एकदा पुनर्वजीवित करून नव्याने स्वीकारण्याची गरज आहे. 

तिसरे चक्रव्यूह आहे आर्थिक दिवाळखोरीचे. आजकाल पैसा हा भगवान बनला आहे, पैसा कमावण्यासाठी माणूस कोणत्याही थराला पोचतो आणि तो पैसा लक्झरी गोष्टींमध्ये खर्च करून आपली जीवन शैली आधुनिक करण्याचा  प्रयत्न करत असतो, अनेक सुख सुविधांच्या मागे धावत माणूस कर्जाचे ओझे आपल्यावर ओढून घेतो आणि नंतर अडकून जातो इएमआय आणि क्रेडिट कार्डच्या  चक्रात, हे असे चक्र आहे कि एक इएमआय संपला कि दुसरा उभा असतो, फ्लॅट, गाडी, फॉरेन टूर्स आणि बरेच काही मिळवण्याच्या चक्रात माणूस कर्जाच्या बोझ्याखाली दबून जातो. माणसाची लालसा आणि दिखावा करून जगण्याची वृत्ती त्याला ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करत असतात, आर्थिक भरभराट होणे गरजेचे आहे पण त्यामागे लागून आपल्या जीवनाचे संतुलन तर बिघडणार नाहीना ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे.

ह्या सगळ्या चक्रव्यूहातून तारून जाण्यासाठी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जीवन जगण्याची कला आत्मसात करून खऱ्या अर्थाने जन्माचा उत्सव साजरा केला पाहिजे.

टीप : प्रिय रसिक वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे कि हा माझा ''फूड फॉर थॉट'' ब्लॉग टॉप १०० मराठी ब्लॉग लिस्ट मध्ये ''फीड स्पॉट'' फीड रीडर कडून सिलेक्ट झाला आहे. मी आपल्या ह्या प्रेमाबद्दल आपला शतशः ऋणी आहे, असाच लोभ राहूदे, खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण सर्व ब्लॉग बघू शकता.


© जितेंद्र मनोहर शिंदे 


Comments

Post a Comment

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात