Posts

Showing posts with the label कविता

कातर वेळ

Image
                                                                                  संध्याकाळी मी प्रवास करत नाही , कारण संध्याकाळी मी माझा राहत नाही. आठवणींचा कल्लोळ माजतो मनात आणि मन गुंतत जाते भूतकाळात. अनेक प्रसंग , अनेक माणसे डोकावून जातात , कधी मनाला दुखावून तर कधी सुखावून जातात .  मन वेडे शोधत असते जुने सुखाचे क्षण , पण का राहून राहून आठवतात ते कठोर यातना दायी क्षण. गाडी जशी घेते वेग तश्या ह्या आठवणी पण जोराने उचंबळून येतात , किती सावरता सावरल्या तरी मनाला हरवून जातात. मनाला सावरणे हे केवळ निमित्त असते , खरे म्हणजे स्वतःला न दुखावू देण्याचा   एक अट्टाहास असतो. तरी मन बावरे काही माझे ऎकत नाही , किती सावरता सावरले तरी पुन्हा येते आठवणींवरी. काही सुंदर आठवणी मनाला हरखून टाकतात आणि पुन्हा पुन्हा फिरून मनावर घिरट्या मारतात. संध्याकाळच्या कातर वेळीचा   प्रवास हा एक अजब अनुभूती असते , ती घ्यावी का ना घ्यावी हीच   मोठी पंचाईत असते. © जितेंद्र मनोहर शिंदे   

मै खेलेगा I

Image
                                                                                           '' मै खेलेगा '' क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस. अनेक फास्ट बॉल येतील, तूला झुकवतील, तूला जखमी करतील, क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस. अनेक अपील होतील, अनेक जण तूला डिवचतील, विचलित होऊ नकोस, क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस. अनेक वेळा पळताना तूला प्रतिस्पर्धी रन आउट करायला बघतील, पळत रहा, वेळेवर क्रिज वर परत ये आणि पून्हा एकदा क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस. अनेक वेळा तू उचललेला बॉल सीमारेषेवर झेलण्याचा प्रयत्न होईल, तू तुझ्या फटक्याची उंची वाढव आणि बॉलला सीमारेषेपार पोचव आणि पुन्हा एकदा क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस. अनेक वेळा तूला बिट केले जाईल, तुझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी चुहुबाजूने फिल्डिंग लावली जाईल तू बॉल वर लक्ष केंद्रित कर आणि पुन्हा एकदा क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकॊस. एखादा बाऊन्सर तूला रक्तबंबाळ करेल, जग तुझी कीव करेल पण तू स्वतःची कीव करू नकोस, डगमगून न जाता पुन्हा एकदा क्रिझ वर ऊभा रहा क्रिझ सोडू नकोस  आणि सांग ठणकावून पुऱ्या जगाला 'मै खेलेगा'. भ