गुड व्हाइब्स ओन्ली (Good Vibes Only)

 

''दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती'', अशी दिव्यत्वाची प्रचिती येते दिव्य माणसांकडून जी आपले जीवन जगाच्या कल्याणासाठी वाहून देतात. दैनंदिन जीवनात अशी माणसे मिळणे विरळेच पण काही माणसे जरूर मिळतात ज्यामुळे हृदयी वसंत फुलतो, मन फुलपाखरू बनते. अशी माणसे नेहमी जवळ असावी असे वाटते, अश्या माणसांकडून एक वेगळीच ऊर्जा आणि पॉसिटीव्हिटी मिळते ज्याला आपण गुड व्हाइब्स बोलतो.  

जीवनात गुड व्हाइब्स मिळण्यासाठी फक्त माणसं नाही तर परिस्थिती पण तेंव्हडीच जबाबदार असते. ज्यावेळी आपण आपल्या आवडत्या नयनरम्य हॉलिडे स्पॉट वर जातो त्यावेळी पण आपल्याला गुड व्हाइब्स मिळतात. एखादा सुंदर चित्रपट, सुंदर गाणे, सुंदर डान्स, मित्रमैत्रिणींचा साथ पण आपल्याला गुड व्हाइब्स देऊन जातो. गुड व्हाइब्स मिळण्यासाठी चांगली संगती, चांगली परिस्थिती जरुरीची आहे आणि ती निर्माण करणे काही अंशी आपल्या हातात आहे. जेव्हढे आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहतो, चांगले विचार करतो तेव्हढेच जास्त गुड व्हाइब्स आपल्या नशिबात असतात. 

एखादा सुंदर रोमँटिक कुटूंबवत्सल सिनेमा बघून मिळणाऱ्या सुंदर व्हाइब्स ह्या एखाद्या हिंसाप्रधान, मारझोड करणाऱ्या सिनेमा पेक्षा निश्चितच कित्येक पटींनी चांगल्या असतात. आपण काय बघतो , काय ऐकतो त्यांच्यानूसार मनात जे तरंग उठतात त्या नुसारच व्हाइब्स तयार होतात मग जर चांगल्या व्हाइब्स पाहिजे असतील तर चांगलेच निवडले पाहिजे. 

आजकाल समाजातील वास्तव दाखवण्याचा खटाटोपात सिनेमात अवास्तव हाणामारी, खुनशी वृत्ती, अनैतिकता, दाखवली जाते आहे, अश्या गोष्टीमुळे समाज जागृत होण्यापेक्षा एका वेगळ्याच निगेटिव्हिटी कडे ओढला जात आहे. हि अनैतिकता, हि हाणामारी मनात खोल जाऊन बसते आणि समाजात सगळीकडे तश्याच प्रकारचे लोक आहेत असा फार मोठा गैरसमज निर्माण होतो जो खूपच समाज विघातक आहे. समाजात अजून खूप चांगली माणसे आणि चांगली नीतिमत्ता आहे आणि त्यांच्या जिवावरच हा समाज उभा आहे. चांगला विचार केला तर चांगलंच मिळेल उगाचच निगेटिव्हिटी मनात भरून जगाला निगेटिव्ह वृत्तीने सामोरे गेल्यास आपलेच जास्त नुकसान होते. तर चला चांगले ऐकुया, चांगले बघूया, चांगले विचार करूया आणि क्षणाक्षणाला गुड व्हाइब्स घेऊया.

© जितेंद्र मनोहर शिंदे 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा

वेडात मराठे वीर दौडले सात

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)