विश्वविजेता गुकेश
तो विषविजेता बनला अवघ्या अठराव्या वर्षी, जगातील सर्वात तरुण विषविजेता, एवढ्या कोवळ्या वयात एवढं मोठं यश, अश्या यशाने एखाद्याने स्वतःला फार मोठा तीसमारखा समजून जिंकताच नाचून थयथयाट मांडला असता पण तो शांत होता त्या स्थितीत पण शांत होता.सर्वप्रथम त्याने चेसच्या सोंगट्या परत जागेवर लावल्या आणि अत्यंत आदरपूर्वक त्यांना नमन करून आपला आदर प्रगट केला, त्याने चेस ला प्रणाम केला आणि नंतर भावना अनावर होऊन तो रडला. तो आपले संस्कार आपली शिस्त ह्या परमोच्च यशाच्या क्षणी पण विसरला नाहीं आणि अश्या वागण्याने त्याने लाखो लोकांच्या हृदयात कायमची जागा बनवली. कुठून येते एवढी प्रगल्भता, धन्य ते गुकेश चे पालक ज्यांनी असं रत्न घाडवलं. ह्या Attitude of gratitude मुळेच तो जगजेत्ता बनला, असा जगजेत्ता पुन्हा होणं नाहीं, सलाम गुकेश 🙏🙏🙏
© जितेंद्र मनोहर शिंदे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा