कॉफी विथ नौटंकी

जगामध्ये अनेक हस्ती आहेत ज्यांनी आपल्या अभूतपूर्व यशाने जगामध्ये नाव कमावले , त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उठवला आणि ते त्या क्षेत्राचे हिरो बनले. अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये प्रत्येक जण आपला ठसा उठवतात जसे क्रीडा , कला , राजकारण, चित्रपट आणि आता सध्या फेमस होत असवणारे सोशल मीडिया चॅनेल्स.

सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एखाद्याने मिळवलेले यश लपून राहू शकत नाही आणि क्षणार्धात बातमी पसरून तो किंवा ती हिरो बनते, अनेक वाहिनीनवर बातमी पसरते , मुलाखती चालू होतात, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन अनेक यंगस्टर त्यांना फॉलो करायला तयार होतात. त्यांना मिळालेले यश कधी कधी टिकून राहते किंवा लवकरच लोग त्यांना विसरून जातात कारण यश मिळवणे कठीण आहे पण टिकवणे त्याहून कठीण. अश्यावेळी हे क्षणकाळाचे स्टार आपापल्या पर्सनल ब्रॅण्डिंग वर काम करायला लागतात , काहीही करून , येन केन प्रकाराने ते लोकांच्या दृष्टी समोर राहू पाहतात. लोकांनी त्यांना सर्च करावे किंवा त्यांना विसरून न जावे तसेच त्यांच्या क्षेत्रात त्यांना सतत काम मिळावे म्हणून अशी लोक आपल्या भोवती एक वलय बनवण्याचा प्रयत्न करतात.


चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील हिरोंना जास्त फॉलोवर असतात आणि ज्यांच्या पर्सनल बाबींमध्ये पण लोकांना जास्त इंटरेस्ट असतो.  मग चालू होतात गॉसिप आणि त्यांची फिरकी घेण्यावर आधारित शो. ऑब्व्हियसली हे सगळे प्लॅन असते , वाहिन्यांची टीआरपी वाढवणे आणि कलाकारांची प्रसिद्धी वाढवणे हाच त्याच्या मागे उद्देश असतो. एखाद्या कलाकाराच्या पर्सनल लाईफ मधील रिलेशन्स, अफेअर्स आणि बरेच काही चव्हाट्यावर आणून सर्वांच्या समोर चघळले जाते , त्यांचे वस्त्रहरण केले जाते आणि त्याच्यामध्ये सगळे जण एन्जॉय करतात. ह्या मध्ये कलाकारांची पण मूक हो असते.


पडद्यावर असे काही रंगवले जाते कि कलाकाराची फिरकी घेतली जात आहे त्याच्या कडून त्याच्या पर्सनल बाबी अनावधानाने काढून  घेतल्या जात आहेत आणि हळू हळू तो उघडा पडत आहे , त्याने किंवा तिने लहानपणी केलेल्या अनैतिक गोष्टी , युवावस्थेत केलेला लंपटबाजपणा आणि सध्या चालू असलेला स्वैराचार चघळून चघळुन सगळ्यांसमोर आणला जातो आणि ह्या सर्व गोष्टींनी शोची टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो , आणि त्या कलाकाराला लाइम लाईट मध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो.

असा शो प्रसिद्ध होतो आणि भरघोस कमावतो, पण ह्या सर्वामध्ये भरकटला जातो तो त्यांचा फॉलोवर आणि सामान्य प्रेक्षक जे गोस्सीपच्या नादाला लागून ह्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि ह्या बाजारू माणसांना पैसे कमावण्याचा मार्ग मोकळा करतो. आपण जेवढे ह्या बाजारू वृत्तीला खतपाणी घालू तेवढी ती फोफावणार आणि समाजामध्ये एक कीड बनून वाढत जाणार, उद्या ह्या सेलिब्रिटींची जीवनशैली हीच योग्य जीवनशैली समजून त्यांचे फॉलोवर स्वतः पण तसेच वागू लागतील आणि सुरु होणार समाजाचे नैतिक अधपतन. हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि अश्या शोंना सामान्य प्रेक्षकांनी नाकारून एक नवीन पायंडा पडला पाहिजे.

© जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात