बवाल

                                                                   


नूकताच बवाल सिनेमा बघितला, खूप दिवसांनी बॉलीवूड वाल्यांनी एक सुंदर निर्मिती केली आहे. एक असा सिनेमा जो पुऱ्या परिवारासोबत बसून बघू शकतो, आजच्या पिढीला आरसा दाखवणारा आणि समाजातले एक वास्तव दाखवणारा सिनेमा. 

आज बरेचजण आपली एक खोटी इमेज बनवून आहेत आणि त्या इमेजला तडा जाऊ नये म्हणून एक खोट्याची दुनिया बनवतात आणि ती जपण्यासाठी अनेक उलटे सुलटे मार्ग वापरतात, त्यांना आपल्या इमेज पेक्षा बाकी सर्व गौण असतें आणि त्यासाठी आपली नाती गोती, मानवी मूल्ये या सगळ्यांना पायदळी तुडवण्यात त्यांना काहीही चुकीचे वाटत नाही. खूपच आत्माकेंद्रित आणि स्वार्थी लोकं असतात ती. आपण आयुष्यात खूप मागे पडलो अशी खंत मनात सलत असते आणि जगाला दाखवण्यासाठी ते मग आपलें वेगळे विश्व उभारतात आणि तेच लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा लोकं रीझल्ट विसरतात पण त्या माणसाने दाखवलेला दिखाऊपणा लक्षात ठेवतात आणि ह्याच गोष्टींचा अशी लोकं फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. 


सिनेमा मधील शिक्षक वर्ल्ड वार शिकवण्यासाठी युरोप टूर ला जातो आणि हळू हळू त्याला त्याने महत प्रयत्नाने बनवलेल्या आपल्या खोट्या इमेजच्या नश्वरतेची जाणीव होते. हिटलर ने जगावर केलेल्या अत्याचारामागे त्याचा आताताईपणा, आपल्याजवळ असलेल्या गोष्टीमध्ये समाधान न मानता दुसऱ्यांच्या गोष्टी मागे धावून त्या हिसकावून घेण्याचा हुकूमशाही मार्ग चुकीचा आहे ह्याचा उलगडा होतो. त्याची इप्लिपसी ने आजारी बायको त्याला हे जाणवून देते की प्रत्येकाच्या मनात एक हिटलर आहे आणि त्याला प्रत्येकाने कंट्रोल करायची गरज आहे, 


सिनेमा अंतर्मुख करून खूप काही शिकवून जातो. हिटलर अत्याचारासाठी वापरत असणाऱ्या गॅस चेंबर चा सिन, हजारो संनिकांना विरमरण मिळालेल्या बीचचा सिन इतिहासातील एक काळी बाजू दाखवून जातो. आज पण समाजात असेच अनेक हिटलर आपल्या आताताई स्वभावाने इतरांवर अधिपत्य गाजवण्यासाठी धडपडत असताना दिसतात आणि त्यासाठी सोशल मीडिया चा वापर करून इतरांना बहकावून सोडत आहेत. ह्या सर्व हिटलर ना वेळीच कंट्रोल करून त्यांना त्यांची योग्य जागा दाखवणे गरजेचे आहे.

© जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात