आज सोनियाचा दिनू

आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू... हरी पहिला रे.. हरी पहिला रे... आज रामलल्ला आयोध्येत विराजमान झाले आणि पाचशे वर्षाचा इंतजार संपला. ह्याच देही ह्याच डोळा हा सोहळा बघायला मिळाला. हा सोहळा बघण्यासाठी गेली पाचशे वर्षे आपले पूर्वज झगडले. आज शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आणि कित्येक शूरवीरांचा आत्मा सुखवला असेल. जे काही घडत आहे ते दिव्य आहे आणि त्यासाठी लाखो रामभक्तांचे बलिदान आहे.  रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा होऊन त्याच्या पाठोपाठ रामराज्याची पण नांदी व्हावी. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मसुर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्रणिजात. सकलजन सुखी होऊन विश्वशांती लाभावी हीच रामलल्लाच्या चरणी प्रार्थना.
🚩🚩🚩जय श्रीराम 🚩🚩🚩

© जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात