थोडा है , थोडे कि जरुरत है
''थोडा है , थोडे कि जरुरत है '', प्रत्येक जणांच्या आयुष्यातील हि सत्य परिस्थिती. अगदी बिलिअनर पण कदाचित हाच विचार करत असतील. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात काही ना काही इच्छा धरून असतो त्यातील सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही आणि पूर्ण झाल्या तरी तो पर्यंत नवीन इच्छांची भर पडलेली असते आणि मग परत परिस्थिती पुन्हा येऊन पोचते ''थोडा है थोडे कि जरुरत है'' वर. सगळ्यांना आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींची कमीच भासते , बाईक वाला कार इच्छितो , साधी कार वाला लक्झरी कार , लक्झरी कार वाला चार्टर प्लॅन अशी इच्छांची रांग वाढतच जाते , प्रत्येक जण 'थोडा और थोडा और' च्या चक्रात अडकलेला असतो. ह्या थोडा और च्या मागे सर्वात मोठे कारण असते तुलना करण्याची वृत्ती , प्रत्येक जण आपली तुलना दुसऱ्या बरोबर करत असतो. सकृत दर्शनी समोरचा त्याला जास्त सुखी दिसतो आणि त्याच्या कडे असणारी प्रत्येक गोष्ट आपणाकडे पण आली कि आपण पण तेवढेच सुखी होऊ असे ज्याला त्याला वाटते , समोरच्या कडे असणाऱ्या भौतिक गोष्टींवरून त्याच्या सुखाची व्याख्या केली जाते. ज्याच्या कडे जास्त भॊतिक गोष्टी , लक्झरी