Posts

Showing posts from December, 2023

थोडा है , थोडे कि जरुरत है

Image
''थोडा है , थोडे कि जरुरत है '', प्रत्येक जणांच्या आयुष्यातील हि सत्य परिस्थिती. अगदी बिलिअनर पण कदाचित हाच विचार करत असतील. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात काही ना काही इच्छा धरून असतो त्यातील सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही आणि पूर्ण झाल्या तरी तो पर्यंत नवीन इच्छांची भर पडलेली असते आणि मग परत परिस्थिती पुन्हा येऊन पोचते ''थोडा है थोडे कि जरुरत है'' वर. सगळ्यांना आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींची कमीच भासते , बाईक वाला कार इच्छितो , साधी कार वाला लक्झरी कार , लक्झरी कार वाला चार्टर प्लॅन अशी इच्छांची रांग वाढतच जाते , प्रत्येक जण 'थोडा और थोडा और' च्या चक्रात अडकलेला असतो.  ह्या थोडा और च्या मागे सर्वात मोठे कारण असते तुलना करण्याची वृत्ती , प्रत्येक जण आपली तुलना दुसऱ्या बरोबर करत असतो. सकृत दर्शनी समोरचा त्याला जास्त सुखी दिसतो आणि त्याच्या कडे असणारी प्रत्येक गोष्ट आपणाकडे पण आली कि आपण पण तेवढेच सुखी होऊ असे ज्याला त्याला वाटते , समोरच्या कडे असणाऱ्या भौतिक गोष्टींवरून त्याच्या सुखाची व्याख्या केली जाते.  ज्याच्या कडे जास्त भॊतिक गोष्टी , लक्झरी

कृतांत

Image
  नुकताच कृतांत सिनेमा बघायचा योग आला, वर्क लाईफ बॅलेन्स वर बोलणारा आणि माणसाने क्षणिक सुखामागे न पळता थांबणे पण महत्वाचे आहे हे अधोरेखित करणारा. आजकालच्या धावपळीच्या दुनियेत जोतो रेस मध्ये लागल्या सारखा पळत आहे, त्याला दुसऱ्यांसाठी, समाजासाठी क्षणाचीही उसंत नाही आहे. अगदी घरातील जिवाभावाच्या माणसांत मिसळणे हि आता दुर्मिळ झाले आहे .सकाळी लवकर उठून इतर कामगार जसे कामावर जातात तसे लॅपटॉप उचलून जाणारे कामगार पळत पळत कामावर पोचतात, जायची वेळ फिक्स असते पण यायची वेळ फिक्स नसते. दिवसागणीची कामे संपतात पण जबाबदाऱ्या संपत नाहीत, भविष्याचा विचार करून कंपनीच्या स्ट्रेटीजी नुसार अनेक आवाहनात्मक प्रोजेक्ट समोर उभे असतात आणि त्यांना सकसेसफुली कंप्लिट करण्यासाठी मग झोकून दिले जाते स्वतःला पूर्णवेळ कामामध्ये, अनेक प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रेझेंटेशन बनवली जातात, हे प्रेझेंटेशनचे दृष्टचक्र लवकर संपतच नाही.  ह्या कामाच्या आणि जबाबदारीच्या बोझ्याखाली सगळे अशे काही दबले गेलेले आहेत कि पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ चा बॅलेन्स सांभाळणे आजकाल अगदी कठीण झाले आहे. घरी आई वडील, बायको किंवा न्हवरा आणि मुले ह्यांची पण एक

अभिमन्यू चक्रव्यूह मे फस गया है तू I

Image
  महाभारतातील अभिमन्यू सगळ्यांनाच परिचित आहे. युद्ध काळात रचलेल्या सर्वात कठीण अश्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचा त्याने प्रयत्न केला होता पण अर्धवट ज्ञानाने तो ते पार करू शकला न्हवता आणि वीरगतीला प्राप्त झाला होता. आपल्या मातेच्या उदरात असताना भगवान श्रीकृष्णांनी हे ज्ञान त्याची माता सुभद्रेला संगितले होते पण ते ऐकता ऐकता ती झोपी गेली आणि अर्धवटच ज्ञान अभिमन्यू पर्यंत पोचू शकले. आजच्या कलियुगात पण एक सर्वसाधारण माणूस अश्याच अनेक चक्रव्यूहात सापडलेला दिसतो आणि जीवन जगण्याची कला पूर्ण पणे आत्मसात न केल्याने तो ह्या चक्रव्यूहातुन बाहेर पडू शकत नाही आणि पूर्ण आयुष्य ह्या चक्रात फसून  गेलेला असतो.  सर्वात पहिले चक्रव्यूह आहे ते प्रदूषणाचे, हे प्रदूषण आपण स्वतःहुन ओढून घेतले आहे. माणूस जसा जसा प्रगत होत जात आहे तसा तसा तो पर्यावरणाचा नाश करायला उठला आहे. कारखान्यांच्या धुरांड्यांमधून ओकणारा धूर, गाड्यां मधून निघणारा धूर, अनेक उपकरणांच्या वापराने होणारे ग्रीन हौसे गॅसेसचे उत्सर्जन, प्रचंड प्रमाणात होणारी जंगलतोड, शेतीसाठी वापरात येणारी अनेक प्रकारची केमिकल आणि त्यामुळे उतरलेली मातीची प्रत, ओझोन

ऍडव्हरटायझिंगची दुनिया - एक मायाजाल ( Advertising-An Illusion)

Image
  ऍडव्हरटायझिंग हा मार्केटिंगचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्याशिवाय कोणतेही प्रॉडक्ट यशस्वी होऊच शकत नाही. ऍडव्हरटायझिंगची कला दिवसांदिवस खूपच प्रगत होत जात आहे. कस्टमरना लुभावण्यासाठी, त्यांच्या काळजात हात घालण्यासाठी अनेक टेकनिक वापरल्या जातात. काही ऍडव्हरटायझ  मनाला  इतक्या  भुरळ पाडतात कि त्या वर्षानुवर्षे हृदयावर राज्य करतात,  त्यांच्या कॅप्शन आणि जिंगल  मनात  खोल  जाऊन बसतात. जस्ट डू इट - नाईक, दिमाग कि बत्ती जाला दे - मेंटॉस, दाग अच्छे है - सर्फ एक्सेल ह्या कॅप्शन आणि अमूल दूध पिता है इंडिया, वॉशिंग पावडर निरमा ह्या जिंगल वर्षानुवर्षे फेमस आहेत आणि एखाद्या फेवरीट गाण्यासारख्या आपल्या हृदयाच्या कोन्यात जागा बनवून आहेत. अनेक मॉडेलनी आपल्या करिअरची सुरवात ऍडव्हरटायझिंगनि केली आणि आत्ता त्या चित्रपट सृष्टीत फेमस तारका आहेत, अनेक क्रिकेटरनि आणि सेलिब्रिटीजनि ऍडव्हरटायझिंगच्या जीवावर करोडोंची संपत्ती कमावली आहे. हे सेलिब्रिटीज जनतेसाठी आयकॉन असतात आणि जनता त्यांचे अनुकरण करून ब्रँडकडे आकर्षित होते. हि ऍडव्हरटायझिंगची दुनिया आहेच अशी चकमकीत कि तरुणतरूणींवर ह्याचा जास्तच पगडा आहे आणि