कर्मा रिटर्न्स
भगवतगीतेत म्हटले आहे तू कर्म करत जा फळाची इच्छा करू नकोस. खरच माणसाचे कर्मच सगळे काही आहे. आज आपल्या बाबतीत जे काही घडत आहे ती आपल्या कर्माची फळे आहेत, आपले कर्म आपला पिच्छा कधीच सोडत नाही. जर तुम्ही आयुष्यात चांगले केले असेल तर तुम्हाला चांगलेच मिळेल , वाईट कर्माची फळे पण कदाचीत ह्या जन्मातच मिळणार असतात, कारण आता सगळे काही इन्स्टंट आहे, दुसऱ्या जन्मासाठी वाट पाहायला कदाचित देवाला पण वेळ नाहि आहे.
ह्या कर्माचा प्रत्यय अनेकदा येतो. आयुष्यात आपल्या हातून जे काही घडले असेल ते कुठेतरी नोंद होत असते आणि योग्य वेळी त्याच्या मोबदल्यात आपल्याला चांगली किंवा वाईट फळे रिटर्न गिफ्ट म्हणून मिळत असतात. आयुष्यात आपण कितीही चांगले वागलो असो पण आपल्या हातून कधी एक चूक झाली असेल तर समाजाला ती चूकच कदाचित आयुष्यभर लक्षात राहते आणि तेच आपले आयुष्यभरासाठी केरक्टर बनते ,म्हणूनच म्हणतात ना चूज़ युवर वर्ड्स वाइजली .
जितके वर्ड्स चूज़ करणे महत्वाचे आहे actions पण तितक्याच महत्वाच्या आहेत, आयुष्यात कुठल्याही सिचुयेशनला जर लगेच रीएक्ट केले तर कदाचित भावानेच्या आहारी जाऊन किंवा जुन्या मनात असणाऱ्या grudges मुळे दिलेली प्रतिक्रिया कदाचित समोरच्या माणसाला आयुष्यभरासाठी दुखवून जाऊ शकते म्हणून लगेच प्रतिक्रिया देण्याचे टाळून परिस्थिती समजून घेऊन रेस्पॉंड करणे जरूरी आहे.
कदाचित आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपले केरक्टर समजून घ्यायला कोणाला वेळच नसतो, जे समोर दिसते तेच लोकांना जाणवते. माणूस react का करतो, त्याच्या मागे काय कारण आहे हे समजुन घेणारी, त्याला त्या परिस्थितीमध्ये मदत करणारी माणसे सध्या विरळीच आहेत.
आपल्या हातून होणारे कर्म हे आपल्या विचारांची फलश्रुती असते म्हणून विचार चांगले ठेवले तर हातून होणारे कर्म चांगलेच असते. कोणाबद्दल मनात किंतुपरंतु असेल तर योग्य मार्गाने चर्चा करून त्याला दूर करणे गरजेचे आहे.
आपले विचारच आपल्या एकशन्सना कारणीभूत असतात, आपल्या छोट्या छोट्या एकशन्स आपल्या सवयी बनतात, आपल्या सवयीच आपला स्वभाव बनतात आणि आपला स्वभावच बनवतो आपले केरेक्टर.
अनेक वेळा आपण अनेक गोष्टी ग्रुहीत धरतो ,एखाद्या माणसा बद्दल आपले मत बनवण्यापूर्वी त्याच्या बरोबर योग्य संवाद साधणे पण तितकेच गरजेचे आहे. आयुष्यात वादापेक्षा संवादावर भर दिला तर आर्ध्या चिंता तिथेच गायब होतील. आयुष्यात हे शहाणपण यायला खूप वेळ लागतो आणि तोपर्यंत खूप वेळ निघून गेलेला असतो. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपले कर्मच त्याला अजून सुंदर बनवणार आहे.
© जितेंद्र मनोहर शिंदे
Comments
Post a Comment