व्हेंटिलेटर

नुकताच व्हेंटिलेटर सिनेमा बघायचा योग आला. एक सुंदर आणि नात्यांचा गोतावळा मांडणारा खूपच बोलका चित्रपट. कोकाणतल्या रत्नागिरी मधल्या कामेरकर कुटुंबातील एक व्रूद्ध व्हेंटिलेटर वर असतो आणि त्याच्या ह्या आजारपणात त्याच्या नातेवाईकांमधला भावनिक ओलावा, कडूपणा, जुने संघर्ष, वाटणी संबंधित राहिलेले मुद्दे हळूहळू बाहेर येतात. कोकणातील माणसे साधी भोळी, ऐकमेकांवर जिवापाड प्रेम करणारी, नात्यात ओलेपणा जपणारी. पण वाद हा कोकणाच्या पाचवीला पुजलेला. कोकणी माणूस भलेही आपापसात भांडतो पण त्याच्यातील प्रेमाचा धागा अश्या नाजूक प्रसंगी अजून मजबूत होतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच नाती हळूहळू व्हेंटिलेटर वर येत आहेत. कोणालाच एकामेकासाठी वेळ नाही. घरात एकत्र कुटुंबे खूप कमी उरली आहेत आणि त्या एकत्र कुटुंबात पण मुलांना आपल्या आईवडिलांसाठी वेळ नाही. एकाच घरात राहून मुलांचा आईवडिलांच्या बरोबर प्रेमळ संवाद होत नसतो. आई वडील म्हणजे घरातील अडगळीची वस्तू बनत चालले आहेत. तरुण मुले आई बाबांना Outdated समजून त्यांना सर्व गोष्टींपासून दूरच ठेवणे पसंद करतात. नानाच्या 'आपला माणूस' चित्रपटातील डाइलॉग "शेवटचं...