'' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ''
कान्हा, कृष्णा, मधूसुदना किती नावांनी पुकारू तुजला. कान्हा बरोबर असणारे नाते शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही.
कान्हाच्या बाललीला, कान्हाचा बालपराक्रम, कान्हाच्या रासलीला सगळ्या गोष्टी कश्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत.
भगवतगीता म्हणजे जीवनाचा भवसागर पार करण्याचा राजमार्ग, ज्याला गीता समजली त्याला जीवन समजले. आम्ही पामर अजून गीतेला जीवनात उतरवू शकलो नाही.
विठ्ठलाच्या अभंगामध्ये तल्लीन होत कधी कान्हाचे वेड लागले ते समजलेच नाही. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांमागे नाचणारे भक्तजण बघून विठ्ठलाची ओढ लागली. पंढरपूरला जेव्हा पहिल्यांदा विठ्ठलाचे दर्शन घेतले होते तेव्हा ब्रम्हानंदाची अनुभूती आली होती ,तीच अनुभूती द्वारकेला आली होती.
आर्ट ऑफ लिविंग चे कोर्स केले त्यावेळेच्या गुरुजींच्या प्रत्येक शब्दागणिक कृष्ण जवळचा वाटू लागला. आयुष्यात आलेले काही प्रसंग मला खुणावून गेले कि तो नेहमी पाठीशी आहे, फक्त श्रद्धा ठेव आणि आपले कर्म करत जा फळ तुला योग्य वेळी मिळेल.
जीवनात प्रारब्ध कोणालाच चुकला नाही , कोणत्याही चांगल्या वाईट प्रसंगात तुझ्या नामाचा विसर पडू नको आणि
कान्हा कडे बस एकच मागणे, तू माझा आणि माझ्या परिवाराचा सांगाती राहा. ''जेथे जातो तेथे तू माझा सांगाती''
© जितेंद्र मनोहर शिंदे
Comments
Post a Comment