गुड व्हाइब्स ओन्ली (Good Vibes Only)
''दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती'', अशी दिव्यत्वाची प्रचिती येते दिव्य माणसांकडून जी आपले जीवन जगाच्या कल्याणासाठी वाहून देतात. दैनंदिन जीवनात अशी माणसे मिळणे विरळेच पण काही माणसे जरूर मिळतात ज्यामुळे हृदयी वसंत फुलतो, मन फुलपाखरू बनते. अशी माणसे नेहमी जवळ असावी असे वाटते, अश्या माणसांकडून एक वेगळीच ऊर्जा आणि पॉसिटीव्हिटी मिळते ज्याला आपण गुड व्हाइब्स बोलतो. जीवनात गुड व्हाइब्स मिळण्यासाठी फक्त माणसं नाही तर परिस्थिती पण तेंव्हडीच जबाबदार असते. ज्यावेळी आपण आपल्या आवडत्या नयनरम्य हॉलिडे स्पॉट वर जातो त्यावेळी पण आपल्याला गुड व्हाइब्स मिळतात. एखादा सुंदर चित्रपट, सुंदर गाणे, सुंदर डान्स, मित्रमैत्रिणींचा साथ पण आपल्याला गुड व्हाइब्स देऊन जातो. गुड व्हाइब्स मिळण्यासाठी चांगली संगती, चांगली परिस्थिती जरुरीची आहे आणि ती निर्माण करणे काही अंशी आपल्या हातात आहे. जेव्हढे आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहतो, चांगले विचार करतो तेव्हढेच जास्त गुड व्हाइब्स आपल्या नशिबात असतात. एखादा सुंदर रोमँटिक कुटूंबवत्सल सिनेमा बघून मिळणाऱ्या सुंदर व्हाइब्स ह्या एखाद्या हि...