ये उन दिनोंकि बात है

                                                             ये उन दिनोंकि बात है 




बघता बघता आयुष्य सरले आणि वयाची चाळीशी पार झाली, पण मुलांकडे बघितले की वाटते ह्यांचे तर अजून आयुष्य उभे व्हायचे आहे. आम्ही जसे बालपण आणि तरुणपण काढले त्यापेक्षा निश्चितच ह्यांचे बालपण व येणारे तरुणपण वेगळे आहे. आम्ही आठवड्यातून एकदा येणाऱ्या चित्रहार आणि शोथीमची आतुरतेने वाट पाहायचो पण आता माझी  मुलगी Mtv , Zoom वर कधीही पिक्चरच्या गाण्यावर थीरकते, ते पण काय कमी पडते म्हणून BTS  ची  गाणी U tube वर ऐकत असते. आमच्या तरुणपणी पण आल्बमचे थेर येऊन पोचले होते, आम्ही पण बाबा सह्गल, अल्ताफराजा, फाल्गूनी पाठकच्या गाण्यांवर फिदा होतो पण आता ह्या सगळ्यांचे पीक एवढे आले आहे की कधी "काटा लगा" येतो आणि गायब होतो ते समजतच नाही.

आमच्या लहानपणी TV वर मालिका पण आठवड्यातून एकदाच यायच्या, पण आता डेली सोप बनून मालिके मधील केरेक्टर घरचे सदस्य बनले आहेत. गृहिणींसाठी ,अबाल वृद्धांसाठी डेली सोप जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत आणि मालिके मधील पात्र घरची मंडळी बनली आहेत.


ह्या सर्व धावपळीत सध्या सोनी tv वरील बघितलेली " ये ऊन दिनोंकि बात है " मालिका मनात घर करून जाते. १९९० मधील शाळेत घडणारी एक सुंदर love story सगळ्यांना आपल्या पहिल्या क्रशची आठवण करून देते. त्या वेळी सलमान, आमीरने तरुणाईला वेड लावले होते, आशीकी, साजन ची गाणी घराघरत वाजत  होती. तो काळच खूप सुंदर होता, राहून राहून ते दिवस परत आयुष्यात यावेत असे निश्चितच माझ्या समवयस्कांना वाटत असेल.

ह्या काळात आम्ही सर्व प्रकाराची transformation बघितली, कंप्यूटर युगाची सुरवात झाली होती, y2K ची समस्या आणि त्याचबरोबर सॉफ्टवेअर मध्ये भारताला नंबर वन बनवणाऱ्या Infosys आणि TCS चा चढता आलेख आम्ही बघितला. माधुरी, रवीना, करिष्मा, सलमान, शाहरुख, आमीर, रीतीक, अक्षय ह्यांची career आमच्या समोरच घडली. अमिताभला हिरोच्या भूमिकेत शेवटचे जुम्मा चूम्मा देदे म्हणताना आम्ही बघितले. सचिन,  द्रविड, गांगुली, सहवागच्या career चे पण आम्ही साक्षीदार आहोत. आम्ही लता मंगेशकरना गाताना बघितले आहे. आमच्या शाळेच्या दिवसात आमचे विश्व खूप मर्यादित होते, दंगा मस्ती करायचो पण मोठ्यांचा, शिक्षकांचा आदर होता आणि धाक पण होता.


आजच्या मुलांसाठी TV, Internet ने दुनिया जवळ आणली आहे. शाळेतील प्रोजेक्ट पण गूगल वर सर्च केल्या शिवाय पूर्ण होत नाहीत. दिवस रात्र Social Media चा भिडिमार आणि त्यातून मिळणारे Knowledge आजच्या तरुणाईला एक पाऊल पुढेच ठेवते. आजची पिढी स्मार्ट आहे आणि All Rounder आहे. Competition च्या बोज्याखाली दबलेली आहे पण आपल्या Career साठी Serious आहे, त्यांनी Goal Setting शाळेतच केलेले असते आणि त्यावर ते तेवढेच Focused आहेत. आजची पिढी Hard Work करायला तयार आहे पण जर शॉर्ट कट मारून पुढे जायला मिळत असेल तर तोपण पर्याय खुला ठेवणारी आहे. सगळेच तसे नाही आहेत पण दिवसेंदिवस वाढणारी Competition अनेक गोष्टींना कारणीभूत ठरत आहे.

तरी असो, आपल्या "ऊन दिनोंच्या" आठवणी खूप असतील आणि खूप काही हळव्या करणाऱ्या असतील. ती किंवा तो सध्या काय करतो असा प्रश्न निर्माण करण्याऱ्या असतील. आम्ही सगळे Blessed होतो, आई वडिलांना आमच्यासाठी वेळ होता, शिक्षकांना आमच्यासाठी तळमळ होती, शाळा कॉलेज मध्ये लफडी व्हायची पण खूप ठिकाणी निर्मळ प्रेम होते. आम्ही चांगल्या प्रकारे बालपणाच्या, तरूणपणीच्या कसोट्या पार पाडून मध्यमवया पर्यंत पोचलो आहोत, वयाबरोबर आलेली Maturity निश्चितच  उपयोगी पडेल, आयुष्य खूप सुंदर आहे त्यातील प्रत्येक दिवस सुंदर पणे जगुया.

© जितेंद्र मनोहर शिंदे 


Comments

Post a Comment

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात