नरो वा कुंजरो वा

 


महाभारतातील युधिष्ठिर आपणास चांगलाच परिचित आहे, युधिष्ठिर सत्याची कास धरून कधीही खोटं बोलणारी महान व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता. गुरु द्रोणाचार्य ज्यावेळी युद्धाची सूत्रे सेनापती म्हणून सांभाळत होते त्यावेळी कौरव सरशीत होते आणि त्यांना हरवणे कठीण जात होते अश्यावेळी द्रोणाचाऱ्यांना थांबवणे गरजेचे होते पण त्यांना थांबवणार कसे ? अश्या संकटकाळी युगंधर कृष्ण यांनी एक योजना बनवली ज्यामध्ये द्रोणाचाऱ्यांना शस्त्र खाली ठेवण्यासाठी मजबूर करण्याचा घाट घातला गेला

युद्ध चालू असताना अशी अफवा पसरवली गेली की आश्वाथमा मारला गेलाआश्वाथमा द्रोणाचाऱ्यांच्या पुत्राचे नाव होतेअफवेने द्रोणाचार्य तुटून गेले पण बातमी खरी का खोटी याची त्यानां शंका आली. बातमीची पुष्टी करण्यासाठी ते सरळ युधिष्ठिराकडे गेले आणि त्यांनी त्याला विचारले की खरंच आश्वाथमा मारला गेला का. ह्या प्रश्नावर युद्धिष्ठिराने दिलेले उत्तर होते ''अश्वथामा हथ इति नरो वा कुंजरो वा'' अर्थात आश्वाथामा मारला गेला आहे पण माहित नाही  नरो वा कुंजरो वा म्हणजे हत्ती का नरयुद्धष्टीराच्या ह्या उत्तराने द्रोणाचाऱ्यांनी शस्त्र खाली ठेवली आणि श्रीकृष्णांनी त्यांचा वध करायला दृष्टद्यूमला प्रवृत्त केले.

सगळ्यांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात ज्यावेळी त्यांना नरो वा कुंजरो वा असा पवित्रा घ्यावा लागतो. मग ते लहान मुलांच्या ख़ुशीसाठी किंवा वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी असेल. आजच्या कलियुगात अनेक जण हाच पवित्रा घेऊन आहेत, कोणीही पूर्णपणे सत्याची कास धरून जे घडत आहे ते चुकीचे आहे म्हणून म्हणायला धजावत नाही आहे. परिस्थिती ची पूर्ण जबाबदारी घेण्यापासून पळवाटा शोधणारेआपल्या स्वार्थासाठी, क्षणिक सुखासाठी अनेक बाबतीत नरो वा कुंजरोचा पाढा वाचताना दिसतात.

नरो वा कुंजरो वा हे एक अर्ध सत्य आहे, भगवान श्रीकृष्णाने ते अर्धसत्य युधीष्टीराकडून वदवून घेतले होते आणि त्यामागे फार मोठा उद्देश होता पण आतां दैनंदिन जीवनात जे अर्धसत्य बोलले जाते त्याचा निश्चितच काहीतरी स्वार्थी उद्देश असतो.  

आपल्याला पण येणाऱ्या आयुष्यात अश्या ''नरो वा कुंज रोवा'' ला सामोरे जायची अनेक वेळा वेळ येईल, अश्या वेळी आपल्या सद्सद विवेक बुद्धीचा वापर करूनच निर्णय घेणे योग्य ठरेल कारण समोरच्याच्या उत्तरामध्ये त्याचा वैयक्तिक स्वार्थ किती आणि सत्यता किती हे ओळखणे एक मोठी कसोटीच असते आणि त्या कसोटीमध्ये प्रत्येक वेळी आपण यशस्वी ठरू शकतो ह्याची खात्री नाही. आज जग ''सत्यम शिवम सुंदरम'' पासून फारकत घेऊन वेगळ्याच द्रुश्यम च्या दुनियेत जगत आहे. 


जे समोरच्याला आवडेल, ज्या गोष्टींमुळे माझी भरभराट होईल, जे मला इन्स्टंट यश मिळवून देईल तेच सत्य आहे, तेच सुंदर आहे. सत्य हेच शिव आहे ह्याचा आता सगळ्यांना विसर पडला आहे, आज खऱ्या अर्थाने सत्याला शोधण्याची गरज आहे तरच जीवन सुंदर बनू शकेल.

© जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात