बचेंगे तो और भी लडेंगे

 

                  

तिहासात अनेक योद्धे होऊन गेले. आपल्या अतुलनीय शौर्य,अदभुत पराक्रम ,प्रगल्भ बुद्धिचातुर्य,  बाणेदारपणा आणि अप्रतिम साहसाने त्यांनी इतिहासात नाव कोरले. यातील अनेक योद्धे आता इतिहासाच्या पटलावरून पुसून जात आहेत, त्यांचा पराक्रम, त्यांचा आदर्श आपण विसरून जात आहोत कारण आपण त्यांचा इतिहास कधी नीट शिकतच नाही आणि त्याच्या पासून शिकवण घेऊन आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत  नाही. प्रत्येकाचा कार्यकाळ  एक तप आहे आणि त्यांनी केलेले महान कार्य आपल्याला आयुष्यात प्रचंड प्रेरणादायि आहे .

यांच्याच पंक्तितला एक महान योद्धा ज्याने आपल्या बाणेदारपणामुळे आणि अतुलनीय पराक्रमाने इतिहासात नाव कोरले - "दत्ताजी शिंदे ".

" बचेँगे तो और भी लडेंगे " ह्या त्यांच्या बाणेदार उत्तराने इतिहास घडवला. योद्धा कधी हार मानत नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देतो हे दत्तजिने पुऱ्या जगाला शिकवले.

10 जानेवारी 1760 रोजी दत्ताजी शिंदे नजिब खान रोहीला बरोबर लढताना धारातीर्थी पडले. भीषण रणतान्डवात दंडाला गोळी लागून दत्ताजी शिंदे जखमी जाले आणि घोड्यावरून खाली पडले , तशाच जखमी अवस्थेत दत्ताजी शिंदे यांना पकडण्यात आले. नजिबखान रोहीला आणि कुतुबशहा हत्ती वर बसून जखमी दत्ताजी जवळ आले , "दत्ता " अशी कुत्सितपणे हाक मारून कुतुबशहा म्हणाला " क्यों पाटिल ? हमसे और लडोगे ? " दत्ताजी ने कुतुबशहाच्या डोळ्यात डोळे घालून तितक्याच बाणेदारपणे उत्तर दिले " क्यों नही , बचेँगे तो और भी  लडेंगे ".


धन्य धन्य ते दत्ताजी आणि धन्य धन्य त्यांचा पराक्रम. आज सगळ्यांच्या मनात दत्ताजी जिवंत करण्याची वेळ आली आहे, असा दत्ताजी जो नेहमी प्रतिकूल परिस्थितीत लढण्याची हिम्मत देईल, आपल्याला सांगेल की युद्ध अजून संपलेले नाही, स्वतः वर विश्वास ठेव आणि शेवट पर्यंत झुंज दे कारण संकटाला घाबरुन दूर पळनारा आयुष्यात कधी इतिहास घडवत नाही. 

दत्ताजी शिंदे यांच्या परक्रमाला आणि त्यानी शिकवलेल्या अखंड लढण्याच्या परम्परेला मानाचा मुजरा ..👏👏👏

© जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात