पोस्ट्स

कॉफी विथ नौटंकी

इमेज
जगामध्ये अनेक हस्ती आहेत ज्यांनी आपल्या अभूतपूर्व यशाने जगामध्ये नाव कमावले , त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उठवला आणि ते त्या क्षेत्राचे हिरो बनले. अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये प्रत्येक जण आपला ठसा उठवतात जसे क्रीडा , कला , राजकारण, चित्रपट आणि आता सध्या फेमस होत असवणारे सोशल मीडिया चॅनेल्स. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एखाद्याने मिळवलेले यश लपून राहू शकत नाही आणि क्षणार्धात बातमी पसरून तो किंवा ती हिरो बनते, अनेक वाहिनीनवर बातमी पसरते , मुलाखती चालू होतात, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन अनेक यंगस्टर त्यांना फॉलो करायला तयार होतात. त्यांना मिळालेले यश कधी कधी टिकून राहते किंवा लवकरच लोग त्यांना विसरून जातात कारण यश मिळवणे कठीण आहे पण टिकवणे त्याहून कठीण. अश्यावेळी हे क्षणकाळाचे स्टार आपापल्या पर्सनल ब्रॅण्डिंग वर काम करायला लागतात , काहीही करून , येन केन प्रकाराने ते लोकांच्या दृष्टी समोर राहू पाहतात. लोकांनी त्यांना सर्च करावे किंवा त्यांना विसरून न जावे तसेच त्यांच्या क्षेत्रात त्यांना सतत काम मिळावे म्हणून अशी लोक आपल्या भोवती एक वलय बनवण्याचा प्रयत्न ...

बकेट लिस्ट २०२४

इमेज
                                                                         नवीन वर्षाचे स्वागत आपण सर्वांनी जोरात केले आणि आता हळू हळू २०२४ ची तारीख लिहिणे आपल्या हातवळणी पण होऊ लागले आहे. नवीन वर्ष, नवीन आशा, अनेक इच्छा आकांक्षा. नेहमी प्रमाणे पहिले काही दिवस नवीन वर्षासाठी केलेल्या संकल्पा नुसार अनेकांनी दिनक्रम चालू पण केला असेल. कदाचित योगा, ध्यान, चालणे, धावणे, वाचणे, लिहिणे आणि बरेच काही चालू केले असेल, काहींचा दिनक्रम अजूनही चालू असेल तर काहींनी बासनात गुंडाळून त्याला राम राम ठोकला असेल. संकल्प करणे चांगलेच आणि त्यांना पूर्णत्वाला नेणं अजूनही चांगले पण ह्या संकल्पा बरोबर एक दुसरी  गोष्ट करू शकतो ज्याला म्हणतात बकेट लिस्ट.  राहून गेलेले काहीतरी ज्याची इच्छा आपण लहानपणी, तरुणपणी किंवा एखाद्या नाजूक प्रसंगी केलेली असतें, ती इच्छा किंवा तिच्या सारख्या अनेक इच्छा मन...

थोडा है , थोडे कि जरुरत है

इमेज
''थोडा है , थोडे कि जरुरत है '', प्रत्येक जणांच्या आयुष्यातील हि सत्य परिस्थिती. अगदी बिलिअनर पण कदाचित हाच विचार करत असतील. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात काही ना काही इच्छा धरून असतो त्यातील सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही आणि पूर्ण झाल्या तरी तो पर्यंत नवीन इच्छांची भर पडलेली असते आणि मग परत परिस्थिती पुन्हा येऊन पोचते ''थोडा है थोडे कि जरुरत है'' वर. सगळ्यांना आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींची कमीच भासते , बाईक वाला कार इच्छितो , साधी कार वाला लक्झरी कार , लक्झरी कार वाला चार्टर प्लॅन अशी इच्छांची रांग वाढतच जाते , प्रत्येक जण 'थोडा और थोडा और' च्या चक्रात अडकलेला असतो.  ह्या थोडा और च्या मागे सर्वात मोठे कारण असते तुलना करण्याची वृत्ती , प्रत्येक जण आपली तुलना दुसऱ्या बरोबर करत असतो. सकृत दर्शनी समोरचा त्याला जास्त सुखी दिसतो आणि त्याच्या कडे असणारी प्रत्येक गोष्ट आपणाकडे पण आली कि आपण पण तेवढेच सुखी होऊ असे ज्याला त्याला वाटते , समोरच्या कडे असणाऱ्या भौतिक गोष्टींवरून त्याच्या सुखाची व्याख्या केली जाते.  ज्याच्या कडे जास्त भॊतिक गोष्टी , लक्झरी...

कृतांत

इमेज
  नुकताच कृतांत सिनेमा बघायचा योग आला, वर्क लाईफ बॅलेन्स वर बोलणारा आणि माणसाने क्षणिक सुखामागे न पळता थांबणे पण महत्वाचे आहे हे अधोरेखित करणारा. आजकालच्या धावपळीच्या दुनियेत जोतो रेस मध्ये लागल्या सारखा पळत आहे, त्याला दुसऱ्यांसाठी, समाजासाठी क्षणाचीही उसंत नाही आहे. अगदी घरातील जिवाभावाच्या माणसांत मिसळणे हि आता दुर्मिळ झाले आहे .सकाळी लवकर उठून इतर कामगार जसे कामावर जातात तसे लॅपटॉप उचलून जाणारे कामगार पळत पळत कामावर पोचतात, जायची वेळ फिक्स असते पण यायची वेळ फिक्स नसते. दिवसागणीची कामे संपतात पण जबाबदाऱ्या संपत नाहीत, भविष्याचा विचार करून कंपनीच्या स्ट्रेटीजी नुसार अनेक आवाहनात्मक प्रोजेक्ट समोर उभे असतात आणि त्यांना सकसेसफुली कंप्लिट करण्यासाठी मग झोकून दिले जाते स्वतःला पूर्णवेळ कामामध्ये, अनेक प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रेझेंटेशन बनवली जातात, हे प्रेझेंटेशनचे दृष्टचक्र लवकर संपतच नाही.  ह्या कामाच्या आणि जबाबदारीच्या बोझ्याखाली सगळे अशे काही दबले गेलेले आहेत कि पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ चा बॅलेन्स सांभाळणे आजकाल अगदी कठीण झाले आहे. घरी आई वडील, बायको किंवा न्हवरा आणि मुले...

अभिमन्यू चक्रव्यूह मे फस गया है तू I

इमेज
  महाभारतातील अभिमन्यू सगळ्यांनाच परिचित आहे. युद्ध काळात रचलेल्या सर्वात कठीण अश्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचा त्याने प्रयत्न केला होता पण अर्धवट ज्ञानाने तो ते पार करू शकला न्हवता आणि वीरगतीला प्राप्त झाला होता. आपल्या मातेच्या उदरात असताना भगवान श्रीकृष्णांनी हे ज्ञान त्याची माता सुभद्रेला संगितले होते पण ते ऐकता ऐकता ती झोपी गेली आणि अर्धवटच ज्ञान अभिमन्यू पर्यंत पोचू शकले. आजच्या कलियुगात पण एक सर्वसाधारण माणूस अश्याच अनेक चक्रव्यूहात सापडलेला दिसतो आणि जीवन जगण्याची कला पूर्ण पणे आत्मसात न केल्याने तो ह्या चक्रव्यूहातुन बाहेर पडू शकत नाही आणि पूर्ण आयुष्य ह्या चक्रात फसून  गेलेला असतो.  सर्वात पहिले चक्रव्यूह आहे ते प्रदूषणाचे, हे प्रदूषण आपण स्वतःहुन ओढून घेतले आहे. माणूस जसा जसा प्रगत होत जात आहे तसा तसा तो पर्यावरणाचा नाश करायला उठला आहे. कारखान्यांच्या धुरांड्यांमधून ओकणारा धूर, गाड्यां मधून निघणारा धूर, अनेक उपकरणांच्या वापराने होणारे ग्रीन हौसे गॅसेसचे उत्सर्जन, प्रचंड प्रमाणात होणारी जंगलतोड, शेतीसाठी वापरात येणारी अनेक प्रकारची केमिकल आणि त्यामुळे उतरलेली मात...

ऍडव्हरटायझिंगची दुनिया - एक मायाजाल ( Advertising-An Illusion)

इमेज
  ऍडव्हरटायझिंग हा मार्केटिंगचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्याशिवाय कोणतेही प्रॉडक्ट यशस्वी होऊच शकत नाही. ऍडव्हरटायझिंगची कला दिवसांदिवस खूपच प्रगत होत जात आहे. कस्टमरना लुभावण्यासाठी, त्यांच्या काळजात हात घालण्यासाठी अनेक टेकनिक वापरल्या जातात. काही ऍडव्हरटायझ  मनाला  इतक्या  भुरळ पाडतात कि त्या वर्षानुवर्षे हृदयावर राज्य करतात,  त्यांच्या कॅप्शन आणि जिंगल  मनात  खोल  जाऊन बसतात. जस्ट डू इट - नाईक, दिमाग कि बत्ती जाला दे - मेंटॉस, दाग अच्छे है - सर्फ एक्सेल ह्या कॅप्शन आणि अमूल दूध पिता है इंडिया, वॉशिंग पावडर निरमा ह्या जिंगल वर्षानुवर्षे फेमस आहेत आणि एखाद्या फेवरीट गाण्यासारख्या आपल्या हृदयाच्या कोन्यात जागा बनवून आहेत. अनेक मॉडेलनी आपल्या करिअरची सुरवात ऍडव्हरटायझिंगनि केली आणि आत्ता त्या चित्रपट सृष्टीत फेमस तारका आहेत, अनेक क्रिकेटरनि आणि सेलिब्रिटीजनि ऍडव्हरटायझिंगच्या जीवावर करोडोंची संपत्ती कमावली आहे. हे सेलिब्रिटीज जनतेसाठी आयकॉन असतात आणि जनता त्यांचे अनुकरण करून ब्रँडकडे आकर्षित होते. हि ऍडव्हरटायझिंगची दुनिया आहेच अशी चकमकीत...

गुड व्हाइब्स ओन्ली (Good Vibes Only)

इमेज
  ''दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती'', अशी दिव्यत्वाची प्रचिती येते दिव्य माणसांकडून जी आपले जीवन जगाच्या कल्याणासाठी वाहून देतात. दैनंदिन जीवनात अशी माणसे मिळणे विरळेच पण काही माणसे जरूर मिळतात ज्यामुळे हृदयी वसंत फुलतो, मन फुलपाखरू बनते. अशी माणसे नेहमी जवळ असावी असे वाटते, अश्या माणसांकडून एक वेगळीच ऊर्जा आणि पॉसिटीव्हिटी मिळते ज्याला आपण गुड व्हाइब्स बोलतो.   जीवनात गुड व्हाइब्स मिळण्यासाठी फक्त माणसं नाही तर परिस्थिती पण तेंव्हडीच जबाबदार असते. ज्यावेळी आपण आपल्या आवडत्या नयनरम्य हॉलिडे स्पॉट वर जातो त्यावेळी पण आपल्याला गुड व्हाइब्स मिळतात. एखादा सुंदर चित्रपट, सुंदर गाणे, सुंदर डान्स, मित्रमैत्रिणींचा साथ पण आपल्याला गुड व्हाइब्स देऊन जातो. गुड व्हाइब्स मिळण्यासाठी चांगली संगती, चांगली परिस्थिती जरुरीची आहे आणि ती निर्माण करणे काही अंशी आपल्या हातात आहे. जेव्हढे आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहतो, चांगले विचार करतो तेव्हढेच जास्त गुड व्हाइब्स आपल्या नशिबात असतात.  एखादा सुंदर रोमँटिक कुटूंबवत्सल सिनेमा बघून मिळणाऱ्या सुंदर व्हाइब्स ह्या एखाद्या हि...

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

इमेज
                                                                                   नॉस्टॅल्जिया, एक युनिवर्सल फिलींग ज्याच्यामधून कोणीच सुटू शकत नाही. भूतकाळात रमणे सगळ्यांनाच आवडते. भूतकाळातील रम्य आठवणी, तो किंवा तीच्या बरोबरीचे हळवे क्षण, मित्रांबरोबर केलेली दंगामस्ती, लहानपणीची शाळा, शिकवणी, महाबळेश्वर किंवा माऊंट अबूची सहल, एखादी आठवणीतील दिवाळी, मुंबई लोकलचा आणि डबल डेकरचा पहिला प्रवास, पहिला क्रश, सगळ्याच गोष्टी कश्या मनामध्ये उचंबळून येतात आणि मनाला पुन्हा पुन्हा त्या भूतकाळात घेऊन जातात आणि काही वेळेसाठी का होईना आपण तो प्रसंग पुन्हा जगतो, पुन्हा एकदा ती आणि तो हंसो का जोडा बनतात, पुन्हा मित्रांबरोबर शाळा भरते. नॉस्टेल्जीक बनण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी पण पुरेशा असतात, रोजच्या धकाधकीच्या जीवनात ज्यावेळी आपण थकून जाऊन जरा विसावयाला जातो...

सत्तेचा घोडेबाजार

इमेज
                                                                     नेता मोठा कि पक्ष मोठा ? नेता मोठा कि पक्षाचा सिद्धांत मोठा ? पक्ष मोठा कि नेता मोठा ? पक्ष मोठा कि नेत्याचा सिद्धांत मोठा ? एखादा पक्ष मोठा कि देश मोठा ? पक्षाने नेत्याला बनवले कि नेत्याने पक्षाला बनवले ? पक्षातील नेत्यांसाठी काम करायचे कि पक्षाच्या सिद्धांतांसाठी काम करायचे ? नीतिमूल्ये जपणाऱ्या नेत्याला आपला मानायचे कि सगळी नीतिमूल्ये चुलीत घालून फक्त सत्तेसाठी लाचार होणाऱ्या नेत्याला आपला नेता मानायचे ? राजकारणात सर्व काही क्षम्य असते का ? एकाने केली तर गद्दारी आणि दुसऱ्याने केली तर मुत्सद्देगिरी, संधीचे राजकारण करणाऱ्यांना डोक्यावर बसवायचे कि पायतानाने हाणायचे ? राजकारण राजकारण ह्या नावावर किती खपवून घ्यायचे ?  आज देशामधील राजकारणाची परिस्थिती बघता असे अनेक प्रश्न वारंवार मनात येतात, अरे कुठे न्हेऊन ठेवलंय राजकारणाला. आज राजकारणातील नीति...

'' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ''

इमेज
                                                              कान्हा, कृष्णा, मधूसुदना किती नावांनी पुकारू तुजला. कान्हा बरोबर असणारे नाते शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही. कान्हाच्या बाललीला, कान्हाचा बालपराक्रम, कान्हाच्या रासलीला सगळ्या गोष्टी कश्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. भगवतगीता म्हणजे जीवनाचा भवसागर पार करण्याचा राजमार्ग, ज्याला गीता समजली त्याला जीवन समजले. आम्ही पामर अजून गीतेला जीवनात उतरवू शकलो नाही.  विठ्ठलाच्या अभंगामध्ये तल्लीन होत कधी कान्हाचे वेड लागले ते समजलेच नाही. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांमागे नाचणारे भक्तजण बघून विठ्ठलाची ओढ लागली. पंढरपूरला जेव्हा पहिल्यांदा विठ्ठलाचे दर्शन घेतले होते तेव्हा ब्रम्हानंदाची अनुभूती आली होती ,तीच अनुभूती द्वारकेला आली होती. आर्ट ऑफ लिविंग चे कोर्स केले त्यावेळेच्या गुरुजींच्या प्रत्येक शब्दागणिक कृष्ण जवळचा वाटू लागला. आयुष्यात आलेले काही प्रसंग मला खुणावून गेले कि तो नेहमी...

चला हवा येऊद्या

इमेज
                                                                                          चला हवा येऊद्या - हास्याची एक अशी पर्वणी जी मला नवीन आठवड्याला सामोरा जाण्यासाठी ऊर्जा देते. गेले अनेक वर्षे मी चला हवा येऊ द्या बघत आहे आणि प्रत्येक एपिसोड्गणिक त्याच्या प्रेमात पडत गेलो आहे. खरच चला हवा येऊद्या ने जनमानसाची नाडी पकडली आहे. इतकी वर्षे हा कार्यक्रम चालत आहे पण त्याचा कंटाळा येत नाही, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी एक विविधता बघायला मिळते. ह्या कार्यक्रमाने विनोदाला एक नवी संजीवनी दिलेली आहे.  विनोदावर अनेक कार्यक्रम आले पण ह्यासम हाच. ह्यातिल विनोदाला एक उंची आहे आणि ईतक्या वर्षात ती कोठेही घसरलेली दिसत नाही. त्यात कोठेही अश्लिलता, असभ्यता दिसत नाही. ह्यातिल प्रत्येक पात्र जमिनीला घट्ट धरून, कठीण प्रसंगांना सामोरा ...

नरो वा कुंजरो वा

इमेज
  महाभारतातील युधिष्ठिर आपणास चांगलाच परिचित आहे,   युधिष्ठिर सत्याची कास धरून कधी ही खोटं न बोलणारी महान व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता . गुरु द्रोणाचार्य ज्यावेळी युद्धाची सूत्रे सेनापती म्हणून सांभाळत होते त्यावेळी कौरव सरशीत होते आणि त्यांना हरवणे कठीण जात होते अश्यावेळी द्रोणाचाऱ्यांना थांबवणे गरजेचे होते पण त्यांना थांबवणार कसे  ? अश्या संकट काळी युगंधर कृष्ण यांनी एक योजना बनवली ज्यामध्ये   द्रोणाचाऱ्यांना शस्त्र खाली ठेवण्यासाठी मजबूर करण्याचा घाट घातला गेला .  युद्ध चालू असताना अशी अफवा पसरवली गेली की आश्वाथमा मारला गेला .  आश्वाथमा द्रोणाचाऱ्यांच्या पुत्राचे नाव होते ,  अफवेने द्रोणाचार्य तुटून गेले पण बातमी खरी का खोटी याची त्यानां शंका आली . बातमीची पुष्टी करण्यासाठी ते सरळ युधिष्ठिरा कडे गेले  आणि त्यांनी त्याला विचारले की खरंच आश्वाथमा मारला गेला का . ह्या प्रश्नावर युद्धिष्ठिराने दिलेले उत्तर होते  '' अश्वथामा हथ इति नरो ...