Posts

Showing posts from February, 2024

मनाचिये गुंती

Image
खूप दिवसापूर्वी एक कहाणी वाचली होती , एक माणूस आपल्या मुलांना घेऊन बागेत जातो तिथे त्याची मुले खूप दंगा मस्ती करत असतात ज्यामुळे अनेक लोकांना त्रास होतो पण त्या माणसाचे त्याच्याकडे लक्षच नसते आणि तो आपल्या तंद्रीत असतो.  सगळे जण रागावून त्याच्याकडे कंप्लेंट करायला येतात आणि त्याच्यावर खूप ओरडू लागतात मग तो भानावर येऊन काय झाले हे विचारतो तेव्हा सगळे जण त्याला त्याच्या मुलांनी दिलेल्या त्रासाबद्दल सांगतात , तो माणूस सगळ्यांची माफी मागतो आणि सांगतो कि ह्यांची आई आज सकाळीच देवाघरी गेली आणि त्यांना खेळण्यासाठी मी इथे घेऊन आलो आहे. ह्या प्रसंगांमधून दिसून येते कि बाहेरून आपण कधीही माणसाची पारख करू शकत नाही , तो माणूस बागेत आला होता पण त्याच्या मागची कहाणी काही औरच होती. असाच प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये कुठेतरी उलझलेला असतो , तो जसा दिसतो तसा खरंच असेल ह्याची खात्री नसते , प्रत्येक जण आपल्या  मानसिक द्वंदा मध्ये गुरफटलेला असतो आणि आपली एक लढाई लढत असतो ज्या मध्ये अर्जुन पण तोच असतो आणि कृष्ण पण तोच असतो , हि लढाई कोणालाच माहीत नसते पण ती सतत चालू असते , हा संघर्षच माणसाला एका उंचीवर आणून स