Posts

Showing posts from July, 2024

कर्मयोगी

Image
आज नानांना खूप उशिरा जाग आली, नेहमी पाच वाजता उठायची सवय पण काल रात्री झोपच येतं न्हवती आणि रात्री कधीतरी उशिरा डोळा लागला होता. लवकर लवकर आटपून ते नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉक ला निघाले, बरोबर कधीपासून वाट बघत बसलेला टॉमी होताच. आज वेळ चुकल्या मुळे म्हणा कदाचित सगळं कसं वेगळं वाटत होतं, रस्ता तोच पण माणसं वेगळी, प्रत्येकजण आपल्या धावपळीत, कोणी ऑफिसला जायच्या धावपळीत तर कोणी मुलांना शाळेत सोडायच्या धावपळीत. नेहमीचा फेरफटका मारून नाना उद्यानात आपल्या नेहमीच्या बाकावर बसले, मन मात्र जागेवर न्हवते ते केव्हाच भूतकाळात जाऊन पोचले होते. प्रख्यात मल्टि नॅशनल कंपनी मधून व्हाईस प्रेसिडेंटच्या पदावरून नाना निवृत्त झाले होते, एके काळी त्यांचा एक एक मिनिट मौल्यवान होता. महिन्यातून एक दोन फॉरेन टूर, आणि बाकी सर्व वेळ मिटिंगनें भरलेले कॅलेंडर, त्यांची सेक्रेटरी हे सर्व पाळता पाळता स्वतः थकून जात असे. नानांना ऑफिस मध्ये मान पण तेव्हडाच होता, कंपनीला बिलियन डॉलर कंपनी बनवण्यामध्ये नानांचा फार मोठा हात होता आणि नांनानी आयुष्यातील पुरी पस्तीस वर्ष कंपनीला दिली होती. मॅनेजमेंट ट्रेनीं ते व्हाईस प्रेसिडेंट

पापभिरू

Image
डिबीजे कॉलेज मधून बीकॉम झाल्यावर नोकरीच्या शोधात तो मुंबईला पोचला होता, चिपळूणच्या गावातील शाळेत शिक्षण पूर्ण करून मोठ्या उमेदीने गावातून येऊन जाऊन करून त्याने बी कॉम पूर्ण केलं होतं. आई वडिलांनी खूप हाल सोसून त्याला इथपर्यंत शिक्षण दिलं होतं आणि आता बावाने मुंबईला जाऊन चार पैसे मिळवून चांगले दिवस यावं म्हणून म्हातारा म्हातारीनी काळजावर दगड ठेऊन त्याला मुंबईला पाठवलं होतं.  मुंबईला एका दूरच्या चुलत्याच्या घरात उतरला  आणि नोकरीं शोधण चालू झालं. दोन महिने झाले तरी काय नोकरीं मिळेना, असा किती दिवस चुलत्यावर बोझा बनून राहायचं असं सारखं सारखं त्याला वाटू लागलं आणि उमेद तुटू लागली अशातच नवी मुंबई तील एका कंपनीत कंत्राटी पद्धती नें चालू असलेल्या भरतीत त्याला नोकरीं मिळाली आणि जीव भांड्यात पडला.  वीस हजार पगार होता पण चुलता डोंबिवलीला आणि नोकरीं नवी मुंबई ला त्यामुळे तिथं राहणं गरजेचं होतं आणि तसें पण आयुष्यभर चुलत्यावर त्याला बोझ बनायचं न्हवत. नोकरीं चालू व्हायच्या आधी घर शोध चालू झाली आणि अश्यातच एका मित्राच्या ओळखीने त्याला आयरोलीच्या एका रूम मध्ये इतर तीन मुलांबरोबर रूम शेअर करायला मिळाली

कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाई माझी

Image
मृग नक्षत्र आल्या नंतर सृष्टी हिरवा शालू ओढून सजते, पावसाच्या आगमनाने मन प्रफुल्लित होऊन जीवनात पण नवी पालवी फुटते. पावसाच्या आगमनानानंतर आपल्या संस्कृती मधील अनेक सण सनावळींना सुरवात होते. आधी नागपंचमी, वटपौर्णिमा, पंढरीची वारी, श्रावण महिन्याचे उपास तपास, व्रत वैकल्य, पाठोपाठ दहीकाला, रक्षा बंधन आणि नंतर येतो गणपती बाप्पा, मग दसरा, दिवाळी. अगदी दिवाळी पर्यंत कसा सगळं कॅलेंडर ब्लॉक असते.   हे येणारे सारे सण हर्षोउल्हासात साजरे करताना एक औरच मजा असते. काही सण महिलांसाठी असतात पण घरात मंगलमय वातावरण निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा येते, हे सण सनावळी घराघरात चैतन्य निर्माण करतात, सणामुळे नातेवाईक एकत्र येतात, भाऊ बहीण, मित्र परिवारात जवळीक वाढते आणि त्याच्यामुळेच सामाजिक सलोखा राखण्यास मदत होते, संस्कृती संवर्धन होऊन ति एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचते. आपल्या ह्या महान संस्कृतीनेच आपल्याला ह्या  सण सनावळींची भेट दिली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे सारे सण निसर्गाला अनुसरून साजरे केले जातात आणि निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिले आहे त्याचे आभार मानण्यासाठी निसर्गाची पूजा हा ह्या सर्व स