लास्ट सीन...

 


आज कालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला भेटलेली व्यक्ती पुन्हा भेटेल आणि भेटली तरी पुन्हा आधी होती तशीच आपल्याशी मिळेल ह्याची खात्री नाहीकदाचित त्या व्यक्तीची भेट आपली लास्ट सीन असू शकते.

आपण आपल्या नातेवाईकांनामित्रांनाजुन्या कलीगना कधी लास्ट बघितले होते तेही आठवत नाही आणि मग आचानक बातमी येते की ती व्यक्ती आता जगातून निघून गेली आहे आणि आपल्यासाठी ती खरंच आता लास्ट सीनच आहेमग सुरु होतो आठवणींचा खेळआपण त्याला किंवा तिला कधी लास्ट बघितले होतेबघितले होते फक्त की भेटणे पण झाले होतेभेटलो होतो तर काही बोलणे झाले होते का असंच हाय हॅलो झाले होतेभांडण तर झाले न्हवते नात्याला किंवा तिला आपण मनमोकळे पणे भेटलो होतो की जूने हेवेदावे उगाळून फटकून वागलो होतो?

असे बोलतात की आपल्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती ही विधात्याच्या पूर्वनियोजित प्लॅन नुसार आलेली असतेकोणीही आपल्या आयुष्यात असेच येत नाहीपण आपण खरंच त्याच्या येण्याला योग्य न्याय देतोका ?, त्याच्याशी आपुलकीने वागतो का ?, त्याच्या भावना समजून त्याच्याशी जवळीक साधतो का ?. माणसाच्या वागण्या बोलण्यामागे एक खूप मोठी हिस्टरी असतेतो खरंच असा आहे की जीवनाच्या रोजच्या घावांनी त्याला असे बनवले आहे ते समजणे अवघड असतेंमग पुन्हा तोच प्रश्न पुढे येतो की ह्याला मी आधी कधी बघितले होते आणि त्यावेळी त्याचा स्वभाव कसा होतातो अजूनही तसाच आहे की जीवनाने त्याला पुरा बदलून टाकला आहे.


काही दिवसापूर्वी मी माझ्या एका कॉलेजच्या मित्राला अठ्ठावीस वर्षांनी भेटलोतो आता प्रख्यात डॉक्टर आहेमी भेटायला गेलो होतो माझ्या वर्ग मित्राला ज्याचा बरोबर खळखळून हसून अनेक मित्रांच्या फिरक्या घेतल्या होत्यापण मला त्या दिवशी भेटलेला माझा मित्र तो जुना मित्र न्हवताचतास भर गप्पा मारताना मी माझ्या त्या जुन्या मित्राला शोधत होतो पण तो कुठे दिसतच न्हवतामाझ्याशी बोलत होता एक प्रोफ़ेशनल डॉक्टर आणि मी पुन्हा जुन्या आठवणी मध्ये माझ्या त्या हसमुखफिरक्या घेणाऱ्या मित्राला तसा कधी बघितला होता ते शोधत होतो.

सध्या व्हाट्सअपचे युग आहे आणि त्याच्या मध्ये पण लास्ट सीन फिचर आहेते फिचर म्हणजे जणू माणसाच्या अस्तित्वाची खूण आहेजवळच्या माणसांच्या लास्ट सीन वरून ते सुखरूप आहेत आणि ऍक्टिव्ह आहेत याची खबर लागतेचूकून जर लास्ट सीन खूप जुना असेल तर मात्र मनात शंकेची पाल चुकचूकतेसर्व काही ठीक असेलना ह्या बद्दल काळजी वाटतेपरदेशात असणाऱ्या आपल्या मुलांची खुशाली म्हातारे आईबाबा लास्ट सीन वरूनच समजून घेत असतात.

जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता कदाचित लास्ट सीन असेल असे समजूनच वागावायला पाहिजे,कारण माणूस पुन्हा भेटण्याची गेरेंटी आता खूप कमी आहेआयष्य खूप छोटं आहे आणि तितकेच सुंदर ही.

© जितेंद्र मनोहर शिंदे 

 


Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात