ऍडव्हरटायझिंगची दुनिया - एक मायाजाल ( Advertising-An Illusion)

 


ऍडव्हरटायझिंग हा मार्केटिंगचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्याशिवाय कोणतेही प्रॉडक्ट यशस्वी होऊच शकत नाही. ऍडव्हरटायझिंगची कला दिवसांदिवस खूपच प्रगत होत जात आहे. कस्टमरना लुभावण्यासाठी, त्यांच्या काळजात हात घालण्यासाठी अनेक टेकनिक वापरल्या जातात. काही ऍडव्हरटायझ मनाला इतक्या भुरळ पाडतात कि त्या वर्षानुवर्षे हृदयावर राज्य करतात,  त्यांच्या कॅप्शन आणि जिंगल  मनात खोल जाऊन बसतात. जस्ट डू इट - नाईक, दिमाग कि बत्ती जाला दे - मेंटॉस, दाग अच्छे है - सर्फ एक्सेल ह्या कॅप्शन आणि अमूल दूध पिता है इंडिया, वॉशिंग पावडर निरमा ह्या जिंगल वर्षानुवर्षे फेमस आहेत आणि एखाद्या फेवरीट गाण्यासारख्या आपल्या हृदयाच्या कोन्यात जागा बनवून आहेत.

अनेक मॉडेलनी आपल्या करिअरची सुरवात ऍडव्हरटायझिंगनि केली आणि आत्ता त्या चित्रपट सृष्टीत फेमस तारका आहेत, अनेक क्रिकेटरनि आणि सेलिब्रिटीजनि ऍडव्हरटायझिंगच्या जीवावर करोडोंची संपत्ती कमावली आहे. हे सेलिब्रिटीज जनतेसाठी आयकॉन असतात आणि जनता त्यांचे अनुकरण करून ब्रँडकडे आकर्षित होते. हि ऍडव्हरटायझिंगची दुनिया आहेच अशी चकमकीत कि तरुणतरूणींवर ह्याचा जास्तच पगडा आहे आणि ती त्याचे अंधानुकरण करायला लागली आहे. काही ऍडव्हरटायझ ह्या खरंच फक्त प्रोमोशनसाठी नसून समाजामध्ये चांगला संदेश देणाऱ्या पण असतात, फॅमिली वॅल्यु आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पण असतात.


पण सध्याच्या पैसापिपासूं वृत्तीमुळे ह्यांच्यातील असलेली मर्यादांची एक पुसटशी रेषा हळू हळू पुसून जात आहे जे समाज विघातक आहे. सुपरस्टार गुटखा आणि पान मसालाची ऍडव्हरटायझ करतात, दिग्गज क्रिकेटर रम्मी आणि ऑनलाईन गेमिंग एप चे प्रोमोशन करतात, ऍडव्हरटायझ मध्ये महिलांना एक शोपीस म्हणून वापरून वल्गरिटीला प्रोत्साहन दिले जात आहे, जुन्या रूढी आणि परंपरांना बगल देत बंडपणाला प्रोत्साहन देत समाजातील काही वर्गाच्या भावनांशी खेळ खेळला जातो. ह्या ऍडव्हरटायझ ज्यावेळी सेलिब्रिटीज प्रेझेंट करतात त्यावेळी हे सर्व समाजग्राह्य आहे आणि हीच आपली संस्कृती आहे असा एक समज हळूहळू पसरू लागला आहे आणि आपण सामाजिक अधोगतीकडे वाटचाल करू लागलो आहोत. हि अधोगती थांबवण्यासाठी गरजेचे आहे ह्या ऍडव्हरटायझिंगवर पण मर्यादेचे नियम घालणे आणि त्याहूनही जास्त महत्वाचे म्हणजे जे वाईट आहे ते खरंच वाईट आहे हे आपल्या तरुण पिढीच्या मनावर बिंबवणे. 

© जितेंद्र मनोहर शिंदे 


Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात