जागतिक महिला दिन 2024

जागतिक महिला दिनाच्या सर्व नारीशक्तीला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संस्कृती मध्ये नारीला उच्च स्थान आहे . आपल्या देवी देवतां मध्ये विद्येची देवता सरस्वती, शक्तीची देवता पार्वती आणि धनाची देवता लक्ष्मी आहे , ' यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता ' अर्थात जिथे स्त्रियांचा आदर केला जातो तिथे देवता वसतात. 

छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाबाई एक आदर्श नारी होती, तिने दिलेल्या संस्कारांमुळेच स्वराज्याची मुहूर्तमेढ होऊन स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले, ताराराणी ने अखंड झुंज देऊन स्वराज्य टिकवले आणि शेवटी औरंगजेबाला महाराष्ट्रातच गाडले , झाशीची राणी लक्ष्मीबाईने स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपली आहुती दिली ,अश्या अनेक रणरागिणींनी आपला इतिहास भरलेला आहे. ख्रिस्तपूर्व काळात गार्गी नावाची महान तत्वज्ञानी , वेदशास्त्रात पारंगत विद्वान स्त्री होऊन गेली जिच्या हुशारीची चर्चा अजून हि होते. आपल्या भारत वर्षांमध्ये अनेक विद्वान , कर्तृत्ववान स्त्रियांनीं जन्म घेतला आणि आपापल्या काळात त्यांनी इतिहास घडवला. स्त्री हि समाजात समान अधिकाराला पात्र होती आणि अनेक राजघराण्यांमध्ये राजमातांचा शब्द शेवटचा शब्द होता ज्याला राजापण आव्हान देऊ शकत न्हवता. अश्या महान संस्कृती मध्ये स्त्री हि चूल आणि मुलं पर्यंत कशी अडकून पडली ते इतिहासालाच ठाऊक. 



धर्माचा आणि संस्कृतीचा विसंगत अर्थ काढत स्त्रियांना घरापुरत अड्कवून भारतातील समाजाने आपले निश्चितच खूप मोठे नुकसान करून घेतले आहे. मुघल आक्रान्ताच्या  काळात स्त्रीची अब्रू वाचवण्यासाठी किंवा इतर अनेक कारणांमुळे स्त्री घरात कोंडली गेली , राजस्थान मध्ये अनेक वेळा मुघलांपासून आपली अब्रू वाचवण्यासाठी स्त्रियांनी सामूहिक जोहर केला होता. कोकणामध्ये आलेली केशवपनाची प्रथा ह्या मुघलांपासून वाचवण्यासाठीच होती. सतीची प्रथा कशी आणि कोणामुळे आली ते माहीत नाही पण निश्चितीतच ती आपल्या मूळ संस्कृती मध्ये कधीच न्हवती, महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये कुठेच कोणी राजस्त्री सती गेल्याचा ऊल्लेख नाही आहे. 
अनेक खोट्या चालीरीती आणि धर्माचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे स्त्री हि आपल्या अधिकारापासून वंचित राहत होती पण महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंनि  केलेल्या संघर्षा मुळे स्त्रीला शिक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा प्राप्त झाला आणि नंतर पुन्हा एकदा स्त्रियांच्या कर्तृत्वाने भरारी मारली . आज स्त्रीने पुरुषांच्या खान्द्याला खांदा लावून साऱ्या जगाला आपले कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे आणि पटवून दिले आहे  ' हमारी छोरीया छोरोंसे कम नही है '.
कॉर्पोरेट क्षेत्र , राजकारण, सिनेमा, क्रीडा , संशोधन , सरंक्षण आणि अश्या अनेक क्षेत्रात आज स्त्री पुरुषांपेक्षा काकण  भर श्रेष्ठच ठरत आहे. 



स्त्री म्हणजे करुणा, शक्ती  ,संयम, धैर्य, सौन्दर्य आणि अश्या अनेक गुणांचे विधात्याने बनवलेले एक अनोखे मिश्रण. इंदिरा गांधी सारखी कणखर स्त्री देशाची पंप्रधान होऊन गेल्यानंतर पण जर देशामध्ये स्त्री समानता  येत नसेल तर निश्चितच त्याच्या वर विचार करणे गरजेचे आहे . ममता बॅनर्जी सारखी महिला मुख्यमंत्री असून  सुद्धा स्त्रियांचे शोषण होत असेल तर वेळ अंतर्मुख व्हायची आहे . सर्व स्त्रियांना सर्वप्रथम स्वतःचे अस्तित्व आणि महत्व जाणून स्वतःला मान द्यायला सुरवात केली पाहिजे , जो पर्यंत स्त्री स्वतःला सन्मान  देत नाही, स्वतःच्या हक्काबद्दल जागृत होत नाही आणि वेळप्रसंगी बंड करून उठत नाही तो पर्यंत तिला समाजात तिचे स्थान मिळणे कठीण आहे. समजाने हे समजून घेतले पाहिजे की वूमन एमपॉवरमेन्ट ची गरज नाहीं आहे वूमन आधीच पावरफूल आहे फक्त तिला तिची पॉवर परत देणे गरजेचे आहे. स्त्री हि दुर्गा आहे महिषा सूर मार्दीनी आहे आणि असुरांचा नाश करणे तिला काही मोठी गोष्ट नाहीं आहे. स्त्रीने आपल्या मुलांना पण स्त्री शक्तीचा सन्मान करायला शिकवले पाहिजे.  ते जिजाबाईंचे संस्कारच होते ज्यामुळे शिवाजी महाराजांनि  वयाच्या नवव्या वर्षी बलात्कारी पाटलाचा चौरंगा केला. 

स्त्री होणे इतके सोपे नाही आहे पण सहनशीलता , संयम आणि मेहनीतीच्या जीवावर हे स्त्रीपण स्त्री लीलया पार पडते.  कधी आई होऊन तर कधी ताई होऊन ती पुरुषाला माया लावते आणि पुरुषाची अर्धांगिनी बनून ती क्षणकाळची पत्नी आणि अनंत कालची माता बनते. असे बोलतात कि जर एक स्त्री शिकली तर सारा परिवार शिकतो , म्हणून जास्तीत जास्त स्त्रियांनी शिक्षणाला महत्व देऊन आपल्या आणि नारी शक्तीच्या उत्कर्षासाठी पुढे आले पाहिजे.
✍️जितेंद्र मनोहर शिंदे

Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात