पोस्ट्स

शेवटचा दिस गोड व्हावा ह्याच साठी केला होता अट्टाहास

इमेज
शेवटचा दिस गोड व्हावा ह्याच साठी केला होता अट्टाहास. हा अट्टाहास आपण बघतो दिंडीच्या रूपात. माझ्यासाठी जगातले आठवे आछर्य म्हणजे ही दिंडी, भक्तीचा परमोच्च बिंदू म्हणजे ही दिंडी. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी ज्यांना फक्त पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास लागलेला असतो, त्यासाठी उनातानातून, पाऊस पाण्यातून त्यांची पाऊले चालत असतात पंढरी कडे. घरदार, नोकरीधंदा, सुखी संसार, सर्व बंधनातून मुक्त होऊन त्यांना फक्त आपल्या पांडूरंगाला भेटण्याचे वेध लागलेले असतात, ह्या वारीत तरुणां बरोबर तितकेच म्हातारे पण शामिल असतात आणि त्यांचा जोश भल्या भल्या तरुणाईला लाजवणारा असतो.  दिंडी मध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळत, भजने गात, टाळ चिपळ्यांच्या गजरात हा तांडा दिवसेंदिवस मार्ग आक्रमत असतो, ठरलेल्या ठिकाणी थांबत व ठरलेल्या ठिकाणी रिंगण करत वारी मार्गस्थ होत असते, रिंगण जीवनाच्या भावसागरातून भक्तिमार्गाकडे जायचा मार्ग दाखवते. पंढरीला पोचण्यासाठी दररोज ही तरुणाई पंचवीस तीस किलोमीटर चालते, चालता चालताना विठ्ठल नामाची शाळा भरते, भजन कीर्तनात लाखो वारकरी इतके दंग होतात की त्यांना सगळ्या संसार...

ये उन दिनोंकि बात है

इमेज
                                                                          ये उन दिनोंकि बात है  बघता बघता आयुष्य सरले आणि वयाची चाळीशी पार झाली, पण मुलांकडे बघितले की वाटते ह्यांचे तर अजून आयुष्य उभे व्हायचे आहे. आम्ही जसे बालपण आणि तरुणपण काढले त्यापेक्षा निश्चितच ह्यांचे बालपण व येणारे तरुणपण वेगळे आहे. आम्ही आठवड्यातून एकदा येणाऱ्या चित्रहार आणि शोथीमची आतुरतेने वाट पाहायचो पण आता माझी  मुलगी Mtv , Zoom वर कधीही पिक्चरच्या गाण्यावर थीरकते, ते पण काय कमी पडते म्हणून BTS  ची  गाणी U tube वर ऐकत असते. आमच्या तरुणपणी पण आल्बमचे थेर येऊन पोचले होते, आम्ही पण बाबा सह्गल, अल्ताफराजा, फाल्गूनी पाठकच्या गाण्यांवर फिदा होतो पण आता ह्या सगळ्यांचे पीक एवढे आले आहे की कधी "काटा लगा" येतो आणि गायब होतो ते समजतच नाही. आमच्या लहानपणी TV वर मालिका पण आठवड्यातून एकद...

मै खेलेगा

इमेज
                                                                                           '' मै खेलेगा '' क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस. अनेक फास्ट बॉल येतील, तूला झुकवतील, तूला जखमी करतील, क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस. अनेक अपील होतील, अनेक जण तूला डिवचतील, विचलित होऊ नकोस, क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस. अनेक वेळा पळताना तूला प्रतिस्पर्धी रन आउट करायला बघतील, पळत रहा, वेळेवर क्रिज वर परत ये आणि पून्हा एकदा क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस. अनेक वेळा तू उचललेला बॉल सीमारेषेवर झेलण्याचा प्रयत्न होईल, तू तुझ्या फटक्याची उंची वाढव आणि बॉलला सीमारेषेपार पोचव आणि पुन्हा एकदा क्रिज वर उभा रहा क्रिज सोडू नकोस. अनेक वेळा तूला बिट केले जाईल, तुझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी चुहुबाजूने फिल्डिंग लावली जाईल तू बॉल वर ल...

बवाल

इमेज
                                                                                  नूकताच  बवाल सिनेमा बघितला, खूप दिवसांनी बॉलीवूड वाल्यांनी एक सुंदर निर्मिती केली आहे. एक असा सिनेमा जो पुऱ्या परिवारासोबत बसून बघू शकतो, आजच्या पिढीला आरसा दाखवणारा आणि समाजातले एक वास्तव दाखवणारा सिनेमा.  आज बरेचजण आपली एक खोटी इमेज बनवून आहेत आणि त्या इमेजला तडा जाऊ नये म्हणून एक खोट्याची दुनिया बनवतात आणि ती जपण्यासाठी अनेक उलटे सुलटे मार्ग वापरतात, त्यांना आपल्या इमेज पेक्षा बाकी सर्व गौण असतें आणि त्यासाठी आपली नाती गोती, मानवी मूल्ये या सगळ्यांना पायदळी तुडवण्यात त्यांना काहीही चुकीचे वाटत नाही. खूपच आत्माकेंद्रित आणि स्वार्थी लोकं असतात ती. आपण आयुष्यात खूप मागे पडलो अशी खंत मनात सलत असते आणि जगाला दाखवण्यासाठी ते मग आपलें वेगळे विश्व उभारतात आणि तेच लो...

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण

इमेज
  आजच्या धावपळीच्या दुनियेत खरंतर मनाचे पण आरोग्य असतें हे आपण समजूनच घेत नाही, आपण  शरीराला   वेळ देत नाही तर मनाची तर बातच दूर. लहानपणी शाळेत मनाचे श्लोक पाठ केले होते पण त्यांचा अर्थ उमलून घेऊन तो जीवनात उतरवणे किती जणांना जमले असेल. समर्थांनी 205 श्लोक मनाला उद्देशून लिहिले आहेत, प्रत्येक श्लोक म्हणजे जीवन जगण्याचा, मनाला स्थिर ठेवण्याचा मंत्र आहे पण समर्थांच्या श्लोका पेक्षा कुठल्यातरी अमेरिकन किंवा यूरोपयन मनसोपाचार तज्ञाच्या लेख आपल्याला जास्त जवळचा वाटतो.  संत तुकाराम सांगतात 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण '. पण ते मन नेमके काय असतें ते आपण समजूनच घेत नाही. संत रविदास म्हणतात 'मन चंगा तो कठोती में गंगा ' पण चंगा म्हणजे काय? आपल्याला कुठे वेळ आहे त्याला चंगा वैगेरे ठेवायला. तुकाराम महाराज म्हणतात 'नाही निर्मळ मन तर काय करील साबण ' किती जण मनाच्या निर्मळ पणासाठी प्रयत्न करतात.  श्यामची आई श्यामला तळव्यासारखे मनाला पण मळ लागू नये म्हणून जपायला सांगते पण आपण ते विसरून गेलो आहे. बहिणा बाईंना मन खऱ्या अर्थाने समजले होते 'मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढ...

वेडात मराठे वीर दौडले सात

इमेज
  24 फेब्रुवारी 1674,  जगाच्या इतिहासात अजरामर असा रणसंग्राम घडला होता. स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजरांच्या नेतृत्वाखाली सहा स्वामीनिष्ठ पराक्रमी मराठे बहलोल खानाच्या बारा हजाराच्या वरच्या सैन्यावर चालून गेले होते. हा इतिहास आहे अजोड स्वामीनिष्ठेचा, अतुलनीय पराक्रमाचा, आपल्या देवासमान राजाच्या शब्दाखातर प्राणाची आहुती देणाऱ्या मर्द मराठ्यांचा. बहलोलखान ज्या वेळी स्वराज्यावर चालून आला त्यावेळी त्याला कायमचा ठेचून काढण्यासाठी राजांनी प्रतापराव गुजरांना धाडले. प्रतापरावांनी बहलोलखानाचे पाणी तोडण्यासाठी उमराणीच्या जलाशयावर कब्जा करून त्याला कैचीत पकडले. खानाचे सैन्य, त्याचे हत्ती पाण्याबिगर हैराण झाले. त्याच्या एका हत्तीने बेफाम होऊन खानाच्याच सैन्याला पायाखाली चिरडले. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत खानावर आक्रमण करून प्रतापरावांनी त्याला आपल्या पायाशी लोळवले. खान शरण आला आणि आपल्या जीवाची भीक मागू लागला. शरणागताला मारणे ही माणुसकी नाही असे समजून प्रतापरावांनी खानाला माफी दिली. पण खान सुधरण्यातला न्हवता त्याने पुन्हा स्वराज्यावर हल्ला करून मिरज, कोल्हापूर सारखी शहरे लुटली. ज्या वे...

पानिपत : मराठ्यांची शौर्य गाथा

इमेज
                                                                          14 जानेवारी 1761, पानिपत चा रणसंग्राम म्हणजे मराठ्यांच्या शौर्याची, स्वामीनिष्ठेची, देशभक्तीची, अचाट पराक्रमाची अजरामर गाथा. मराठ्यांनी केलेली पराक्रमाची शर्त, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या कर्तव्यासाठी, देश सरंक्षणासाठी स्वतःला झोकून द्यायची वृत्ती ह्यातून दिसून येते. नाना पाटेकरचा प्रसिद्ध डायलॉग 'मराठा मारता है या मरता है ' कदाचित याच रणसंग्रामा वरून आला असेल. ह्या युद्धाची जर पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर 1758 नंतर पूर्ण उत्तरेत मराठा साम्राज्य एक जबरजस्त ताकत म्हणून उदयास आले होते. मराठ्यांनी लाहोर पर्यंत दौंड मारून अहमदशहा अब्दाली च्या मुलाला हुसकावून लावले होते. दिल्ली चा बादशहा नावापुरता राहिला होता आणि मुघल साम्राज्याचा बिमोड करून मराठ्यांचा डंका पूर्ण उत्तरेवर गाजत होता. रोहील ख...

बचेंगे तो और भी लडेंगे

इमेज
                         इ तिहासात अनेक योद्धे होऊन गेले. आपल्या अतुलनीय शौर्य,अदभुत पराक्रम ,प्रगल्भ बुद्धिचातुर्य,  बाणेदारपणा आणि अप्रतिम साहसाने त्यांनी इतिहासात नाव कोरले. यातील अनेक योद्धे आता इतिहासाच्या पटलावरून पुसून जात आहेत, त्यांचा पराक्रम, त्यांचा आदर्श आपण विसरून जात आहोत कारण आपण त्यांचा इतिहास कधी नीट शिकतच नाही आणि त्याच्या पासून शिकवण घेऊन आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत  नाही. प्रत्येकाचा कार्यकाळ  एक तप आहे आणि त्यांनी केलेले महान कार्य आपल्याला आयुष्यात प्रचंड प्रेरणादायि आहे . यांच्याच पंक्तितला एक महान योद्धा ज्याने आपल्या बाणेदारपणामुळे आणि अतुलनीय पराक्रमाने इतिहासात नाव कोरले - "दत्ताजी शिंदे ". " बचेँगे तो और भी लडेंगे " ह्या त्यांच्या बाणेदार उत्तराने इतिहास घडवला. योद्धा कधी हार मानत नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देतो हे दत्तजिने पुऱ्या जगाला शिकवले. 10 जानेवारी 1760 रोजी दत्ताजी शिंदे नजिब खान रोहीला बरोबर लढताना धारातीर्थी पडले. भीषण रणतान्डवात दंडाला गोळी लाग...

लास्ट सीन...

इमेज
  आज   कालच्या   धावपळीच्या   जीवनात   आपल्याला   भेटलेली   व्यक्ती   पुन्हा   भेटेल   आणि   भेटली   तरी   पुन्हा   आधी   होती   तशीच   आपल्याशी   मिळेल   ह्याची   खात्री   नाही .  कदाचित   त्या   व्यक्तीची   भेट   आपली   लास्ट   सीन   असू   शकते . आपण   आपल्या   नातेवाईकांना ,  मित्रांना ,  जुन्या   कलीगना   कधी   लास्ट   बघितले   होते   तेही   आठवत   नाही   आणि   मग   आचानक   बातमी   येते   की   ती   व्यक्ती   आता   जगातून   निघून   गेली   आहे   आणि   आपल्यासाठी   ती   खरंच   आता   लास्ट   सीनच   आहे .  मग   सुरु   होतो   आठवणींचा   खेळ ,  आपण   त्याला   किंवा   तिला   कधी   लास्ट   बघितले   होते ,  बघितले ...