नाळ

आई जेव्हा बाळाला जन्म देते त्यावेळी बाळाला आईबरोबर जोडणारी नाळ असतें, हीच नाळ बाळाला पोटामध्ये असताना अन्न पुरवठा करत असतें. बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला आई पासून वेगळे करण्यासाठी हि नाळ कापावी लागते आणि नंतर बाळाचा एक स्वतंत्र प्रवास सुरु होतो. हिजी नाळ आहे ती जशी आई बरोबर बाळाला जोडते तशीच रक्त्याच्या नात्याची नाळ माणसाला कितीही दूर असला तरी आपल्या मूळ नात्यांकडे ओढत असतें. त्याचे मूळ गाव जेथे त्याचा जन्म आणि बालपण गेलेले असतें, त्याच्या लहान पणाच्या आठवणी, मित्र मैत्रिणी, शाळा, कॉलेज आणि अनेक गोष्टी त्याला आपल्या मुळाशी ओढत असतात पण अनेक वेळा रोजमाराच्या धावपळीच्या जिंदगीत तो आपल्या मुळापाशी वारंवार पोचू शकत नाहीं पण ती नाळ त्याला वारंवार आठवण देत असतें आणि ओढ कायम असतें.


रक्ताच्या नात्यांची ओढ काही औरंच असतें, भावा भावा मध्ये असणारी ओढ, भावा बहिणी मध्ये असणारी ओढ आयुष्य भर टिकून असते फक्त ती दिसून येतं नाहीं किंवा आजकाल माणसे जास्तच प्रॅक्टिकल व्हायचा प्रयत्न करत असतात त्यामुळे ती ओढ दबून गेलेली असतें पण संपलेली कधीच नसते. सगळ्या नात्यांमधला ओलावा तसाच असतो पण माणूस वर वर रुक्ष पणे वागून आणि क्षणिक फायद्याचा विचार करून किंवा सांसारिक अडचणीच्या वर मात न करता आल्यामुळे जास्तच प्रॅक्टिकल होऊन आपल्या नात्यांमध्ये व्यवहार आणून ती नाळ कायमची कापायचा प्रयत्न करतो पण कितीही झाले तरी ती नाळ कधीच कापली जात नाही. कितीही कठोर पणे वागले आणि व्यावहारिक झाले तरी भाऊ भाऊ किंवा बहीण भाऊ शेवटी एकत्र येतातच आणि जे एकत्र न येता आयुष्य भर एकमेकांवर राग काढत बसतात ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आपल्या चुकीची जाणीव होऊन आपल्या भावा किंवा बहिणीची वाट पाहत असतात पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते, नाळ तुटलेली नसते पण ती व्यक्ती खूप खूप दूर गेलेली असतें.

नात्यातला ओलावा टिकण्यासाठी नात्यांमध्ये व्यवहार न येणे खूप महत्वाचे आहे पण शेवटी आयुष्य म्हणजे व्यवहार आणि व्यवहार येतो वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणी मध्ये किंवा आई वडिलांच्या म्हातारं पणाच्या सांभाळण्यामध्ये , आता पर्यंत च्या समाजात घडलेल्या अनेक घटना ह्याच्या साक्षी आहेत पण त्याच्या मुळे पूर्ण समाज असाच आहे असे समजणे पूर्ण चुकीचे आहे.


आपल्या समाजावर रामायणाचे संस्कार आहेत, वडिलांच्या वचनाखातर वनवास घेणारा राम, रामाच्या पादुका आसनावर ठेऊन रामाची वाट पाहणारा भरत, रामाची सेवा करण्यासाठी त्याच्या बरॊबर वनवासात जाणारा  लक्ष्मण आणि कोणत्याही पदाची अपेक्षा न करता राज्याचे संरक्षण करणारा शत्रुघन. ह्या महापुरुषांनी जो मार्ग अंगीकरला तो सगळ्यांना अंगीकरणे कठीण आहे पण त्यांचा आदर्श अजूनही सगळ्यांना आहे म्हणूनच नात्यांमधील ओलावा अजून हि टिकून आहे आणि नाळ जोडलेली आहे आणि नेहमीच राहील.


नागराज मंजुळेंच्या नाळ भाग एक आणि दोन सिनेमा मध्ये दत्तक दिलेल्या मुलाची आपल्या आई आणि चिमुकली बहिणी बद्दल असणारी ओढ, मोठ्या माणसांची बहिणीला संपत्ती मधील हिस्सा न देण्यासाठी चाललेली भांडणे आपल्याला नात्यांमधील संघर्ष आणि भावनिक ओलावा दोन्हीची जाणीव करून देतो आणि लहान मुलांकडून आपण नाती कशी जपायची आणि नाळ कशी टिकवायची  ते शिकायला शिकवतो 

© जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Post a Comment

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात