बवाल

नूकताच बवाल सिनेमा बघितला, खूप दिवसांनी बॉलीवूड वाल्यांनी एक सुंदर निर्मिती केली आहे. एक असा सिनेमा जो पुऱ्या परिवारासोबत बसून बघू शकतो, आजच्या पिढीला आरसा दाखवणारा आणि समाजातले एक वास्तव दाखवणारा सिनेमा. आज बरेचजण आपली एक खोटी इमेज बनवून आहेत आणि त्या इमेजला तडा जाऊ नये म्हणून एक खोट्याची दुनिया बनवतात आणि ती जपण्यासाठी अनेक उलटे सुलटे मार्ग वापरतात, त्यांना आपल्या इमेज पेक्षा बाकी सर्व गौण असतें आणि त्यासाठी आपली नाती गोती, मानवी मूल्ये या सगळ्यांना पायदळी तुडवण्यात त्यांना काहीही चुकीचे वाटत नाही. खूपच आत्माकेंद्रित आणि स्वार्थी लोकं असतात ती. आपण आयुष्यात खूप मागे पडलो अशी खंत मनात सलत असते आणि जगाला दाखवण्यासाठी ते मग आपलें वेगळे विश्व उभारतात आणि तेच लो...