Posts

Showing posts from June, 2024

नया दौर : आर्टिफिशियल इंटिलिजंस

Image
सत्तर च्या दशकात नया दौर नावाचा सिनेमा आलेला होता, बदलत्या जमान्यानुसार होणारे बदल दर्शवणारा आणि जुनी आणि नवीन जीवन पद्धतीतील संघर्ष दाखवणारा एक सुंदर चित्रपट. आता सत्तरचे दशक उलटून पाच दशके झाली आणि जर सत्तर च्या दशकात नया दौर आला होता तर आताच्या जमान्यात त्याची कितवी आवृत्ती चालू असेल ते समजून घ्यायला पाहिजे. बदल हा काळाची गरज आहे आणि तो टाळणे अटळ आहे पण त्या बदलाला आपण कसे सामोरे जातो ते महत्वाचे आहे.  असे म्हणतात कि माणूस पण हळू हळू विकसित होत गेला, वेळेनुसार बदल घडत माणसाचे आताचे रूप आले आणि पुढे कदाचित हे रूप बदलेल पण. डायनासोर काळानुसार स्वतःला बदलू शकले नाहीत म्हणून नामशेष झाले, बदल हा टाळता येत नाही, सर्वात प्रथम बदला बद्दल जाणून घेणे गरजेचे आहे, त्याच्या मुळे  होणारे फायदे, तोटे आणि बदलणारे आपले जीवनमान ह्याचा आढावा घेऊन त्या बदलाला हळू हळू अंगिकारले पाहिजे त्याच्या मध्येच सगळ्यांचे भले असते.                                         सत्तरी नंतर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, चित्रपट, औद्योगिक, कॅर्पोरेट, चिकित्सा विज्ञान, इंजिनीरिंग आणि अनेक क्षेत्रात लक्षणीय बदल झाले आहेत

अश्वमेध 2024..चारसो पार

Image
तो आला, त्याने पाहिले, तो झुंजला, समोर चक्रव्युह होते पण त्याने स्वतःला त्यात झोकून दिले , त्याला युद्धाच्या परिणामाची पुसटशी कल्पना होती पण त्याचे हौसले बुलंद होते आणि त्याने सरळ सरळ आश्वामेधाचाच यलगार केला, तुफान झंझावात बनून तो तुटून पडला, अनेक बरे वाईट प्रसंग आले, घणाघाती आरोप झाले, पण तो नाहीं बधला. कारण त्याला त्याने केलेल्या पुण्यकर्मावर विश्वास होता, त्याने विकासाची कास धरून देशाला बलशाली बनवले होते, त्याने जगात देशाची मान उंचावली होती, तळागाळातून आल्यामुळे त्याने देशाची नाडी ओळखली होती आणि सर्वसामान्य लोकांना स्वच्छता, पाणी, गॅस आणि घरे अशा सुविधा देऊन त्याने त्यांचे जीवनमान उंचावले होते, अनेक वर्षे बेसिक सुविधाना मुकलेल्या समाजाला त्याने त्यांचा हक्क म्हणून त्या दिल्या होत्या, डिजिटल क्षेत्रात प्रचंड काम करून भ्रष्टाचारावर प्रचंड घणाघाती प्रहार केला होता,गरीबाचा हक्काचा पैसा त्याने कोणत्याही दलालाला न देता डियरेक्ट बँकेत जमा केला होता, औद्योगिक क्षेत्रात, सुरक्षा क्षेत्रात नवीन नवीन सुधारणा करून देशाला आत्मनिर्भर बनवून जगातली पाचवी मोठी इकॉनॉमि बनवून तिसरी इकॉनॉमि