Posts

व्हेंटिलेटर

Image
नुकताच व्हेंटिलेटर सिनेमा बघायचा योग आला. एक सुंदर आणि नात्यांचा गोतावळा मांडणारा खूपच बोलका चित्रपट. कोकाणतल्या रत्नागिरी मधल्या कामेरकर कुटुंबातील एक व्रूद्ध व्हेंटिलेटर वर असतो आणि त्याच्या ह्या आजारपणात त्याच्या नातेवाईकांमधला भावनिक ओलावा, कडूपणा, जुने संघर्ष, वाटणी संबंधित राहिलेले मुद्दे हळूहळू बाहेर येतात. कोकणातील माणसे साधी भोळी, ऐकमेकांवर जिवापाड प्रेम करणारी, नात्यात ओलेपणा जपणारी. पण वाद हा कोकणाच्या पाचवीला पुजलेला. कोकणी माणूस भलेही आपापसात भांडतो पण त्याच्यातील प्रेमाचा धागा अश्या नाजूक प्रसंगी अजून मजबूत होतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच नाती हळूहळू व्हेंटिलेटर वर येत आहेत. कोणालाच एकामेकासाठी वेळ नाही. घरात एकत्र कुटुंबे खूप कमी उरली आहेत आणि त्या एकत्र कुटुंबात पण मुलांना आपल्या आईवडिलांसाठी वेळ नाही. एकाच घरात राहून मुलांचा आईवडिलांच्या बरोबर प्रेमळ संवाद होत नसतो. आई वडील म्हणजे घरातील अडगळीची वस्तू बनत चालले आहेत. तरुण मुले आई बाबांना Outdated समजून त्यांना सर्व गोष्टींपासून दूरच ठेवणे पसंद करतात. नानाच्या 'आपला माणूस' चित्रपटातील डाइलॉग "शेवटचं

‘’Will it ever stop?

Image
We have just celebrated Dussehra, Happy Dussehra to everyone. Dussehra is an auspicious time to do ‘’Simolanghan’’ i.e., stretching our limits to cross the borders of our strengths, and capacity to unleash our potential. I am also trying to do ‘’Simolanghan’’. Till today, what life has taught me, the people I have met, the maturity I have gained through sufferings of life, abundant love and Sanskar’s that my parents and brothers have given me, how I struggled and bounced back while crossing the ocean of life. I want to share all this & express my feelings & gratitude by giving back to society through this blog. The name of this blog is ``Food for Thought’. Many times, some events, human behaviour, and situations that occur make us reflect and puzzle us. The thought that everything happening around us acceptable ? and can there be anything more acceptable ? & are we aligned ? Today the world is being dragged into the trenches of a world war. The old war between has not ended

हे सर्व कधी थांबेल का ?

Image
  आज दसरा,सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज सीमोल्लंघन करण्यासाठी चांगला मुहुर्त आहे. मी पण आज असाच सीमोल्लंघन करायचा प्रयत्न करत आहे .आज पर्यंत जे काही जीवनाने शिकवले , भेटलेल्या माणसांनी घडवले, अनेक बऱ्यावाईट प्रसंगांनी जी मानसिक प्रगल्भता दिली, माझ्या आई वडिलांनी आणि भावांनी मला जे भरभरून प्रेम दिले, माझ्या अर्धांगिनीने आयुष्य भर साथ देत जी  प्रेरणा दिली आणि आतपर्यंत च्या सेहेचाळीस वर्षाच्या प्रवासाचा जो काही अनुभव संचय झाला तो सगळ्यांबरोबर वाटण्याचा एक प्रयत्न म्हणून आज पासून हा ब्लॉग चालू करत आहे.  ब्लॉग चे नाव आहे ''फूड फॉर थॉट '', अनेक वेळा घडणारे प्रसंग, माणसाचे वागणे, येणारी परिस्थिती आपल्याला  अंतर्मुख करते आणि मनात विचारांचा गोंधळ उडतो. घडणारे सर्व काही खरच योग्य ते घडत आहे का आणि ह्याच्या पेक्षा पण अजून काही योग्य होऊ शकते का हा विचार मनामध्ये घोळत असतो. आज जग महायुद्धाच्या खाई मध्ये ओढले जात आहे. दीड वर्षापूर्वीचे युद्ध संपत नाही तर आता नवीन युद्ध पेटले आहे. कोकणात वाढून साने गुरुजींची शिकवण अंगी बाणवल्यामुळे मला एकच धर्म माहीत आहे ''खरा तो