कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाई माझी

मृग नक्षत्र आल्या नंतर सृष्टी हिरवा शालू ओढून सजते, पावसाच्या आगमनाने मन प्रफुल्लित होऊन जीवनात पण नवी पालवी फुटते. पावसाच्या आगमनानानंतर आपल्या संस्कृती मधील अनेक सण सनावळींना सुरवात होते. आधी नागपंचमी, वटपौर्णिमा, पंढरीची वारी, श्रावण महिन्याचे उपास तपास, व्रत वैकल्य, पाठोपाठ दहीकाला, रक्षा बंधन आणि नंतर येतो गणपती बाप्पा, मग दसरा, दिवाळी. अगदी दिवाळी पर्यंत कसा सगळं कॅलेंडर ब्लॉक असते.

 


हे येणारे सारे सण हर्षोउल्हासात साजरे करताना एक औरच मजा असते. काही सण महिलांसाठी असतात पण घरात मंगलमय वातावरण निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा येते, हे सण सनावळी घराघरात चैतन्य निर्माण करतात, सणामुळे नातेवाईक एकत्र येतात, भाऊ बहीण, मित्र परिवारात जवळीक वाढते आणि त्याच्यामुळेच सामाजिक सलोखा राखण्यास मदत होते, संस्कृती संवर्धन होऊन ति एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचते. आपल्या ह्या महान संस्कृतीनेच आपल्याला ह्या  सण सनावळींची भेट दिली आहे

सर्वात महत्वाचे म्हणजे सारे सण निसर्गाला अनुसरून साजरे केले जातात आणि निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिले आहे त्याचे आभार मानण्यासाठी निसर्गाची पूजा हा ह्या सर्व सण सनावळीतील खूप प्रमुख भाग असतो. 

संत सावता माळी बोलून गेले आहेत कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाबाई माझी. संत तुकाराम बोलतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे. ह्या निसर्गा मध्येच देव शोधायची आपली शिकवण आहे आणि आपण वर्षानुवर्षे सारे सण सनावळी करून ते पाळत आहे. 

संत ज्ञानेश्वर म्हणतात देवाचिये द्वारी उभा क्षणभरी अर्थात जो एक क्षण देवाच्या समोर भक्तिभावाने उभा राहिला तेणे मुक्ती चारी साधियेल्या, त्याला चारही मुक्ती प्राप्त होतात. आपला निसर्गच आपले दैवत आहे त्याच्या बरोबर मन लावले, त्याचे प्रेमाने, आदराने आभार मानले तर निश्चितच चारही मुक्ती सर्वांनाच प्राप्त होतील.

निसर्ग हि देवाने दिलेली सुंदर देणगी आहे. निसर्ग पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांनी बनलेला आहे आणि मानवी देह देखील या पंचतत्वातूनच तयार झालेला आहे म्हणूनच माणसाचे जीवन निसर्गावरच अवलंबून आहे, निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेईल आणि सध्या निसर्गाच्या  संतुलन बिघडल्या मुळे होणाऱ्या अनिष्टांपासून आपली सुटका होईल.

©जितेंद्र मनोहर शिंदे 



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा

वेडात मराठे वीर दौडले सात

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)