नॅरेटीव्ह
II नॅरेटीव्ह II नॅरेटीव्ह हा नॅरेटीव्ह असतो तो खरा किंवा खोटा नसतो. तो पसरलेला किंवा पसरवलेला नसतो, त्याला कोणाचा चेहरा किंवा मुखवटा नसतो, तो जसा असतो तसाच असतो. तो माणसाच्या मनातून आकार घेतो, माणसाच्या वर झालेले संस्कार, त्याची संगत, त्याची मॅच्युरिटी आणि सदसद विवेक बुद्धी त्याला फुलवते, खत पाणी घालते. हातात बंदूक घेणारा रक्षक का भक्षक ? मनाचे तराजूच ठरवतात सारे. समोर दिसते ते मनात छापते आणि त्याची सारासार विवेक बुद्धी आपला नवा नॅरेटीव्ह उभा करते. तो नॅरेटीव्ह खरा किंवा खोटा नसतो, फक्त तो त्याच्या सुपीक मेंदूची पैदाईश असतो, म्हणूनच नॅरेटीव्ह हा नॅरेटीव्ह असतो जो प्रत्येकाचा वेगळा असतो. तासन तास स्क्रीन वर स्क्रॉल करत जमवलेला माहितीचा खजिना ज्यावेळी बुद्धीच्या चाळणीतून गाळून स्वतःलाच सर्व्ह केला ...