Posts

Showing posts with the label अध्यात्मिक

आज सोनियाचा दिनू

Image
आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू... हरी पहिला रे.. हरी पहिला रे... आज रामलल्ला आयोध्येत विराजमान झाले आणि पाचशे वर्षाचा इंतजार संपला. ह्याच देही ह्याच डोळा हा सोहळा बघायला मिळाला. हा सोहळा बघण्यासाठी गेली पाचशे वर्षे आपले पूर्वज झगडले. आज शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आणि कित्येक शूरवीरांचा आत्मा सुखवला असेल. जे काही घडत आहे ते दिव्य आहे आणि त्यासाठी लाखो रामभक्तांचे बलिदान आहे.  रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा होऊन त्याच्या पाठोपाठ रामराज्याची पण नांदी व्हावी. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मसुर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्रणिजात. सकलजन सुखी होऊन विश्वशांती लाभावी हीच रामलल्लाच्या चरणी प्रार्थना. 🚩🚩🚩जय श्रीराम 🚩🚩🚩 © जितेंद्र मनोहर शिंदे 

'' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ''

Image
                                                              कान्हा, कृष्णा, मधूसुदना किती नावांनी पुकारू तुजला. कान्हा बरोबर असणारे नाते शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही. कान्हाच्या बाललीला, कान्हाचा बालपराक्रम, कान्हाच्या रासलीला सगळ्या गोष्टी कश्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. भगवतगीता म्हणजे जीवनाचा भवसागर पार करण्याचा राजमार्ग, ज्याला गीता समजली त्याला जीवन समजले. आम्ही पामर अजून गीतेला जीवनात उतरवू शकलो नाही.  विठ्ठलाच्या अभंगामध्ये तल्लीन होत कधी कान्हाचे वेड लागले ते समजलेच नाही. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांमागे नाचणारे भक्तजण बघून विठ्ठलाची ओढ लागली. पंढरपूरला जेव्हा पहिल्यांदा विठ्ठलाचे दर्शन घेतले होते तेव्हा ब्रम्हानंदाची अनुभूती आली होती ,तीच अनुभूती द्वारकेला आली होती. आर्ट ऑफ लिविंग चे कोर्स केले त्यावेळेच्या गुरुजींच्या प्रत्येक शब्दागणिक कृष्ण जवळचा वाटू लागला. आयुष्यात आलेले काही प्रसंग मला खुणावून गेले कि तो नेहमी पाठीशी आहे, फक्त श्रद्धा ठेव आणि आपले कर्म करत जा फळ तुला योग्य वेळी मिळेल.  जीवनात प्रारब्ध कोणालाच चुकला नाही , कोणत्याही चांगल्या वाईट प्रसंगात तुझ्या नामाचा वि

शेवटचा दिस गोड व्हावा ह्याच साठी केला होता अट्टाहास

Image
शेवटचा दिस गोड व्हावा ह्याच साठी केला होता अट्टाहास. हा अट्टाहास आपण बघतो दिंडीच्या रूपात. माझ्यासाठी जगातले आठवे आछर्य म्हणजे ही दिंडी, भक्तीचा परमोच्च बिंदू म्हणजे ही दिंडी. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी ज्यांना फक्त पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास लागलेला असतो, त्यासाठी उनातानातून, पाऊस पाण्यातून त्यांची पाऊले चालत असतात पंढरी कडे. घरदार, नोकरीधंदा, सुखी संसार, सर्व बंधनातून मुक्त होऊन त्यांना फक्त आपल्या पांडूरंगाला भेटण्याचे वेध लागलेले असतात, ह्या वारीत तरुणां बरोबर तितकेच म्हातारे पण शामिल असतात आणि त्यांचा जोश भल्या भल्या तरुणाईला लाजवणारा असतो.  दिंडी मध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळत, भजने गात, टाळ चिपळ्यांच्या गजरात हा तांडा दिवसेंदिवस मार्ग आक्रमत असतो, ठरलेल्या ठिकाणी थांबत व ठरलेल्या ठिकाणी रिंगण करत वारी मार्गस्थ होत असते, रिंगण जीवनाच्या भावसागरातून भक्तिमार्गाकडे जायचा मार्ग दाखवते. पंढरीला पोचण्यासाठी दररोज ही तरुणाई पंचवीस तीस किलोमीटर चालते, चालता चालताना विठ्ठल नामाची शाळा भरते, भजन कीर्तनात लाखो वारकरी इतके दंग होतात की त्यांना सगळ्या संसाराचा