शेवटचा दिस गोड व्हावा ह्याच साठी केला होता अट्टाहास


शेवटचा दिस गोड व्हावा ह्याच साठी केला होता अट्टाहास. हा अट्टाहास आपण बघतो दिंडीच्या रूपात. माझ्यासाठी जगातले आठवे आछर्य म्हणजे ही दिंडी, भक्तीचा परमोच्च बिंदू म्हणजे ही दिंडी.

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी ज्यांना फक्त पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास लागलेला असतो, त्यासाठी उनातानातून, पाऊस पाण्यातून त्यांची पाऊले चालत असतात पंढरी कडे. घरदार, नोकरीधंदा, सुखी संसार, सर्व बंधनातून मुक्त होऊन त्यांना फक्त आपल्या पांडूरंगाला भेटण्याचे वेध लागलेले असतात, ह्या वारीत तरुणां बरोबर तितकेच म्हातारे पण शामिल असतात आणि त्यांचा जोश भल्या भल्या तरुणाईला लाजवणारा असतो.

 दिंडी मध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळत, भजने गात, टाळ चिपळ्यांच्या गजरात हा तांडा दिवसेंदिवस मार्ग आक्रमत असतो, ठरलेल्या ठिकाणी थांबत व ठरलेल्या ठिकाणी रिंगण करत वारी मार्गस्थ होत असते, रिंगण जीवनाच्या भावसागरातून भक्तिमार्गाकडे जायचा मार्ग दाखवते.



पंढरीला पोचण्यासाठी दररोज ही तरुणाई पंचवीस तीस किलोमीटर चालते, चालता चालताना विठ्ठल नामाची शाळा भरते, भजन कीर्तनात लाखो वारकरी इतके दंग होतात की त्यांना सगळ्या संसाराचा आणि त्यातील दुखांचा विसर पडतो आणि ते विठूमय होतात , हेच ह्या दिंडी चे खरे सामर्थ्य. 

असा सोहळा उभ्या जगात कुठे पाहायला मिळत नाही. लाखो वारकरी पंढरीला पोचतात आपल्या मायबापाचे म्हणजे विठू माऊलिचे दर्शन घेण्यासाठी, किती अभूतपूर्व आहे हे सगळे.

🙏विठ्ठल विठ्ठल 🙏

© जितेंद्र मनोहर शिंदे 

टिप्पण्या

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा

वेडात मराठे वीर दौडले सात

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)