पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुड व्हाइब्स ओन्ली (Good Vibes Only)

इमेज
  ''दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती'', अशी दिव्यत्वाची प्रचिती येते दिव्य माणसांकडून जी आपले जीवन जगाच्या कल्याणासाठी वाहून देतात. दैनंदिन जीवनात अशी माणसे मिळणे विरळेच पण काही माणसे जरूर मिळतात ज्यामुळे हृदयी वसंत फुलतो, मन फुलपाखरू बनते. अशी माणसे नेहमी जवळ असावी असे वाटते, अश्या माणसांकडून एक वेगळीच ऊर्जा आणि पॉसिटीव्हिटी मिळते ज्याला आपण गुड व्हाइब्स बोलतो.   जीवनात गुड व्हाइब्स मिळण्यासाठी फक्त माणसं नाही तर परिस्थिती पण तेंव्हडीच जबाबदार असते. ज्यावेळी आपण आपल्या आवडत्या नयनरम्य हॉलिडे स्पॉट वर जातो त्यावेळी पण आपल्याला गुड व्हाइब्स मिळतात. एखादा सुंदर चित्रपट, सुंदर गाणे, सुंदर डान्स, मित्रमैत्रिणींचा साथ पण आपल्याला गुड व्हाइब्स देऊन जातो. गुड व्हाइब्स मिळण्यासाठी चांगली संगती, चांगली परिस्थिती जरुरीची आहे आणि ती निर्माण करणे काही अंशी आपल्या हातात आहे. जेव्हढे आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहतो, चांगले विचार करतो तेव्हढेच जास्त गुड व्हाइब्स आपल्या नशिबात असतात.  एखादा सुंदर रोमँटिक कुटूंबवत्सल सिनेमा बघून मिळणाऱ्या सुंदर व्हाइब्स ह्या एखाद्या हि...

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

इमेज
                                                                                   नॉस्टॅल्जिया, एक युनिवर्सल फिलींग ज्याच्यामधून कोणीच सुटू शकत नाही. भूतकाळात रमणे सगळ्यांनाच आवडते. भूतकाळातील रम्य आठवणी, तो किंवा तीच्या बरोबरीचे हळवे क्षण, मित्रांबरोबर केलेली दंगामस्ती, लहानपणीची शाळा, शिकवणी, महाबळेश्वर किंवा माऊंट अबूची सहल, एखादी आठवणीतील दिवाळी, मुंबई लोकलचा आणि डबल डेकरचा पहिला प्रवास, पहिला क्रश, सगळ्याच गोष्टी कश्या मनामध्ये उचंबळून येतात आणि मनाला पुन्हा पुन्हा त्या भूतकाळात घेऊन जातात आणि काही वेळेसाठी का होईना आपण तो प्रसंग पुन्हा जगतो, पुन्हा एकदा ती आणि तो हंसो का जोडा बनतात, पुन्हा मित्रांबरोबर शाळा भरते. नॉस्टेल्जीक बनण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी पण पुरेशा असतात, रोजच्या धकाधकीच्या जीवनात ज्यावेळी आपण थकून जाऊन जरा विसावयाला जातो...

सत्तेचा घोडेबाजार

इमेज
                                                                     नेता मोठा कि पक्ष मोठा ? नेता मोठा कि पक्षाचा सिद्धांत मोठा ? पक्ष मोठा कि नेता मोठा ? पक्ष मोठा कि नेत्याचा सिद्धांत मोठा ? एखादा पक्ष मोठा कि देश मोठा ? पक्षाने नेत्याला बनवले कि नेत्याने पक्षाला बनवले ? पक्षातील नेत्यांसाठी काम करायचे कि पक्षाच्या सिद्धांतांसाठी काम करायचे ? नीतिमूल्ये जपणाऱ्या नेत्याला आपला मानायचे कि सगळी नीतिमूल्ये चुलीत घालून फक्त सत्तेसाठी लाचार होणाऱ्या नेत्याला आपला नेता मानायचे ? राजकारणात सर्व काही क्षम्य असते का ? एकाने केली तर गद्दारी आणि दुसऱ्याने केली तर मुत्सद्देगिरी, संधीचे राजकारण करणाऱ्यांना डोक्यावर बसवायचे कि पायतानाने हाणायचे ? राजकारण राजकारण ह्या नावावर किती खपवून घ्यायचे ?  आज देशामधील राजकारणाची परिस्थिती बघता असे अनेक प्रश्न वारंवार मनात येतात, अरे कुठे न्हेऊन ठेवलंय राजकारणाला. आज राजकारणातील नीति...

'' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ''

इमेज
                                                              कान्हा, कृष्णा, मधूसुदना किती नावांनी पुकारू तुजला. कान्हा बरोबर असणारे नाते शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही. कान्हाच्या बाललीला, कान्हाचा बालपराक्रम, कान्हाच्या रासलीला सगळ्या गोष्टी कश्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. भगवतगीता म्हणजे जीवनाचा भवसागर पार करण्याचा राजमार्ग, ज्याला गीता समजली त्याला जीवन समजले. आम्ही पामर अजून गीतेला जीवनात उतरवू शकलो नाही.  विठ्ठलाच्या अभंगामध्ये तल्लीन होत कधी कान्हाचे वेड लागले ते समजलेच नाही. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांमागे नाचणारे भक्तजण बघून विठ्ठलाची ओढ लागली. पंढरपूरला जेव्हा पहिल्यांदा विठ्ठलाचे दर्शन घेतले होते तेव्हा ब्रम्हानंदाची अनुभूती आली होती ,तीच अनुभूती द्वारकेला आली होती. आर्ट ऑफ लिविंग चे कोर्स केले त्यावेळेच्या गुरुजींच्या प्रत्येक शब्दागणिक कृष्ण जवळचा वाटू लागला. आयुष्यात आलेले काही प्रसंग मला खुणावून गेले कि तो नेहमी...

चला हवा येऊद्या

इमेज
                                                                                          चला हवा येऊद्या - हास्याची एक अशी पर्वणी जी मला नवीन आठवड्याला सामोरा जाण्यासाठी ऊर्जा देते. गेले अनेक वर्षे मी चला हवा येऊ द्या बघत आहे आणि प्रत्येक एपिसोड्गणिक त्याच्या प्रेमात पडत गेलो आहे. खरच चला हवा येऊद्या ने जनमानसाची नाडी पकडली आहे. इतकी वर्षे हा कार्यक्रम चालत आहे पण त्याचा कंटाळा येत नाही, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी एक विविधता बघायला मिळते. ह्या कार्यक्रमाने विनोदाला एक नवी संजीवनी दिलेली आहे.  विनोदावर अनेक कार्यक्रम आले पण ह्यासम हाच. ह्यातिल विनोदाला एक उंची आहे आणि ईतक्या वर्षात ती कोठेही घसरलेली दिसत नाही. त्यात कोठेही अश्लिलता, असभ्यता दिसत नाही. ह्यातिल प्रत्येक पात्र जमिनीला घट्ट धरून, कठीण प्रसंगांना सामोरा ...

नरो वा कुंजरो वा

इमेज
  महाभारतातील युधिष्ठिर आपणास चांगलाच परिचित आहे,   युधिष्ठिर सत्याची कास धरून कधी ही खोटं न बोलणारी महान व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता . गुरु द्रोणाचार्य ज्यावेळी युद्धाची सूत्रे सेनापती म्हणून सांभाळत होते त्यावेळी कौरव सरशीत होते आणि त्यांना हरवणे कठीण जात होते अश्यावेळी द्रोणाचाऱ्यांना थांबवणे गरजेचे होते पण त्यांना थांबवणार कसे  ? अश्या संकट काळी युगंधर कृष्ण यांनी एक योजना बनवली ज्यामध्ये   द्रोणाचाऱ्यांना शस्त्र खाली ठेवण्यासाठी मजबूर करण्याचा घाट घातला गेला .  युद्ध चालू असताना अशी अफवा पसरवली गेली की आश्वाथमा मारला गेला .  आश्वाथमा द्रोणाचाऱ्यांच्या पुत्राचे नाव होते ,  अफवेने द्रोणाचार्य तुटून गेले पण बातमी खरी का खोटी याची त्यानां शंका आली . बातमीची पुष्टी करण्यासाठी ते सरळ युधिष्ठिरा कडे गेले  आणि त्यांनी त्याला विचारले की खरंच आश्वाथमा मारला गेला का . ह्या प्रश्नावर युद्धिष्ठिराने दिलेले उत्तर होते  '' अश्वथामा हथ इति नरो ...

कर्मा रिटर्न्स

इमेज
                                                               भगवतगीतेत म्हटले आहे तू कर्म करत जा फळाची इच्छा करू नकोस. खरच माणसाचे कर्मच सगळे काही आहे. आज आपल्या बाबतीत जे काही घडत आहे ती आपल्या कर्माची फळे आहेत, आपले कर्म आपला पिच्छा कधीच सोडत नाही. जर तुम्ही आयुष्यात चांगले केले असेल तर तुम्हाला चांगलेच मिळेल , वाईट कर्माची फळे पण कदाचीत ह्या जन्मातच मिळणार असतात,  कारण आता सगळे काही इन्स्टंट आहे, दुसऱ्या जन्मासाठी वाट पाहायला कदाचित देवाला पण वेळ नाहि आहे. ह्या कर्माचा प्रत्यय अनेकदा येतो. आयुष्यात आपल्या हातून जे काही घडले असेल ते कुठेतरी नोंद होत असते आणि योग्य वेळी त्याच्या मोबदल्यात आपल्याला चांगली किंवा वाईट फळे रिटर्न गिफ्ट म्हणून मिळत असतात. आयुष्यात आपण कितीही चांगले वागलो असो पण आपल्या हातून कधी एक चूक झाली असेल तर समाजाला ती चूकच कदाचित आयुष्यभर लक्षात राहते आणि तेच आपले आयुष्यभरासाठी ...

कातर वेळ

इमेज
                                                                                  संध्याकाळी मी प्रवास करत नाही , कारण संध्याकाळी मी माझा राहत नाही. आठवणींचा कल्लोळ माजतो मनात आणि मन गुंतत जाते भूतकाळात. अनेक प्रसंग , अनेक माणसे डोकावून जातात , कधी मनाला दुखावून तर कधी सुखावून जातात .  मन वेडे शोधत असते जुने सुखाचे क्षण , पण का राहून राहून आठवतात ते कठोर यातना दायी क्षण. गाडी जशी घेते वेग तश्या ह्या आठवणी पण जोराने उचंबळून येतात , किती सावरता सावरल्या तरी मनाला हरवून जातात. मनाला सावरणे हे केवळ निमित्त असते , खरे म्हणजे स्वतःला न दुखावू देण्याचा   एक अट्टाहास असतो. तरी मन बावरे काही माझे ऎकत नाही , किती सावरता सावरले तरी पुन्हा येते आठवणींवरी. काही ...