पोस्ट्स

नॉस्टॅल्जिया लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

इमेज
                                                                                   नॉस्टॅल्जिया, एक युनिवर्सल फिलींग ज्याच्यामधून कोणीच सुटू शकत नाही. भूतकाळात रमणे सगळ्यांनाच आवडते. भूतकाळातील रम्य आठवणी, तो किंवा तीच्या बरोबरीचे हळवे क्षण, मित्रांबरोबर केलेली दंगामस्ती, लहानपणीची शाळा, शिकवणी, महाबळेश्वर किंवा माऊंट अबूची सहल, एखादी आठवणीतील दिवाळी, मुंबई लोकलचा आणि डबल डेकरचा पहिला प्रवास, पहिला क्रश, सगळ्याच गोष्टी कश्या मनामध्ये उचंबळून येतात आणि मनाला पुन्हा पुन्हा त्या भूतकाळात घेऊन जातात आणि काही वेळेसाठी का होईना आपण तो प्रसंग पुन्हा जगतो, पुन्हा एकदा ती आणि तो हंसो का जोडा बनतात, पुन्हा मित्रांबरोबर शाळा भरते. नॉस्टेल्जीक बनण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी पण पुरेशा असतात, रोजच्या धकाधकीच्या जीवनात ज्यावेळी आपण थकून जाऊन जरा विसावयाला जातो...