पोस्ट्स

त्या दोघी

इमेज
  त्या दोघी , दोघींनाही पहिल्यांदाच भव्यतेचा साक्षात्कार. एकीला मायाजलाचा भास तर दुसरीला उज्ज्वल भाग्याची आस. एकी समोर उभा राहतो कष्टमय भूतकाळ तर दुसरीला खुणावतो प्रकाशमय भविष्यकाळ  एक संसाराचा गाडा ओढून थकलेली तर दुसरी संघर्षासाठी खंबीर पणे उभी ठाकलेली. एकीचे डोळे वैभवाने दिपलेले तर दुसरीचे त्या वैभवाला मुठीत घेण्यासाठी हपापलेले. एक जीवनाला साध्या मार्गाने जगणारी तर दुसरी आपला नवा यशाचा मार्ग चोखनदळ पणे निवडणारी.  एक संसाराच्या मायाजाळातून बाहेर पडलेली तर दुसरी त्या  मायाजाळाकडे ओढत चाललेली. एक आयुष्याच्या रम्य संध्याकाळात रमलेली तर दुसरी उंच भरारी घेण्याच्या विश्वासाने भरलेली. ©   जितेंद्र मनोहर शिंदे

मेयाझगन

इमेज
  मेयाझगन हा तामिळ सिनेमा बघून महिना झाला पण त्याची गोडी अजूनही मनात तशीच रेंगाळून आहे. हा सिनेमा आजच्या घडीच्या सिनेमा पेक्षा पूर्णपणे वेगळ्या धाटणीचा आहे, आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगांचा आपल्या मनाच्या पटलावर खोल परिणाम होता, काही गोष्टी कायमच्या रुतून बसतात आणि आयुष्यभर सलत राहतात आणि आतून आपल्याला बदलून टाकतात. काही गोष्टी आपल्या चांगुल पणामुळे आपल्या हातून घडून जातात ज्याला आपण जास्त महत्व देत नाही पण त्याचा दुसऱ्याच्या जीवनावर फार मोठा परिणाम होऊन त्याच आयुष्य बदलून जातात ज्याची आपल्याला किंचित ही कल्पना नसते. काही नाती दूर राहिल्याने तुटल्यासारखी वाटतात पण तिच नाती अचानक समोर येऊन आपल्यावर एवढं प्रेम करतात की जीव गुदमरून जातो आणि आपण खरंच त्या प्रेमाच्या लायकीचे आहोत का हा प्रश्न उभा राहतो. हा सिनेमा म्हणजे नोस्टेलजियाचे एक सुंदर उदाहरणं आहे. आपले लहानपण आठवून त्या आठवणीत रमून जाऊन लहानपणीच्या सवंगड्या बरोबर काही काळ घालवणे किती आल्हाददायक असतें  हे ह्या सिनेमात दाखवलं आहे. लहानपणी भावकीच्या भांडणामध्ये अरुण स्वामीला आपले घरं सोडावे लागते जी गोष्ट त्याच्या कायमची जिव्...

विश्वविजेता गुकेश

इमेज
  तो विषविजेता बनला अवघ्या अठराव्या वर्षी, जगातील सर्वात तरुण विषविजेता, एवढ्या कोवळ्या वयात एवढं मोठं यश, अश्या यशाने एखाद्याने स्वतःला फार मोठा तीसमारखा समजून जिंकताच नाचून थयथयाट मांडला असता पण तो शांत होता त्या स्थितीत पण शांत होता.सर्वप्रथम त्याने चेसच्या सोंगट्या परत जागेवर लावल्या आणि अत्यंत आदरपूर्वक त्यांना नमन करून आपला आदर प्रगट केला, त्याने चेस ला प्रणाम केला आणि नंतर भावना अनावर होऊन तो रडला. तो आपले संस्कार आपली शिस्त ह्या परमोच्च यशाच्या क्षणी पण विसरला नाहीं आणि अश्या वागण्याने त्याने लाखो लोकांच्या हृदयात कायमची जागा बनवली. कुठून येते एवढी प्रगल्भता, धन्य ते गुकेश चे पालक ज्यांनी असं रत्न घाडवलं. ह्या Attitude of gratitude मुळेच तो जगजेत्ता बनला, असा जगजेत्ता पुन्हा होणं नाहीं, सलाम गुकेश 🙏🙏🙏 ©   जितेंद्र मनोहर शिंदे

युतीचा धर्म

इमेज
युतीचा धर्म सगळ्यांनी पाळला, कमळाने धनुष्या बरोबर घड्याळाला पण साथ दिली आणि मशाल तुतारीने हाताबरोबर मिळवणी केली. सगळं कसं लिहून दिल्यासारखं घडवण्याचा प्रयत्न झाला आणि आम्ही सर्व एक आहोत म्हणून नेते मंडळींनी जनतेसमोर आणाभाका घेतल्या. प्रचाराच्या फडामध्ये सगळं कसं वरवर ठीक होतं आतलं राजकारण मात्र वेगळंच चाललं होतं, आतल्याआत मशाल हाताला भारी पडत होती आणि तुतारी वाजवायला हात पुढे होतं न्हवता. कमळाच आणि धनुष्यच गणित तसं दिसायला चांगलच जुळलं होतं पण घड्याळ कधी कधी चुकीची वेळ दाखवत होतं.  युतीत सगळ्यांचं बरळण चालू होतं कारण ज्याला त्याला आपलाच एक्का चालवायचा होता, कोण मोठा कोण लहान ह्या संभ्रमात सगळेच होते कारण प्रत्येकाचा इतिहास फार मोठा कर्तृत्ववान होता. सगळे जण अजूनही त्या आपल्या इतिहासात रममाण होते आणि वस्तुस्थिती पासून थोडे दूरच होते. रेल्वेचे इंजिन आणि वंचित पण मोठ्या आत्मविश्वासाने भरून गेले होते.  प्रचाराच्या रणधुमाळीत सामान्य कार्यकर्ता संभ्रमातच राहिला कधी काळी ज्या हाताला शिव्या दिल्या आणि ज्याच्या बरोबर रस्त्यावर उतरून लढाया लढून चार गुन्हे आपल्यावर घेतले त्या हाताला आज स...

'' साडेसाती''

इमेज
जन्माला आला त्यावेळीच वजन थोडं कमी होतं पुढे जसा जसा मोठा होतं चालला तसा शरीरामध्ये प्रतिकार शक्तीची कमी असल्यामुळे वारंवार आजारी पडणं चालूच होतं , सर्दी खोकला जसा पाचवीलाच पूजला होता . अभ्यासात पण गती कमीच होती आणि कसा बसा वरच्या इयत्ता पार करत तो दहावी पर्यंत पोचला होता , दहावी त्याला जरा जास्तच कठीण जात होती . घरच्यांना त्याची खूप काळजी वाटायला लागली आणि ह्याचे भविष्यात काय होणार म्हणून त्याला एका ज्योतिष्याकडे दाखवण्यात आले . ज्योतिष्याने कुंडली मध्ये साडेसाती आहे म्हणून सांगितलं , त्यावेळी तो तसा लहान होता पण काहीतरी वाईट आहे आणि पुढं वाईटच होणार हे त्याला कुठे तरी समजलं आणि त्याची उरली सुरली हिम्मत पण तिथेच संपू लागली . तसा तो घरच्या वातावरणानुसार धार्मिक बनला होता पण आता त्याला जास्तच दैवी गोष्टींचा सहारा घ्यावासा वाटला , घरच्यांनी  बांधायला  गंडे दोरे दिले होते   आणि कसली तरी मोठी पूजा घालायचं मेतकूट घरात कुटले जात होतं पण त्याच्यासाठी ...

कर्मयोगी

इमेज
आज नानांना खूप उशिरा जाग आली, नेहमी पाच वाजता उठायची सवय पण काल रात्री झोपच येतं न्हवती आणि रात्री कधीतरी उशिरा डोळा लागला होता. लवकर लवकर आटपून ते नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉक ला निघाले, बरोबर कधीपासून वाट बघत बसलेला टॉमी होताच. आज वेळ चुकल्या मुळे म्हणा कदाचित सगळं कसं वेगळं वाटत होतं, रस्ता तोच पण माणसं वेगळी, प्रत्येकजण आपल्या धावपळीत, कोणी ऑफिसला जायच्या धावपळीत तर कोणी मुलांना शाळेत सोडायच्या धावपळीत. नेहमीचा फेरफटका मारून नाना उद्यानात आपल्या नेहमीच्या बाकावर बसले, मन मात्र जागेवर न्हवते ते केव्हाच भूतकाळात जाऊन पोचले होते. प्रख्यात मल्टि नॅशनल कंपनी मधून व्हाईस प्रेसिडेंटच्या पदावरून नाना निवृत्त झाले होते, एके काळी त्यांचा एक एक मिनिट मौल्यवान होता. महिन्यातून एक दोन फॉरेन टूर, आणि बाकी सर्व वेळ मिटिंगनें भरलेले कॅलेंडर, त्यांची सेक्रेटरी हे सर्व पाळता पाळता स्वतः थकून जात असे. नानांना ऑफिस मध्ये मान पण तेव्हडाच होता, कंपनीला बिलियन डॉलर कंपनी बनवण्यामध्ये नानांचा फार मोठा हात होता आणि नांनानी आयुष्यातील पुरी पस्तीस वर्ष कंपनीला दिली होती. मॅनेजमेंट ट्रेनीं ते व्हाईस प्रेसिडेंट ...

पापभिरू

इमेज
डिबीजे कॉलेज मधून बीकॉम झाल्यावर नोकरीच्या शोधात तो मुंबईला पोचला होता, चिपळूणच्या गावातील शाळेत शिक्षण पूर्ण करून मोठ्या उमेदीने गावातून येऊन जाऊन करून त्याने बी कॉम पूर्ण केलं होतं. आई वडिलांनी खूप हाल सोसून त्याला इथपर्यंत शिक्षण दिलं होतं आणि आता बावाने मुंबईला जाऊन चार पैसे मिळवून चांगले दिवस यावं म्हणून म्हातारा म्हातारीनी काळजावर दगड ठेऊन त्याला मुंबईला पाठवलं होतं.  मुंबईला एका दूरच्या चुलत्याच्या घरात उतरला  आणि नोकरीं शोधण चालू झालं. दोन महिने झाले तरी काय नोकरीं मिळेना, असा किती दिवस चुलत्यावर बोझा बनून राहायचं असं सारखं सारखं त्याला वाटू लागलं आणि उमेद तुटू लागली अशातच नवी मुंबई तील एका कंपनीत कंत्राटी पद्धती नें चालू असलेल्या भरतीत त्याला नोकरीं मिळाली आणि जीव भांड्यात पडला.  वीस हजार पगार होता पण चुलता डोंबिवलीला आणि नोकरीं नवी मुंबई ला त्यामुळे तिथं राहणं गरजेचं होतं आणि तसें पण आयुष्यभर चुलत्यावर त्याला बोझ बनायचं न्हवत. नोकरीं चालू व्हायच्या आधी घर शोध चालू झाली आणि अश्यातच एका मित्राच्या ओळखीने त्याला आयरोलीच्या एका रूम मध्ये इतर तीन मुलांबरोबर रूम शेअर ...

कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाई माझी

इमेज
मृग नक्षत्र आल्या नंतर सृष्टी हिरवा शालू ओढून सजते, पावसाच्या आगमनाने मन प्रफुल्लित होऊन जीवनात पण नवी पालवी फुटते. पावसाच्या आगमनानानंतर आपल्या संस्कृती मधील अनेक सण सनावळींना सुरवात होते. आधी नागपंचमी, वटपौर्णिमा, पंढरीची वारी, श्रावण महिन्याचे उपास तपास, व्रत वैकल्य, पाठोपाठ दहीकाला, रक्षा बंधन आणि नंतर येतो गणपती बाप्पा, मग दसरा, दिवाळी. अगदी दिवाळी पर्यंत कसा सगळं कॅलेंडर ब्लॉक असते.   हे येणारे सारे सण हर्षोउल्हासात साजरे करताना एक औरच मजा असते. काही सण महिलांसाठी असतात पण घरात मंगलमय वातावरण निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा येते, हे सण सनावळी घराघरात चैतन्य निर्माण करतात, सणामुळे नातेवाईक एकत्र येतात, भाऊ बहीण, मित्र परिवारात जवळीक वाढते आणि त्याच्यामुळेच सामाजिक सलोखा राखण्यास मदत होते, संस्कृती संवर्धन होऊन ति एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचते. आपल्या ह्या महान संस्कृतीनेच आपल्याला ह्या  सण सनावळींची भेट दिली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे सारे सण निसर्गाला अनुसरून साजरे केले जातात आणि निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिले आहे त्याचे आभार मानण्यासाठी निसर्गाची पूजा ...

नया दौर : आर्टिफिशियल इंटिलिजंस

इमेज
सत्तर च्या दशकात नया दौर नावाचा सिनेमा आलेला होता, बदलत्या जमान्यानुसार होणारे बदल दर्शवणारा आणि जुनी आणि नवीन जीवन पद्धतीतील संघर्ष दाखवणारा एक सुंदर चित्रपट. आता सत्तरचे दशक उलटून पाच दशके झाली आणि जर सत्तर च्या दशकात नया दौर आला होता तर आताच्या जमान्यात त्याची कितवी आवृत्ती चालू असेल ते समजून घ्यायला पाहिजे. बदल हा काळाची गरज आहे आणि तो टाळणे अटळ आहे पण त्या बदलाला आपण कसे सामोरे जातो ते महत्वाचे आहे.  असे म्हणतात कि माणूस पण हळू हळू विकसित होत गेला, वेळेनुसार बदल घडत माणसाचे आताचे रूप आले आणि पुढे कदाचित हे रूप बदलेल पण. डायनासोर काळानुसार स्वतःला बदलू शकले नाहीत म्हणून नामशेष झाले, बदल हा टाळता येत नाही, सर्वात प्रथम बदला बद्दल जाणून घेणे गरजेचे आहे, त्याच्या मुळे  होणारे फायदे, तोटे आणि बदलणारे आपले जीवनमान ह्याचा आढावा घेऊन त्या बदलाला हळू हळू अंगिकारले पाहिजे त्याच्या मध्येच सगळ्यांचे भले असते.                                      ...

अश्वमेध 2024..चारसो पार

इमेज
तो आला, त्याने पाहिले, तो झुंजला, समोर चक्रव्युह होते पण त्याने स्वतःला त्यात झोकून दिले , त्याला युद्धाच्या परिणामाची पुसटशी कल्पना होती पण त्याचे हौसले बुलंद होते आणि त्याने सरळ सरळ आश्वामेधाचाच यलगार केला, तुफान झंझावात बनून तो तुटून पडला, अनेक बरे वाईट प्रसंग आले, घणाघाती आरोप झाले, पण तो नाहीं बधला. कारण त्याला त्याने केलेल्या पुण्यकर्मावर विश्वास होता, त्याने विकासाची कास धरून देशाला बलशाली बनवले होते, त्याने जगात देशाची मान उंचावली होती, तळागाळातून आल्यामुळे त्याने देशाची नाडी ओळखली होती आणि सर्वसामान्य लोकांना स्वच्छता, पाणी, गॅस आणि घरे अशा सुविधा देऊन त्याने त्यांचे जीवनमान उंचावले होते, अनेक वर्षे बेसिक सुविधाना मुकलेल्या समाजाला त्याने त्यांचा हक्क म्हणून त्या दिल्या होत्या, डिजिटल क्षेत्रात प्रचंड काम करून भ्रष्टाचारावर प्रचंड घणाघाती प्रहार केला होता,गरीबाचा हक्काचा पैसा त्याने कोणत्याही दलालाला न देता डियरेक्ट बँकेत जमा केला होता, औद्योगिक क्षेत्रात, सुरक्षा क्षेत्रात नवीन नवीन सुधारणा करून देशाला आत्मनिर्भर बनवून जगातली पाचवी मोठी इकॉनॉमि बनवून तिसरी इकॉनॉमि...

जागतिक महिला दिन 2024

इमेज
जागतिक महिला दिनाच्या सर्व नारीशक्तीला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संस्कृती मध्ये नारीला उच्च स्थान आहे . आपल्या देवी देवतां मध्ये विद्येची देवता सरस्वती, शक्तीची देवता पार्वती आणि धनाची देवता लक्ष्मी आहे , ' यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता ' अर्थात जिथे स्त्रियांचा आदर केला जातो तिथे देवता वसतात.  छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाबाई एक आदर्श नारी होती, तिने दिलेल्या संस्कारांमुळेच स्वराज्याची मुहूर्तमेढ होऊन स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले, ताराराणी ने अखंड झुंज देऊन स्वराज्य टिकवले आणि शेवटी औरंगजेबाला महाराष्ट्रातच गाडले , झाशीची राणी लक्ष्मीबाईने स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपली आहुती दिली ,अश्या अनेक रणरागिणींनी आपला इतिहास भरलेला आहे. ख्रिस्तपूर्व काळात गार्गी नावाची महान तत्वज्ञानी , वेदशास्त्रात पारंगत विद्वान स्त्री होऊन गेली जिच्या हुशारीची चर्चा अजून हि होते. आपल्या भारत वर्षांमध्ये अनेक विद्वान , कर्तृत्ववान स्त्रियांनीं जन्म घेतला आणि आपापल्या काळात त्यांनी इतिहास घडवला. स्त्री हि समाजात समान अधिकाराला पात्र होती आणि अनेक राजघराण्यांमध्ये राजमातांचा शब्...

नाळ

इमेज
आई जेव्हा बाळाला जन्म देते त्यावेळी बाळाला आईबरोबर जोडणारी नाळ असतें, हीच नाळ बाळाला पोटामध्ये असताना अन्न पुरवठा करत असतें. बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला आई पासून वेगळे करण्यासाठी हि नाळ कापावी लागते आणि नंतर बाळाचा एक स्वतंत्र प्रवास सुरु होतो. हिजी नाळ आहे ती जशी आई बरोबर बाळाला जोडते तशीच रक्त्याच्या नात्याची नाळ माणसाला कितीही दूर असला तरी आपल्या मूळ नात्यांकडे ओढत असतें. त्याचे मूळ गाव जेथे त्याचा जन्म आणि बालपण गेलेले असतें, त्याच्या लहान पणाच्या आठवणी, मित्र मैत्रिणी, शाळा, कॉलेज आणि अनेक गोष्टी त्याला आपल्या मुळाशी ओढत असतात पण अनेक वेळा रोजमाराच्या धावपळीच्या जिंदगीत तो आपल्या मुळापाशी वारंवार पोचू शकत नाहीं पण ती नाळ त्याला वारंवार आठवण देत असतें आणि ओढ कायम असतें. रक्ताच्या नात्यांची ओढ काही औरंच असतें, भावा भावा मध्ये असणारी ओढ, भावा बहिणी मध्ये असणारी ओढ आयुष्य भर टिकून असते फक्त ती दिसून येतं नाहीं किंवा आजकाल माणसे जास्तच प्रॅक्टिकल व्हायचा प्रयत्न करत असतात त्यामुळे ती ओढ दबून गेलेली असतें पण संपलेली कधीच नसते. सगळ्या नात्यांमधला ओलावा तसाच असतो पण माणूस वर वर रुक्ष पणे ...