पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

त्या दोघी

इमेज
  त्या दोघी , दोघींनाही पहिल्यांदाच भव्यतेचा साक्षात्कार. एकीला मायाजलाचा भास तर दुसरीला उज्ज्वल भाग्याची आस. एकी समोर उभा राहतो कष्टमय भूतकाळ तर दुसरीला खुणावतो प्रकाशमय भविष्यकाळ  एक संसाराचा गाडा ओढून थकलेली तर दुसरी संघर्षासाठी खंबीर पणे उभी ठाकलेली. एकीचे डोळे वैभवाने दिपलेले तर दुसरीचे त्या वैभवाला मुठीत घेण्यासाठी हपापलेले. एक जीवनाला साध्या मार्गाने जगणारी तर दुसरी आपला नवा यशाचा मार्ग चोखनदळ पणे निवडणारी.  एक संसाराच्या मायाजाळातून बाहेर पडलेली तर दुसरी त्या  मायाजाळाकडे ओढत चाललेली. एक आयुष्याच्या रम्य संध्याकाळात रमलेली तर दुसरी उंच भरारी घेण्याच्या विश्वासाने भरलेली. ©   जितेंद्र मनोहर शिंदे

मेयाझगन

इमेज
  मेयाझगन हा तामिळ सिनेमा बघून महिना झाला पण त्याची गोडी अजूनही मनात तशीच रेंगाळून आहे. हा सिनेमा आजच्या घडीच्या सिनेमा पेक्षा पूर्णपणे वेगळ्या धाटणीचा आहे, आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगांचा आपल्या मनाच्या पटलावर खोल परिणाम होता, काही गोष्टी कायमच्या रुतून बसतात आणि आयुष्यभर सलत राहतात आणि आतून आपल्याला बदलून टाकतात. काही गोष्टी आपल्या चांगुल पणामुळे आपल्या हातून घडून जातात ज्याला आपण जास्त महत्व देत नाही पण त्याचा दुसऱ्याच्या जीवनावर फार मोठा परिणाम होऊन त्याच आयुष्य बदलून जातात ज्याची आपल्याला किंचित ही कल्पना नसते. काही नाती दूर राहिल्याने तुटल्यासारखी वाटतात पण तिच नाती अचानक समोर येऊन आपल्यावर एवढं प्रेम करतात की जीव गुदमरून जातो आणि आपण खरंच त्या प्रेमाच्या लायकीचे आहोत का हा प्रश्न उभा राहतो. हा सिनेमा म्हणजे नोस्टेलजियाचे एक सुंदर उदाहरणं आहे. आपले लहानपण आठवून त्या आठवणीत रमून जाऊन लहानपणीच्या सवंगड्या बरोबर काही काळ घालवणे किती आल्हाददायक असतें  हे ह्या सिनेमात दाखवलं आहे. लहानपणी भावकीच्या भांडणामध्ये अरुण स्वामीला आपले घरं सोडावे लागते जी गोष्ट त्याच्या कायमची जिव्...

विश्वविजेता गुकेश

इमेज
  तो विषविजेता बनला अवघ्या अठराव्या वर्षी, जगातील सर्वात तरुण विषविजेता, एवढ्या कोवळ्या वयात एवढं मोठं यश, अश्या यशाने एखाद्याने स्वतःला फार मोठा तीसमारखा समजून जिंकताच नाचून थयथयाट मांडला असता पण तो शांत होता त्या स्थितीत पण शांत होता.सर्वप्रथम त्याने चेसच्या सोंगट्या परत जागेवर लावल्या आणि अत्यंत आदरपूर्वक त्यांना नमन करून आपला आदर प्रगट केला, त्याने चेस ला प्रणाम केला आणि नंतर भावना अनावर होऊन तो रडला. तो आपले संस्कार आपली शिस्त ह्या परमोच्च यशाच्या क्षणी पण विसरला नाहीं आणि अश्या वागण्याने त्याने लाखो लोकांच्या हृदयात कायमची जागा बनवली. कुठून येते एवढी प्रगल्भता, धन्य ते गुकेश चे पालक ज्यांनी असं रत्न घाडवलं. ह्या Attitude of gratitude मुळेच तो जगजेत्ता बनला, असा जगजेत्ता पुन्हा होणं नाहीं, सलाम गुकेश 🙏🙏🙏 ©   जितेंद्र मनोहर शिंदे

युतीचा धर्म

इमेज
युतीचा धर्म सगळ्यांनी पाळला, कमळाने धनुष्या बरोबर घड्याळाला पण साथ दिली आणि मशाल तुतारीने हाताबरोबर मिळवणी केली. सगळं कसं लिहून दिल्यासारखं घडवण्याचा प्रयत्न झाला आणि आम्ही सर्व एक आहोत म्हणून नेते मंडळींनी जनतेसमोर आणाभाका घेतल्या. प्रचाराच्या फडामध्ये सगळं कसं वरवर ठीक होतं आतलं राजकारण मात्र वेगळंच चाललं होतं, आतल्याआत मशाल हाताला भारी पडत होती आणि तुतारी वाजवायला हात पुढे होतं न्हवता. कमळाच आणि धनुष्यच गणित तसं दिसायला चांगलच जुळलं होतं पण घड्याळ कधी कधी चुकीची वेळ दाखवत होतं.  युतीत सगळ्यांचं बरळण चालू होतं कारण ज्याला त्याला आपलाच एक्का चालवायचा होता, कोण मोठा कोण लहान ह्या संभ्रमात सगळेच होते कारण प्रत्येकाचा इतिहास फार मोठा कर्तृत्ववान होता. सगळे जण अजूनही त्या आपल्या इतिहासात रममाण होते आणि वस्तुस्थिती पासून थोडे दूरच होते. रेल्वेचे इंजिन आणि वंचित पण मोठ्या आत्मविश्वासाने भरून गेले होते.  प्रचाराच्या रणधुमाळीत सामान्य कार्यकर्ता संभ्रमातच राहिला कधी काळी ज्या हाताला शिव्या दिल्या आणि ज्याच्या बरोबर रस्त्यावर उतरून लढाया लढून चार गुन्हे आपल्यावर घेतले त्या हाताला आज स...