नया दौर : आर्टिफिशियल इंटिलिजंस

सत्तर च्या दशकात नया दौर नावाचा सिनेमा आलेला होता, बदलत्या जमान्यानुसार होणारे बदल दर्शवणारा आणि जुनी आणि नवीन जीवन पद्धतीतील संघर्ष दाखवणारा एक सुंदर चित्रपट. आता सत्तरचे दशक उलटून पाच दशके झाली आणि जर सत्तर च्या दशकात नया दौर आला होता तर आताच्या जमान्यात त्याची कितवी आवृत्ती चालू असेल ते समजून घ्यायला पाहिजे. बदल हा काळाची गरज आहे आणि तो टाळणे अटळ आहे पण त्या बदलाला आपण कसे सामोरे जातो ते महत्वाचे आहे. 

असे म्हणतात कि माणूस पण हळू हळू विकसित होत गेला, वेळेनुसार बदल घडत माणसाचे आताचे रूप आले आणि पुढे कदाचित हे रूप बदलेल पण. डायनासोर काळानुसार स्वतःला बदलू शकले नाहीत म्हणून नामशेष झाले, बदल हा टाळता येत नाही, सर्वात प्रथम बदला बद्दल जाणून घेणे गरजेचे आहे, त्याच्या मुळे  होणारे फायदे, तोटे आणि बदलणारे आपले जीवनमान ह्याचा आढावा घेऊन त्या बदलाला हळू हळू अंगिकारले पाहिजे त्याच्या मध्येच सगळ्यांचे भले असते.                                        


सत्तरी नंतर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, चित्रपट, औद्योगिक, कॅर्पोरेट, चिकित्सा विज्ञान, इंजिनीरिंग आणि अनेक क्षेत्रात लक्षणीय बदल झाले आहेत ज्यामुळे समाजाचा कायापालट झाला आहे. ह्या बदलाची आर्थिक क्षेत्रामध्ये भरभराट होण्यामध्ये खूप भरीव भागीदारी आहे. माणसाचे जीवनमान उंचावले आहे, जग जवळ आले आहे, अशक्यप्राय गोष्टी ही साधता आल्या आहेत आणि प्रगतीची दारे उघडली गेली आहेत. 

औद्योगिक क्रांती होऊन जग इंडस्ट्री 4.0 कडे वाटचाल करत आहे, इंटरनेट ऑन थिंग्स नावाच्या सॉफ्टवेअर वर आधारित कामकाजाने कामे जलद आणि बरोबर होतं आहेत आणि माणसे पण कमी लागत आहेत. अश्यातच आज जग आर्टिफिशियल इंटिलिजंस चा उपयोग करण्याच्या पातळी वर आलेले आहे ज्यामध्ये माणसाकडून केली जाणारी बुद्धीमत्ता वापरून करायची कामे पण चुटकी सरशी आपल्याला करून मिळतील, एकेकाळी जेव्हा रोबोट आले त्यावेळी अनेक हार्ड वर्क ची आणि अनेक माणसे लागणारी कामे रोबोट करू लागला होता पण आता आर्टिफिशियल इंटिलिजंस डोके वापरून करायची कामे पण लिलंया करू शकतो ज्यामुळे आता माणसाच्या बुद्धीला पण खूप कमी ताण पडणार आहे आणि अनेक कामे चुटकी सरशी पार पडणार आहेत, अगदी कलाक्षेत्रा मध्ये पण हा आपला रंग दाखवून अजब कलाकृती, संगीत, लेखन करायला मदत करत आहे. 

ए आय चा वापर आता काळाची गरज होत आहे कारण साधारण बुद्धीमत्ता असणारा पण ए आय वापरून असाधारण कामे करून चांगली बुद्धिमत्ता असणाऱ्या समोर स्पर्धा उभी करत आहे. हि स्पर्धा पुढे खूप वाढत जाणार आहे आणि बुद्धिमान आणि मेहनती माणसापेक्षा ए आय टूल वापरणाऱ्या साधारण बुद्धिमान माणसाला जास्त यश मिळण्याची खात्री आहे. आयुष्यात साध्य महत्वाचे असतें आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही कोणते साधन वापरता ते तुमच्या बुद्धमत्तेवर आणि जवळ असणाऱ्या साधन संपत्ती वर अवलंबून होते पण आता ए आय ची साधन संपत्ती नसेल तर सफलतेच्या स्पर्धेमध्य टिकणे कठीण आहे.

ह्या ए आय च्या सुविधे बरोबर एक फार मोठा चॅलेंज पण उभा राहणार आहे,  जर आपण सर्वच बाबतीत हळू हळू ए आय वर अवलंबून गेलो तर आपल्या बुद्धिमत्तेचा वापर खूपच मर्यादित होईल आणि आज जसे आपण शारीरिक कामे कमी करून आपली शारीरिक ताकत कमी करून बसलो आहोत तसेच उद्या बौद्धिक पातळीवर पण आपली ताकत कमी करून बसू नये म्हणून आपले बौद्धिक काम जास्तीत जास्त लवकर आणि एक्युरेट करण्यासाठीच ए आय चा वापर केला पाहिजे नाकी आपली सर्वच बौद्धिक कामे त्याच्यावर सोपवून आपल्या बुद्धीला गंज चढवला पाहिजे. ए आय हा मानव जातीला आळशी न बनवता जास्तीत जास्त कार्यक्षम बनवून एक वरदान ठरला पाहिजे.  निर्णय पूर्ण पणे आपला आहे आणि त्याच्यावर आपली भावी पिढी चे भविष्य अवलंबून राहणार आहे.

©जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Post a Comment

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात