कृतांत

 

नुकताच कृतांत सिनेमा बघायचा योग आला, वर्क लाईफ बॅलेन्स वर बोलणारा आणि माणसाने क्षणिक सुखामागे न पळता थांबणे पण महत्वाचे आहे हे अधोरेखित करणारा. आजकालच्या धावपळीच्या दुनियेत जोतो रेस मध्ये लागल्या सारखा पळत आहे, त्याला दुसऱ्यांसाठी, समाजासाठी क्षणाचीही उसंत नाही आहे. अगदी घरातील जिवाभावाच्या माणसांत मिसळणे हि आता दुर्मिळ झाले आहे .सकाळी लवकर उठून इतर कामगार जसे कामावर जातात तसे लॅपटॉप उचलून जाणारे कामगार पळत पळत कामावर पोचतात, जायची वेळ फिक्स असते पण यायची वेळ फिक्स नसते. दिवसागणीची कामे संपतात पण जबाबदाऱ्या संपत नाहीत, भविष्याचा विचार करून कंपनीच्या स्ट्रेटीजी नुसार अनेक आवाहनात्मक प्रोजेक्ट समोर उभे असतात आणि त्यांना सकसेसफुली कंप्लिट करण्यासाठी मग झोकून दिले जाते स्वतःला पूर्णवेळ कामामध्ये, अनेक प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रेझेंटेशन बनवली जातात, हे प्रेझेंटेशनचे दृष्टचक्र लवकर संपतच नाही. 

ह्या कामाच्या आणि जबाबदारीच्या बोझ्याखाली सगळे अशे काही दबले गेलेले आहेत कि पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ चा बॅलेन्स सांभाळणे आजकाल अगदी कठीण झाले आहे. घरी आई वडील, बायको किंवा न्हवरा आणि मुले ह्यांची पण एक दुनिया आहे ज्यामध्ये आपण एक महत्वाचे किरदार आहोत आणि त्यांचे पण आपण काही देणे लागतो, त्यांच्याबद्दल असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्या तसेच आपले ऋणानुंबांध सांभाळणे पण तितकेच महत्वाचे असते पण ह्या सर्वासाठी वेळच नसतो. आजकालची जीवघेणी स्पर्धा आपणाला रेस मध्ये उतरवते आणि दुसरा कोणी आपल्या पुढे जाऊ नये म्हणून आपण नुसते सुसाट पळत असतो, ह्या पाळण्यामध्ये सर्व काही मागे सुटून जाते, आपली नाती, आपली माणसे, आपले जिवाभावाचे मित्र मैत्रिणी सगळे मागे पडतात. पळावे कि थांबावे हाच मोठा प्रश्न असतो ज्याचे उत्तर कोणाकडेच नसते.


सिनेमा मधील केरेक्टर पण ह्याच दृष्टचक्रात अडकलेला. आपली आई, बायको आणि लहान मुलगी ला वेळ न देणारा, आपल्या मित्रां पासून  पण तुटलेला असतो पण कोकणामध्ये मित्राच्या गावामध्ये जाताना त्याला एक विदुषी व्यक्ती भेटते जी त्याला आयुष्यातील संयमाचे महत्व समजावते, काही काळ थांब नुसता पळत बसू नकोस म्हणून समजावते. तो ते समजतो पण सगळे जण समजू शकतील का ? समजेल पण उमजू शकेल का ? कारण प्रश्न पुन्हा रेस चा येतो, जर मी पळायचा थांबलो तर कोणी तरी पुढे जाईल मग मी मागे पडेन, ठीक आहे मागे पडलो तरी चालेल थोडे प्रोमोशन वैगेरे कमी मिळेल, पगारवाढ कमी मिळेल ते चालवून घेऊ पण आजकाल अशी वेळ आहे कि जो थांबला तो संपला, उद्या तो किंवा ती आपली नोकरी टिकवू शकेल का हा पण प्रश्न उभा होतो, आता थांबणे नाही फक्त पळत राहणे कारण थांबणे म्हणजे संपणे.

आजकालचे कार्पोरेट कल्चर ह्याला जबाबदार आहे, कमीतकमी इनपुट मध्ये जास्तीतजास्त आउटपुट, कमीतकमी रिसोर्सेस मध्ये जास्त काम, ऑफिस मध्ये काम सोडून कुठल्याही गोष्टींना महत्व दिले जात नाही, एम्प्लॉयी एंगेजमेंट, पीपल फर्स्ट ह्या सर्व गोष्टी एचआर पॉलिसी पुरत्याच कागदोपत्री असतात पण रिऍलिटी काही वेगळीच असते. टॉप मॅनेजमेंट कडून आलेल्या कामाच्या प्रेशर मुळे वर्कलाईफ बॅलेन्स चा मेळच बसत नाही, प्रोजेक्ट्स आणि त्यांचे टार्गेट्स हेच जीवन बनून जाते आणि मग थांबणं राहूनच जाते. 

हे सर्व थांबवायचे असेल तर सध्याचे वोर्कोहोलिक कल्चर संपले पाहिजे, टार्गेट्स असावीत कंपनीची आणि प्रत्येक एम्प्लॉयीची, पण त्या सर्वांबरोबर एम्प्लॉयीचा वर्क लाईफ बेलेंस संभालणारी मॅनेजमेंट पॉलिसी पण असावी, कामाच्या वेळेपेक्षा कामाच्या इफ्फेक्टिव्हनेस वर लक्ष दिले पाहिजे. आणि हा इफेक्टिव्हनेस येण्यासाठी एम्प्लॉयीला आपल्या फॅमिलीबरोबर आणि मित्र मैत्रिणी बरोबर वेळ देण्यासाठी कामाच्या वेळेची पण बंधने आखणे जरुरीचे आहे. जो खरोखरच हुशार आणि इफ्फेक्टिव्ह काम करणारा असतो तो चांगले रिझल्ट देतोच. प्रत्येक कापोरेट कंपनीतील  मॅनेजमेंटने आपल्या टीमच्या आणि कंपनीच्या भल्यासाठी जास्तीतजास्त एम्प्लॉयीना वेळेवर घरी जाऊन आपल्या फॅमिलीला वेळ देण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे तरच कुठेतरी फरक पडेल कारण शेवटी कल्चर बदलणे त्यांच्या आणि आपल्याच हातात आहे.

© जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात