कातर वेळ

 

                                                            

     

संध्याकाळी मी प्रवास करत नाही, कारण संध्याकाळी मी माझा राहत नाही.

आठवणींचा कल्लोळ माजतो मनात आणि मन गुंतत जाते भूतकाळात.

अनेक प्रसंग, अनेक माणसे डोकावून जातात, कधी मनाला दुखावून तर कधी सुखावून जातात

मन वेडे शोधत असते जुने सुखाचे क्षण, पण का राहून राहून आठवतात ते कठोर यातनादायी क्षण.

गाडी जशी घेते वेग तश्या ह्या आठवणी पण जोराने उचंबळून येतात, किती सावरता सावरल्या तरी मनाला हरवून जातात.

मनाला सावरणे हे केवळ निमित्त असते, खरे म्हणजे स्वतःला दुखावू देण्याचा  एक अट्टाहास असतो.

तरी मन बावरे काही माझे ऎकत नाही, किती सावरता सावरले तरी पुन्हा येते आठवणींवरी.

काही सुंदर आठवणी मनाला हरखून टाकतात आणि पुन्हा पुन्हा फिरून मनावर घिरट्या मारतात.

संध्याकाळच्या कातर वेळीचा  प्रवास हा एक अजब अनुभूती असते, ती घ्यावी का ना घ्यावी हीच  मोठी पंचाईत असते.

© जितेंद्र मनोहर शिंदे 

 

Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात