त्या दोघी

 


त्या दोघी , दोघींनाही पहिल्यांदाच भव्यतेचा साक्षात्कार.


एकीला मायाजलाचा भास तर दुसरीला उज्ज्वल भाग्याची आस.


एकी समोर उभा राहतो कष्टमय भूतकाळ तर दुसरीला खुणावतो प्रकाशमय भविष्यकाळ 


एक संसाराचा गाडा ओढून थकलेली तर दुसरी संघर्षासाठी खंबीर पणे उभी ठाकलेली.


एकीचे डोळे वैभवाने दिपलेले तर दुसरीचे त्या वैभवाला मुठीत घेण्यासाठी हपापलेले.


एक जीवनाला साध्या मार्गाने जगणारी तर दुसरी आपला नवा यशाचा मार्ग चोखनदळ पणे निवडणारी. 


एक संसाराच्या मायाजाळातून बाहेर पडलेली तर दुसरी त्या  मायाजाळाकडे ओढत चाललेली.


एक आयुष्याच्या रम्य संध्याकाळात रमलेली तर दुसरी उंच भरारी घेण्याच्या विश्वासाने भरलेली.


© जितेंद्र मनोहर शिंदे

टिप्पण्या

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा

वेडात मराठे वीर दौडले सात

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)