'' साडेसाती''
जन्माला आला त्यावेळीच वजन थोडं कमी होतं पुढे जसा जसा मोठा होतं चालला तसा शरीरामध्ये प्रतिकार शक्तीची कमी असल्यामुळे वारंवार आजारी पडणं चालूच होतं , सर्दी खोकला जसा पाचवीलाच पूजला होता . अभ्यासात पण गती कमीच होती आणि कसा बसा वरच्या इयत्ता पार करत तो दहावी पर्यंत पोचला होता , दहावी त्याला जरा जास्तच कठीण जात होती . घरच्यांना त्याची खूप काळजी वाटायला लागली आणि ह्याचे भविष्यात काय होणार म्हणून त्याला एका ज्योतिष्याकडे दाखवण्यात आले . ज्योतिष्याने कुंडली मध्ये साडेसाती आहे म्हणून सांगितलं , त्यावेळी तो तसा लहान होता पण काहीतरी वाईट आहे आणि पुढं वाईटच होणार हे त्याला कुठे तरी समजलं आणि त्याची उरली सुरली हिम्मत पण तिथेच संपू लागली . तसा तो घरच्या वातावरणानुसार धार्मिक बनला होता पण आता त्याला जास्तच दैवी गोष्टींचा सहारा घ्यावासा वाटला , घरच्यांनी बांधायला गंडे दोरे दिले होते आणि कसली तरी मोठी पूजा घालायचं मेतकूट घरात कुटले जात होतं पण त्याच्यासाठी ...