अश्वमेध 2024..चारसो पार


तो आला, त्याने पाहिले, तो झुंजला, समोर चक्रव्युह होते पण त्याने स्वतःला त्यात झोकून दिले , त्याला युद्धाच्या परिणामाची पुसटशी कल्पना होती पण त्याचे हौसले बुलंद होते आणि त्याने सरळ सरळ आश्वामेधाचाच यलगार केला, तुफान झंझावात बनून तो तुटून पडला, अनेक बरे वाईट प्रसंग आले, घणाघाती आरोप झाले, पण तो नाहीं बधला.

कारण त्याला त्याने केलेल्या पुण्यकर्मावर विश्वास होता, त्याने विकासाची कास धरून देशाला बलशाली बनवले होते, त्याने जगात देशाची मान उंचावली होती, तळागाळातून आल्यामुळे त्याने देशाची नाडी ओळखली होती आणि सर्वसामान्य लोकांना स्वच्छता, पाणी, गॅस आणि घरे अशा सुविधा देऊन त्याने त्यांचे जीवनमान उंचावले होते, अनेक वर्षे बेसिक सुविधाना मुकलेल्या समाजाला त्याने त्यांचा हक्क म्हणून त्या दिल्या होत्या, डिजिटल क्षेत्रात प्रचंड काम करून भ्रष्टाचारावर प्रचंड घणाघाती प्रहार केला होता,गरीबाचा हक्काचा पैसा त्याने कोणत्याही दलालाला न देता डियरेक्ट बँकेत जमा केला होता, औद्योगिक क्षेत्रात, सुरक्षा क्षेत्रात नवीन नवीन सुधारणा करून देशाला आत्मनिर्भर बनवून जगातली पाचवी मोठी इकॉनॉमि बनवून तिसरी इकॉनॉमि बनवण्यासाठी झटत होता,इन्फ्रास्ट्रक्चर वर काम करून देशामध्ये प्रचंड मोठे प्रोजेक्ट घडवून आणून दळणवळण क्षेत्राचा कायापालट करून देशाला प्रगतीपथावर आणले होते, पाचशे वर्षांपासून गोधडीत ठेवलेला राममंदिराचा मुद्दा लावून धरून करोडो रामभक्तांचा राममंदिराचा प्रश्न सोडवून राममंदिराचा जीर्णोद्धांर केला होता, काश्मीर ला 370 च्या शापातून मुक्त करून आणि तीन तलाकावर बंदी आणून त्याने अल्पसंख्याक समाजाला मूळ प्रवाहात आणले होते, देशमाध्ये गुंडागर्दी, दहशतवाद, स्त्रियांवरील अत्याचार आणि अनेक असामाजिक तत्वाना डोके वर काढून न देऊन देशाला सुशासन म्हणजे काय असतें ते दाखवले होते.

सर्वात महत्वाचे म्हणजे त्याने जे काही केले त्यामागे त्याचा काही स्वार्थ न्हवता, भारताला आत्मनिर्भर बनवून देशाची मान उंचावण्यासाठी तो रात्रंदिवस झटत होता.

पण तरीपण तो एक माणूसच आणि "टू एर इज ह्यूमन" ह्या उक्ती प्रमाणे तो पण चुकला, घसरला, त्याची जुबान अनेकदा घसरली, अनेक निर्णय त्याने खूप मोठी रिस्क घेऊन घेतले, त्याची नियत साफ होती पण घेणाऱ्याने सोयीस्कर अर्थ काढला आणि त्याच्याविरुद्ध आकाश पताळ एक करून त्याला हुकूमशाहा जाहीर केले गेले, वर्षनुवर्षे होणारे तुष्टीकरण त्याने सर्वांसमोर उघड पणे मांडले, खूप हिम्मत लागते ते बोलायला, पण त्या हिम्मतीची फार मोठी किंमत त्याला भरावी लागली कारण त्याच्या अर्थाचा बेअर्थच जास्त काढला गेला.

एखाद्याने जर वाईट बोलले आणि त्याला त्याच्या शब्दात उत्तर दिले तर ते उत्तरंच सगळे लक्षात ठेवतात मूळ प्रश्न चुकीचा होता किंवा प्रश्न विचारणारा चुकीचा होता किंवा आहे ह्याचा सगळयांना विसर पडतो. त्याने सगळ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले, तो सगळ्यांना पुरून उरला पण कदाचित ते करताना तो जास्तच घसरला. 

त्याने आश्वामेधाची स्वप्न पहिली होती पण ती सगळी स्वप्न उधळली गेली,अश्वमेध पूर्ण झाला नसला तरी त्याने दिलेल्या झुंजीमुळे तो त्याचे साम्राज्य वाचवू शकला पण ते टिकवण्यासाठी त्याला आता बाहेरच्या शक्तीची गरज पडणार आहे. 

तो जरी आता थोडा कमी पडला असला तरी फिनिक्स पक्षा प्रमाणे तो पुन्हा भरारी घेईल कारण अपयश हे त्याला नवीन नाहीं आणि अपयशाला घाबरून जाईल तो मोदी नाही.

©जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात