मै खेलेगा

                                                                         '' मै खेलेगा ''

क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस.

अनेक फास्ट बॉल येतील, तूला झुकवतील, तूला जखमी करतील, क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस.

अनेक अपील होतील, अनेक जण तूला डिवचतील, विचलित होऊ नकोस, क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस.

अनेक वेळा पळताना तूला प्रतिस्पर्धी रन आउट करायला बघतील, पळत रहा, वेळेवर क्रिज वर परत ये आणि पून्हा एकदा क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस.

अनेक वेळा तू उचललेला बॉल सीमारेषेवर झेलण्याचा प्रयत्न होईल, तू तुझ्या फटक्याची उंची वाढव आणि बॉलला सीमारेषेपार पोचव आणि पुन्हा एकदा क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस.

अनेक वेळा तूला बिट केले जाईल, तुझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी चुहुबाजूने फिल्डिंग लावली जाईल तू बॉल वर लक्ष केंद्रित कर आणि पुन्हा एकदा क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकॊस.

एखादा बाऊन्सर तूला रक्तबंबाळ करेल, जग तुझी कीव करेल पण तू स्वतःची कीव करू नकोस, डगमगून न जाता पुन्हा एकदा क्रिझ वर ऊभा रहा क्रिझ सोडू नकोस  आणि सांग ठणकावून पुऱ्या जगाला 'मै खेलेगा'.

भारत रत्न, मास्टर ब्लास्टर एक महान फलंदाज आणि तितकेच महान व्यक्तिमत्व सचिन रमेश तेंडुलकर यांस समर्पित.

#sachin tendulkar 

© जितेंद्र मनोहर शिंदे 


टिप्पण्या

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

वेडात मराठे वीर दौडले सात

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)