पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आज सोनियाचा दिनू

इमेज
आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू... हरी पहिला रे.. हरी पहिला रे... आज रामलल्ला आयोध्येत विराजमान झाले आणि पाचशे वर्षाचा इंतजार संपला. ह्याच देही ह्याच डोळा हा सोहळा बघायला मिळाला. हा सोहळा बघण्यासाठी गेली पाचशे वर्षे आपले पूर्वज झगडले. आज शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आणि कित्येक शूरवीरांचा आत्मा सुखवला असेल. जे काही घडत आहे ते दिव्य आहे आणि त्यासाठी लाखो रामभक्तांचे बलिदान आहे.  रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा होऊन त्याच्या पाठोपाठ रामराज्याची पण नांदी व्हावी. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मसुर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्रणिजात. सकलजन सुखी होऊन विश्वशांती लाभावी हीच रामलल्लाच्या चरणी प्रार्थना. 🚩🚩🚩जय श्रीराम 🚩🚩🚩 © जितेंद्र मनोहर शिंदे 

कॉफी विथ नौटंकी

इमेज
जगामध्ये अनेक हस्ती आहेत ज्यांनी आपल्या अभूतपूर्व यशाने जगामध्ये नाव कमावले , त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उठवला आणि ते त्या क्षेत्राचे हिरो बनले. अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये प्रत्येक जण आपला ठसा उठवतात जसे क्रीडा , कला , राजकारण, चित्रपट आणि आता सध्या फेमस होत असवणारे सोशल मीडिया चॅनेल्स. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एखाद्याने मिळवलेले यश लपून राहू शकत नाही आणि क्षणार्धात बातमी पसरून तो किंवा ती हिरो बनते, अनेक वाहिनीनवर बातमी पसरते , मुलाखती चालू होतात, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन अनेक यंगस्टर त्यांना फॉलो करायला तयार होतात. त्यांना मिळालेले यश कधी कधी टिकून राहते किंवा लवकरच लोग त्यांना विसरून जातात कारण यश मिळवणे कठीण आहे पण टिकवणे त्याहून कठीण. अश्यावेळी हे क्षणकाळाचे स्टार आपापल्या पर्सनल ब्रॅण्डिंग वर काम करायला लागतात , काहीही करून , येन केन प्रकाराने ते लोकांच्या दृष्टी समोर राहू पाहतात. लोकांनी त्यांना सर्च करावे किंवा त्यांना विसरून न जावे तसेच त्यांच्या क्षेत्रात त्यांना सतत काम मिळावे म्हणून अशी लोक आपल्या भोवती एक वलय बनवण्याचा प्रयत्न ...

बकेट लिस्ट २०२४

इमेज
                                                                         नवीन वर्षाचे स्वागत आपण सर्वांनी जोरात केले आणि आता हळू हळू २०२४ ची तारीख लिहिणे आपल्या हातवळणी पण होऊ लागले आहे. नवीन वर्ष, नवीन आशा, अनेक इच्छा आकांक्षा. नेहमी प्रमाणे पहिले काही दिवस नवीन वर्षासाठी केलेल्या संकल्पा नुसार अनेकांनी दिनक्रम चालू पण केला असेल. कदाचित योगा, ध्यान, चालणे, धावणे, वाचणे, लिहिणे आणि बरेच काही चालू केले असेल, काहींचा दिनक्रम अजूनही चालू असेल तर काहींनी बासनात गुंडाळून त्याला राम राम ठोकला असेल. संकल्प करणे चांगलेच आणि त्यांना पूर्णत्वाला नेणं अजूनही चांगले पण ह्या संकल्पा बरोबर एक दुसरी  गोष्ट करू शकतो ज्याला म्हणतात बकेट लिस्ट.  राहून गेलेले काहीतरी ज्याची इच्छा आपण लहानपणी, तरुणपणी किंवा एखाद्या नाजूक प्रसंगी केलेली असतें, ती इच्छा किंवा तिच्या सारख्या अनेक इच्छा मन...